________________
मी कोण आहे?
दादाश्री : नाहीतर मग म्हणणार. 'स्टार्स फेवरेबल (ग्रह अनुकूल) नाहीत.' नाहीतर मग 'हिस्सेदारचे तोंड वाकडे आहे.' असे म्हणणार. नाहीतर 'सून पांढऱ्या पायाची आहे' असे म्हणणार. पण आपल्या डोक्यावर येऊ देत नाही. आपल्या डोक्यावर कधी गुन्हेगारी घेत नाही. याबद्दल एका फॉरिनर बरोबर माझी बातचीत झाली होती. त्यांनी विचारले कि, 'तुमचे इन्डियन लोक गुन्हा आपल्या डोक्यावर का नाही येऊ देत?' मी सांगितले. 'हीच तर इन्डियन पझल आहे. इन्डियाची सगळ्यात मोठी पझल (कोडं) असेल तर हीच आहे.'
सायन्टिफिक सरकमस्टेन्शियल एविडन्स! म्हणून बातचीत करा, जे काही बोलायचे असेल ते सगळे बोला. अशी वार्तालाप करा, कि ज्यामुळे सगळा खुलासा होईल.
प्रश्नकर्ता : हा, 'सायन्टिफिक सरकमस्टेन्शियल एविडन्स' समजला नाही.
दादाश्री : हा सगळा सायन्टिफिक सरकमस्टेन्शियल एविडन्स (वैज्ञानिक सांयोगिक पुरावे) ह्यावर आधारीत आहे. संसारात एक पण परमाणु चेंज (बदल) होऊ शकतो असे नाही, आता आपण जेवण करायला बसलात, तेव्हा आपल्याला माहीत नसते कि मी काय खाणार आहे? बनविणाऱ्याला नाही माहीत कि उद्या जेवणासाठी काय बनवायचे आहे? हे कसे होऊन जाते, हाच आश्चर्य (कोडं) आहे. आपण किती खाऊ शकता आणि किती नाही, हे सगळे, परमाणुमात्र, निश्चित आहेत.
आपण आज मला भेटलात ना, हे कशाच्या आधारे भेटलात? ऑन्ली सायन्टिफिक सरकमस्टेन्शियल एविडन्स आहे. अति अति गुह्य कारण आहे. ते कारण शोधून काढा.
प्रश्नकर्ता : पण ते शोधायचे कशाप्रकारे?