________________
मी कोण आहे?
दादाश्री : माझी बुद्धि म्हणतात ना ?
प्रश्नकर्ता : हो.
७
दादाश्री : माझे चित्त म्हणतात ना ?
प्रश्नकर्ता : हो.
दादाश्री : आणि 'माय ईगोइझम' बोलतात कि ‘आय एम ईगोईझम' बोलतात ?
प्रश्नकर्ता : 'माय ईगोइझम' (माझा अहंकार).
दादाश्री : ‘माय ईगोइझम' म्हणाल तर त्याला वेगळे करू शकाल. पण त्याच्या पुढे जे आहे, त्याच्यात तुमचा हिस्सा काय आहे, हे आपण नाही जाणत. म्हणून मग पूर्णपणे सेपरेशन नाही होऊ शकत. आपण, आपले काही हद्दीपर्यंतच जाणू शकता. आपण स्थूल वस्तुच जाणता, सूक्ष्मची ओळखच नाही आहे. सूक्ष्मला वेगळे करणे, परत सूक्ष्मतर वेगळे करणे, परत सूक्ष्मतम वेगळे करणे हे तर ज्ञानी पुरुषांचे च काम आहे. पण एक एक करून सारे स्पेरपार्टस बाद करत गेले तर. 'I' आणि 'My', दोन्ही वेगळे होऊ शकतात ना? 'I' आणि 'My'. दोन्ही वेगळे केल्यावर शेवटी काय राहणार? 'My 'ला एका बाजुला ठेवले तर शेवटी काय उरणार?
प्रश्नकर्ता : 'I' (मी).
दादाश्री : हो 'I' तेच आपण आहात. बस, या 'I' लाच रियलाइज करायचे आहे.
प्रश्नकर्ता : तर सेपरेट करून हे समजायचे कि जे बाकी राहिले तो 'मी' आहे?
दादाश्री : हो, सेपरेट करून जे बाकी राहिले, ते आपण स्वतः