Book Title: Mi Kon Mahe
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 11
________________ मी कोण आहे ? कि दुकानाचे नांव ठेवतात 'जनरल ट्रेडर्स', तर तो काही गुन्हा नाही. पण त्याच्या शेठला आपण सांगू कि 'ऐ ! जनरल ट्रेडर्स, इकडे ये.' तर शेठ काय म्हणतील कि ‘माझे नांव तर जयंतीलाल आहे आणि 'जनरल ट्रेडर्स' तर माझ्या दुकानाचे नांव आहे.' अर्थात् दुकानाचे नांव वेगळे आणि शेठ त्यापासून वेगळे, माल वेगळा, सगळे वेगळे वेगळे असते ना? आपल्याला काय वाटते? प्रश्नकर्ता : बरोबर आहे. दादाश्री : परंतु येथे तर, 'नाही, मीच चन्दुलाल आहे' असे सांगाल, अर्थात् दुकानाचे बोर्ड पण मी, आणि शेठ पण मीच. आपण चन्दुलाल आहात, हे तर ओळखण्याचे साधन आहे. परिणाम होतो, तर आत्मस्वरूप नाही आपण चन्दुलाल बिलकुल नाही असे पण नाही. आपण आहात चन्दुलाल, पण ‘बाय रिलेटिव व्यू पोइन्ट' (व्यावहारिक दृष्टि)ने, यू आर चन्दुलाल इज करेक्ट. प्रश्नकर्ता : मी तर आत्मा आहे, पण नांव चन्दुलाल आहे. दादाश्री : हो, पण आता 'चन्दुलाल' ला कोणी शिवी दिली तर 'आपल्यावर' परिणाम होणार कि नाही? प्रश्नकर्ता : परिणाम तर होणारच. दादाश्री : तर मग आपण 'चन्दुलाल' आहात, 'आत्मा' नाही आहात. आत्मा असता तर आपल्यावर परिणाम नसता झाला, आणि परिणाम होतो, म्हणूनच आपण चन्दुलाल आहात. चन्दुलालच्या नांवाने कोणी शिव्या दिल्या तर आपण त्याला पकडतो. चन्दुलालचे नांव घेऊन कोणी उलट-सुलट बोलले तर आपण

Loading...

Page Navigation
1 ... 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62