________________
मी कोण आहे?
सगळ्यांना बोलायची असतात. त्या नंतर एक तासात पाच आज्ञा उदाहरणं देऊन सविस्तर समजावली जातात, कि आता बाकीचे जीवन कसे व्यतीत केले पाहिजे कि ज्यामुळे नवीन कर्म नाही बांधले जाणार आणि जूनी कर्म पूर्णपणे संपतील, त्याचबरोबर 'मी शुद्धात्मा आहे' हे लक्ष्य नेहमी राहिल.)
आवश्यकता गुरुची? ज्ञानीची? प्रश्नकर्ता : दादाजींना भेटण्या पूर्वी कोणाला गुरु मानले असेल तर? तर त्यांचे काय करायचे?
दादाश्री : त्यांच्याकडे जायचे. आणि जायचे नसेल तर नका जाऊ, तसे हे आवश्यक ही नाही. आपण जाऊ इच्छित असाल तर जा आणि नाही जाऊ इच्छित तर नका जाऊ. त्यांना दु:ख होऊ नये, म्हणून जायला हवे. आपण विनय राखला पाहिजे. इथे 'आत्मज्ञान' घेते वेळी मला कोणी विचारेल कि, 'आता मी गुरुंना सोडून देऊ?' तेव्हा मी सांगेन कि, 'नको सोडू, अरे, त्या गुरुच्या प्रतापामुळे तर इथपर्यंत पोहोचू शकलात.' गुरुमुळे मनुष्य काही मर्यादांमध्ये राहू शकतो. गुरु नाही तर मर्यादाही नाही राहणार. आणि गुरुना सांगायला पाहिजे कि मला ज्ञानी पुरुष मिळाले आहेत. त्यांचे दर्शन करण्यासाठी जात आहे.' काही लोक तर आपल्या गुरुना पण माझ्याजवळ घेऊन येतात, कारण गुरुनां पण पाहिजे ना. संसाराचे ज्ञान पण गुरुशिवाय नाही होत आणि मोक्षाचे ज्ञान पण गुरुशिवाय नाही होत. व्यवहाराचे गुरु 'व्यवहारासाठी' आहेत आणि ज्ञानी पुरुष 'निश्चया'साठी आहे. व्यवहार रिलेटिव आहे आणि निश्चय रियल आहे. रिलेटिवसाठी गुरु हवेत आणि रियल साठी ज्ञानी पुरुष हवेत.
(७) मोक्षाचे स्वरूप काय?
ध्येय केवळ हाच असायला हवे! प्रश्नकर्ता : मनुष्याचा ध्येय काय असायला हवे?