________________
मी कोण आहे?
माझे आहे' तो जीवात्मादशा आणि 'मीच आहे आणि माझे काही नाही' ती परमात्मदशा. अर्थात् 'My' मुळे मोक्ष नाही होत. 'मी कोण आहे' ह्याचे ज्ञान झाल्यावर 'My' सुटते. 'My' सुटले तर सगळे सुटले.
'My' इज रिलेटिव डिपार्टमेन्ट एन्ड 'I' इज रियल. अर्थात् 'I' टेम्पररी नसतो. 'I' इज परमनेन्ट. 'My' इज टेम्पररी म्हणजे आपल्याला 'I' शोधून काढायचा आहे.
(४) संसारात उपरी कोण?
ज्ञानीच ओळख करून देईल 'मी' ची! प्रश्नकर्ता : 'मी कोण आहे' हे ओळखायची जी गोष्ट आहे. ती या संसारात राहून कशी शक्य होऊ शकते?
दादाश्री : तर कुठे राहून जाणू शकतो त्याला? संसाराशिवाय आणि कुठली जागा आहे जेथे राहू शकतो? ह्या जगात सगळे संसारीच आहेत आणि सगळे संसारातच राहतात. इथे 'मी कोण आहे' हे जाणण्यास मिळेल असे आहे. 'आपण कोण आहात' हेच विज्ञान समजायचे आहे इथे. इथे या, आम्ही आपल्याला ओळख करून देऊ.
आणि हे जे काही आम्ही तुम्हाला विचारतो ते असे नाही सांगत कि आपण असे करा. आपल्याने होईल असे ही नाही. अर्थात् आम्ही तुम्हाला सांगतो कि आम्ही सगळे करून देतो. म्हणून आपण चिंता करू नका. हे तर प्रथम समजून घ्या कि वास्तवात 'आपण' काय आहोत आणि काय जाणणे योग्य आहे? खरी गोष्ट काय आहे? करेक्टनेस काय आहे? दुनिया काय आहे? हे सगळे काय आहे? परमात्मा काय आहे?
परमात्मा आहे? परमात्मा आहेच आणि तो आपल्या जवळ आहे. बाहेर कुठे शोधतात? पण कोणी हा दरवाजा खोलून देईल तर दर्शन घेऊ ना. हा दरवाजा असा बंद झाला आहे कि स्वतः उघडू शकू. असे नाहीच