Book Title: Marathi - Latche marathi Aetihasik Lekh Part 02
Author(s): Vidyanand Swami Srivastava
Publisher: Aietihasik Gaurava Granthmala
View full book text
________________
[ लाटच मराठी
No. 27.
पान १
नंबर ६
राजश्री वीरमींग संस्थान वासदे गोसावी यांसी:
अखंडीत लक्ष्मी अलंकृत राजमान्य स्नो॥ गणश विश्वनाथ अशीरवाद विनंती उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जाणे विशेष तुम्हांकडून पत्र आले ते पावले लिहीला मजकूर कळला व आनंदराव यानी जवानी सांगितली त्यावरुन सविस्तर कळले ऐशास सरकारांतून संस्थानचे ठाणे बसवावयास राजश्री बावाजी जाधव पाठविले आहेत त्यास तुम्ही साल गुदस्त ऐवज सरकारांत द्यावयाचा करार केला आहे. त्या प्रमाणे ऐवजाचा निकाल करुन देत असता तरी ठाणे तुमचे हवाली केले जाईल, सरकारचे ठाणे न बसविल्यास बंदोबस्त होऊन ठाणे याचे तुमच्याने होत असल्यास बंदोवस्त करून राहावे आणि सरकारांत ऐवज द्यावयाचा करार आहे. त्यापैकी तुर्त निमे ऐवज
द्यावा.
या प्रमाणे करावे ।। छ २४ जमादीलाकर सु॥ इसने समानीन मया व अलफ बहुत काय लिहीणे लोभ किजे हे विनंती.
श्री श्रीमंतपंत प्रधान चरणी तत्पर गणेश विश्वन थ निरंतर.
मोर्तब सुद.
Nos. 27.
Ganesh Viswanath writes, on 24th Jamadialakhar, San Isane Samanin Maya Alaf (1181), to Birsingh of Bansda:
“Received your letter and learnt all about the matter dealt with therein. Besides, I have also learnt much more, from Anand Rao. Hewever Rajashree Babaji Yadav, has been deputed by the Government, to establish its Thana, at. Bansda. If you will make payment of the Amal, according to the last years's assessments, the Thang will be made over to you. You have written that Govern
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com