________________
मी कोण आहे ?
दादाश्री : मोक्षाला जाण्याचे च ! हाच ध्येय असायला हवा. आपल्यालाही मोक्षाला जायचे आहे ना? कुठपर्यंत भटकायचे ? अनंत जन्मापासून भटक भटक... भटकण्यात काही बाकी सोडले नाही ना! जनावराच्या गतिमध्ये, मनुष्यगतिमध्ये, देवगतिमध्ये, सगळ्या ठिकाणी भटकतच राहिले आहेत. कशामुळे भटकणे झाले? कारण कि 'मी कोण आहे' हेच नाही जाणले. स्वतःचे स्वरूपच नाही ओळखले. स्वत:चे स्वरूप ओळखले पाहिजे. 'स्वतः कोण आहे' ह्याची ओळख नको करायला ? इतके फिरून पण नाही ओळखले आपण? केवळ पैसे कमावण्याच्या मागे पडला आहात? मोक्षासाठी पण थोडेफार काही करायला हवे कि नाही ?
२२
प्रश्नकर्ता : करायला पाहिजे.
दादाश्री : अर्थात् स्वतंत्र होण्याची गरज आहे ना? असे परावलंबी कधीपर्यंत राहणार ?
प्रश्नकर्ता : स्वतंत्र होण्याची गरज नाही. पण स्वतंत्र होण्याची समजची आवश्यकता आहे, असे मला वाटते.
दादाश्री : हो, हीच समज जरूरी आहे. ही समज आपल्याला आली तर खूप झाले. भले स्वतंत्र होऊ नाही शकलात तरी. स्वतंत्र होऊ शकलात कि नाही होऊ शकलात ही त्यानंतरची गोष्ट आहे, परंतु तशी समजची आवश्यता आहे ना ! पहिली समज प्राप्त झाली, तरी खूप झाले.
'स्वभावात' येण्यासाठी मेहनत नको!
मोक्ष म्हणजे आपल्या स्वभावात येणे आणि संसार म्हणजे आपल्या विशेषभावात जाणे ते. म्हणजे सोपं काय? स्वभावात राहणे, अर्थात् मोक्ष कठीण नसतो. संसार नेहमी कठीण राहिला आहे. मोक्ष तर खिचडी बनविण्यापेक्षाही सोपा आहे. खिचडी बनविण्यासाठी तर लाकूड आणावे