________________
मी कोण आहे ?
मी ‘फॉरीन'च्या सायन्टिस्टना सांगितले कि, 'गॉड क्रिएटर आहे, हे साबित करण्यासाठी आपण माझ्यासोबत थोडी बातचीत करा. जर तो क्रिएटर आहे तर त्याने कुठल्या वर्षी क्रिएट केले ते सांगा.' तेव्हा ते सांगतात, ‘आम्हाला माहीत नाही.' मी विचारले 'त्याची बिगिनिंग ( सुरूवात) झाली कि नाही झाली?' तेव्हा म्हणतात, 'हो बिगिनिंग झाली, क्रिएटर म्हणतात. म्हणजे बिगिनिंग होणारच.' ज्याची सुरुवात होणार, त्याचा अंत होणार. पण हे तर बिना अंत चे जग आहे. बिगिनिंग नाही झाली मग एन्ड कुठून होणार? हे तर अनादि अनंत आहे. ज्याची बिगिनिंग नाही झाली, त्याचा बनविणारा नाही होऊ शकत, असे नाही वाटत?
भगवंताचा खरा पत्ता !
तेव्हा या फॉरिनच्या सायन्टिस्टनी विचारले कि, 'तर काय ईश्वर (भगवान) नाही आहे?' तेव्हा मी सांगितले, 'भगवान नसते तर, या जगात ज्या भावना आहेत, सुख आणि दुःख, त्याचा काही अनुभव ही नसता आला. म्हणून भगवान अवश्य आहे.' त्यांनी मला विचारले कि, 'भगवान कुठे राहतात?' मी सांगितले, 'आपल्याला कुठे वाटत आहे?' तेव्हा ते म्हणाले, 'वर'. मी विचारले, 'ते वर कोठे राहतात? त्यांचा गल्लीचा नंबर काय आहे? कुठली गल्ली, जाणता आपण? पत्र पोहोचेल तसा बरोबर एड्रेस आहे आपल्याजवळ?' वरती तर कोणी बाप देखिल नाही आहे. सगळ्या ठिकाणी मी फिरून आलो. सगळी लोकं म्हणत होते कि वर आहे. वर बोट दाखवत राहिले. यामुळे माझ्या मनात आले कि सगळी लोकं दाखवताहेत, म्हणजे काहीतरी असायला पाहिजे. म्हणून मी वर सगळ्या जागी शोधून आलो तर वर फक्त खाली आकाशच आहे, वर कोणी नाही सापडले. वर तर कोणी राहात नाही. आता त्या फॉरिनच्या सायन्टिस्टनी मला विचारले कि, 'भगवानचा खरा पत्ता सांगाल का?' मी सांगितले कि, ‘लिहून घ्या. गॉड इज इन एवरी क्रिएचर, व्हेदर विजिबल ओर इन्विजिबल', नोट इन क्रिएशन.' (भगवान, डोळ्यांना दिसणारे किंवा
१३