________________
मी कोण आहे?
प्रश्नकर्ता : हो, समजत आहे.
दादाश्री : एवढे समजले तरी मार्ग निघेल. हे लोक जे बोलतात ना कि, 'मी एवढे तप केले, एवढे जप केले, उपवास केला.' हा सगळा भ्रम आहे, तरी पण जग असेच्या असेच राहिल. अहंकार केल्याशिवाय नाही राहणार. स्वभाव आहे ना?
कर्ता, नैमित्तिक कर्ता...
प्रश्नकर्ता : जर वास्तवात स्वतः कर्ता नाही आहे, तर मग कर्ता कोण आहे? आणि त्याचे स्वरूप काय आहे?
दादाश्री : असे आहे, नैमित्तिक कर्ता तर स्वत:च आहे. स्वतः स्वतंत्र कर्ता तर नाहीच आहे पण नैमित्तिक कर्ता आहे. म्हणजे पार्लियामेन्ट्री पद्धतिने कर्ता आहे. पार्लियामेन्ट्री पद्धत म्हणजे? जसे पार्लामेन्टमध्ये सगळ्यांचे व्होटिंग होते आणि मग शेवटी स्वतःचे व्होट होते ना, त्याच्या आधारावर स्वतः म्हणतो कि हे तर मला करायला हवे. ह्या हिशोबाने कर्ता होतो. अशाप्रकारे योजनेचे सर्जन होते. योजना करणारा स्वत:च आहे. कर्तेपणा केवळ योजनेतच असतो. योजनेत त्याची सही आहे. पण संसारात लोक हे जाणत नाहीत. जसे छोट्या कम्प्युटर मध्ये फीड केलेले निघते आणि मोठ्या कम्प्युटर मध्ये फीड होते, अशाप्रकारे ही योजना सर्जन होऊन मोठ्या कम्प्युटर मध्ये जाते. मोठा कम्प्युटर हा समष्टि कम्प्युटर आहे. तो मग त्याचे विसर्जन करतो. म्हणून या जन्मातील पूर्णजीवन विसर्जन स्वरूपात आहे, ज्याचे सर्जन मागच्या जन्मी केलेले असते. म्हणून हा भव जन्मापासून ते मृत्युपर्यंत विसर्जन स्वरूपच आहे. स्वतःच्या हातात काहीही नाही, परसत्तेतच आहे. एकदा योजना झाली कि सर्व परसत्तेत जाते. (रूपक) परिणामात परसत्तेचा अमल चालतो. अर्थात् परिणाम वेगळा आहे. परिणाम परसत्तेच्या आधीन आहे. आपल्याला समजते? ही गोष्ट फार खोल वरची आहे.