________________
मी कोण आहे ?
दादाश्री : ज्याचे हे काम आहे, जो यात एक्सपर्ट आहे, तो सोनं आणि तांबं दोन्ही वेगळे करेल. शंभरच्या शंभर टक्के सोनं वेगळे करेल, कारण तो दोन्हीं चे गुणधर्म जाणतो, कि सोन्याचे गुणधर्म असे आहेत आणि तांब्याचे गुणधर्म असे आहेत. अशाप्रकारे ज्ञानी पुरुष आत्म्याचे गुणधर्म जाणतात आणि अनात्माचे गुणधर्म पण जाणतात.
२०
जसे अंगठीमध्ये सोनं आणि तांब्याचे 'मिश्रण' असेल तर त्याला वेगळे करता येते. सोनं आणि तांबं दोन्ही कम्पाउन्ड स्वरूप होऊन जातात, तेव्हा त्यांना वेगळे नाही करता येत, कारण यामुळे गुणधर्म वेगळ्या प्रकारचे होऊन जातात. अशाप्रकारे जीवाच्या आत चेतन आणि अचेतन चे मिश्रण आहे, ते कम्पाउन्ड स्वरूप नाही. म्हणून परत आपल्या स्वभावाला प्राप्त करू शकता. कम्पाउन्ड झाले असते तर कळलेच नसते. चेतनचा गुणधर्म पण कळला नसता आणि अचेतनचा गुणधर्म पण कळला नसता आणि तिसराच गुणधर्म उत्पन्न झाला असता. पण असे नाही. हे केवळ मिश्रण झाले आहे. म्हणून ज्ञानी पुरुषने हे वेगळे करून दिले तर आत्म्याची ओळख होऊन जाईल.
ज्ञानविधि काय आहे?
प्रश्नकर्ता : आपली ज्ञानविधि काय आहे?
दादाश्री : ज्ञानविधि तर सेपरेशन (वेगळे) करणे हे आहे, पुद्गल (अनात्मा) आणि आत्म्याचे. शुद्ध चेतन आणि पुद्गल दोन्हीचे सेपरेशन. प्रश्नकर्ता : हा सिद्धांत तर बरोबर आहे, परंतु त्याची पद्धती काय
आहेत?
दादाश्री : याच्यात घेणे देणे काही होत नाही, केवळ इथे बसून जसे आहे तसे बोलायची जरूरत आहे ('मी कोण आहे' त्याची ओळख, ज्ञान प्राप्त करणे. दोन तासाचा ज्ञानप्रयोग आहे. त्यात अठ्ठेचाळीस मिनिट आत्मा-अनात्माचा भेद करणारी भेदविज्ञानाची वाक्य बोलली जातात. जी