________________
मी कोण आहे?
आहात, 'I' आपण स्वतःच आहात. त्याचा शोध तर करायला हवा ना? अर्थात् हा सोपा मार्ग आहे ना? 'I' आणि 'My' वेगळे केले तर?
प्रश्नकर्ता : तसा मार्ग सोपा आहे, पण तो सूक्ष्मतर आणि सूक्ष्मतम पण वेगळे होणार तेव्हा ना? हे ज्ञानी शिवाय नाही होणार ना?
दादाश्री : हो, हे ज्ञानी पुरुष सांगतिल. म्हणून आम्ही सांगतो ना, Separate 'I' आणि 'My' with ज्ञानीझ सेपरेटर त्या सेपरेटरला शास्त्रकार काय म्हणतात? भेदज्ञान म्हणतात. भेदज्ञाना शिवाय आपण कसे वेगळे करणार? काय काय वस्तु आपली आहे आणि काय काय वस्तु आपली नाही आहे ह्या दोन्हीचे आपल्याला भेदज्ञान नाही आहे. भेदज्ञान म्हणजे हे सगळे 'माझे' आहे आणि 'मी' वेगळा आहे त्यांच्यापासून, म्हणून ज्ञानी पुरुषांच्या जवळ, त्यांच्या सान्निध्यात राहिलात तर भेदज्ञान प्राप्त होईल आणि मग आपले ('I' आणि 'My') सेपरेट होऊन जाईल.
'I' आणि 'My'चा भेद केला तर खूप सोपे होईल ना हे? मी ही पद्धत सांगितली, त्यानुसार अध्यात्म सरळ आहे कि कठीण आहे? नाहीतर ह्या काळातील जीवांचे शास्त्र वाचून वाचून दम निघून जाईल.
प्रश्नकर्ता : आपल्यासारखे ज्ञानी पुरुषांची गरज भासणार ना, ते समझण्यासाठी तरी?
दादाश्री : हो, गरज भासणार, पण ज्ञानी पुरुष तर अधिक नसतात ना. पण जेव्हा कधी असतील. तेव्हा आपण आपले काम करून घ्या. ज्ञानी पुरुषाचे 'सेपरेटर' घ्या एकाद्या तासासाठी. त्याचे भाडे-बिडे नसते. त्याने सेपरेट करून घ्या. त्याने 'I' वेगळा होईल नाहीतर नाही होणार ना, 'I' वेगळा झाल्यावर सगळे काम होऊन जाईल. सर्व शास्त्रांचे सार इतके च आहे.
आत्मा व्हायचे असेल तर 'माझे' (माय) सगळे काही समर्पित करावे लागेल. ज्ञानी पुरुषाला 'My' सोपवले तर एकटा 'I' आपल्याजवळ राहिल. 'I' विथ 'My' त्याचे नांव जीवात्मा. 'मी आहे आणि हे सगळे