________________
मी कोण आहे?
भिंतीला कान लावून ऐकतो. आम्ही सांगतो कि, 'भाऊ, भिंत आपल्याला काय सांगत आहे?' तेव्हा सांगता, 'नाही भिंत नाही, आंत माझी गोष्ट चालू आहे, ती मी ऐकत आहे. कोणाची गोष्ट चालू आहे?' तेव्हा सांगता, 'चन्दुलाल ची. अरे पण आपण चन्दुलाल नाही आहात.' जर आपण आत्मा आहात तर चन्दुलाल ची गोष्ट आपल्यावर नसती घेतली.
प्रश्नकर्ता : वास्तवात तर 'मी आत्माच आहे' ना?
दादाश्री : अजून तुम्ही आत्मा झालात नाही ना? चन्दुलालच आहात ना? 'मी चन्दुलाल आहे' हा आरोपितभाव आहे. आपल्याला 'मी चन्दुलाल आहे' अशी बिलीफ (मान्यता) घर करून राहिली आहे, ही राँग बिलीफ (चुकीची मान्यता) आहे.
(2) बिलीफ, राँग-राइट
किती साऱ्या [ग बिलीफ 'मी चंन्दुलाल आहे' ही आपली मान्यता, ही बिलीफ तर रात्री झोपेतही नाही हटत ना! मग लोक आपले लग्न करून आपल्याला सांगतात, 'तुम्ही तर या स्त्रीचे पति आहात' म्हणून आपण असे स्वामीत्व मानले. मग 'मी हीचा पति आहे, पति आहे' करत राहिले. कोणी नेहमीच पति असतो का? डायवोर्स झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तीचा पति राहिल का? अर्थात् ह्या सगळ्या राँग बिलीफ झालेल्या आहेत.
'मी चन्दुलाल आहे' ही राँग बिलीफ आहे. मग ‘ह्या स्त्रीचा पति आहे' ही दूसरी राँग बिलीफ, 'मी वैष्णव आहे ही तिसरी राँग बिलीफ'. 'मी वकील आहे' ही चौथी [ग बिलीफ, 'मी ह्या मुलाचा फादर (पिता)
आहे' ही पांचवी राँग बिलीफ. 'ह्याचा मामा आहे' ही सहावी राँग बिलीफ. 'मी गोरा आहे' ही सातवी राँग बिलीफ. 'मी पंचेचाळीस वर्षाचा आहे', ही आठवी राँग बिलीफ. 'मी ह्याचा भागीदार आहे' ही पण राँग बिलीफ.