________________
मी कोण आहे ?
११
आहे. आता आपल्याला, 'जे माहीत आहे' ते जाणायचे आहे, कि 'जे माहीत नाही' ते जाणायचे आहे ?
जगत काय आहे? कशाप्रकारे बनविले आहे ? बनवणारा कोण ? आपल्याला या जगाकडून काय घेणे-देणे ? आमच्याबरोबर आमच्या संबंधितांचे काय घेणे-देणे? बिजनेस कुठल्या आधारावर ? मी कर्ता आहे कि कोणी दुसरा कर्ता आहे? हे सगळे जाणण्याची गरज तर आहेच ना?
प्रश्नकर्ता : जी, हां.
दादाश्री : म्हणून यात सुरूवातीला आपल्याला काय जाणायचे आहे, त्याची बातचीत प्रथम करूया. जग कोणी बनविले असेल ? आपल्याला काय वाटते? कोणी बनविले असेल असे गुंतागुंतीचे जग ? आपले काय मत आहे?
प्रश्नकर्ता : ईश्वरानेच बनविले असेल.
दादाश्री : तर मग साऱ्या संसाराला चिंतेत का ठेवले आहे ? चिंतेच्या बाहेरची अवस्थाच नाही.
प्रश्नकर्ता: सगळी लोकं चिंता करतातच ना ?
दादाश्री : हो, मग त्याने हा संसार बनविला तो चिंतेचा का बनविला? त्याला पकडून आणा, सी.बी.आई. वाल्यांना पाठवून. पण भगवान गुन्हेगारच नाही आहे. हे तर लोकांनी त्यांना गुन्हेगार ठरविले आहे.
वास्तवात तर, गॉड इज नॉट क्रिएटर ऑफ धिस वर्ल्ड एट ऑल (परमेश्वर ह्या जगाचा निर्माता नाहीच आहे, फक्त वैज्ञानिक संयोगिक पुरावे आहेत). त्याला गुजरातीमध्ये मी ' व्यवस्थित शक्ति' म्हणतो. ऑन्ली सायन्टिफिक सरकमस्टेन्शियल एविडेन्स आहे. अर्थात् ही सारी निसर्गाची रचना आहे. ही तर खूप सूक्ष्म गोष्ट आहे.