________________
मी कोण आहे?
कर्तापदाने कर्मबंधन! प्रश्नकर्ता : या कर्मबंधनातून सुटण्यासाठी काय करावे?
दादाश्री : हे जे कर्म आहे ते कर्त्याच्या आधीन आहे. म्हणून कर्ता असेल तरच कर्म होईल. कर्ता नसेल तर कर्म नाही होणार. कर्ता कसे? आरोपितभावात जाऊन बसल्यामुळे कर्ता झालात. आपल्या मूळ स्वभावात आलात तर स्वतः कर्ता असणारच नाही. 'मी केले' असे सांगितले म्हणून कर्ता झाला. म्हणजे कर्माला आधार दिला. आता जर स्वतः कर्ता नाही झाला तर कर्म गळून पडणार. निराधार केल्यावर कर्म पडणार. म्हणजे कर्तापणे आहे तोपर्यंत कर्म आहे.
'छूटे देहाध्यास तो नहीं कर्ता तू कर्म, नाही भोक्ता तू त्याचा, हे च धर्मचे मर्म.'
- श्रीमद् राजचंद्र. आता आपण 'मी चन्दुलाल आहे' असे समजून बसलात. म्हणून सगळे एकाकार होऊन गेले आहे. आत दोन वस्तु वेगळ्या वेगळ्या आहेत. आपण वेगळे आणि चन्दुलाल वेगळे आहे. पण आपण हे जाणत नाही, तोपर्यंत काय होणार? ज्ञानी पुरुष भेद विज्ञानाने वेगळे करून देतात, मग जेव्हा 'आपण' ('चन्दुलाल पासून) वेगळा होऊन जातो, तेव्हा आपल्याला' काही करायचे नाही, सगळे 'चन्दुलाल' करत राहिल.
(६) भेदज्ञान कोण करणार?
आत्मा-अनात्माचे वैज्ञानिक विभाजन ! जसे या अंगठीत सोनं आणि तांबं दोन्ही मिसळलेले आहेत, ते आपण गावात घेऊन जाऊन कोणाला ही सांगा कि, 'भाऊ, वेगळे वेगळे करून द्या ना' तर काय कोणीही करून देइल? कोण करून शकेल?
प्रश्नकर्ता : सोनारच करू शकेल.