Book Title: Marathi - Latche marathi Aetihasik Lekh Part 02
Author(s): Vidyanand Swami Srivastava
Publisher: Aietihasik Gaurava Granthmala

View full book text
Previous | Next

Page 144
________________ २०४ पान १ No. 105. [ लाट चेमराठी Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat नंबर १६५ श्री. माहाराज श्री रायसींगजी संस्थान वांसदे साहेबाचे शेवेसी. अखंडीत लक्ष्मी अलंकृत राजमान्य आज्ञाधारक शाहाजी देशमुख तर्फ सुरगाणे राम राम विनंती येथील क्षेम जाणोन साहेवी नीजानंद लेखन आज्ञा केला पाहिजे यानंतर घाटा वरुन दुसरी फौज येत उंटे लुटली कोण कोठे जातो तपसीलवार म्हणोन लिहीले त्यासी सेलुकरयाचे माग थोरली फौज कोन्ही सध्या दिसत नाहीं कोन्हाचे पाच सातशे स्वार जानारी वर होते त्यानी सेलुकरयाची व आपली नीकर झाली हे वर्तमान ऐकूण कोडइवारीचे रस्त्याने गेले ऐसे ऐसे ऐकतो विटली यांचे मात्र दाहा बारा घोडी व एक ग्रहस्थ मात्र आज सुरंगान्यास आपल्या तलुकाने आला तो पुढे आपल्या मार्गी येईल सेलुकर दगलबाज भुलथाप देऊन घाट उतरला सुरगाणे येथे मुक्काम करुन आम्हांसी भानगड़ लाविली की तुमचे तलुका खेरी ज कुच करावयाचा नाहीं आम्हांस युक्ती प्रयुक्तीने धर्मपूरचे मागीं पार करून द्यावे कोन्हाचे सुललीचे तोडयास सुद्धां हात लावावयाचा नाहीं ऐसा मास मासऊन पाहोटेस नगारा वाजवितां कुच केला सात माली उतरोन आगाऊ गेली तेव्हां बातमी पालविहारीस समजल्यावर त्याचे पाठीशी घावणे केले बारीचा बंदोवस्त आगाऊ करावा ते झाले नाहीं ते पुढे आम्ही त्याचे मागे लागलो या मुले तो लबाडीने पार पडला वीवरची देकर जुलची खराबी केली आपले पत्र त्या घालमेलीत आले ऐसे ऐकीले परंतु आम्हांस पावले नाहीं ऐशा कामास मुजरद जासुदा समागमे पत्र || ते न आले आसो जे घडणार ते घडले परंतु अथः पर आम्ही सावधच आहोत फौजें चे वर्तमान आली यास लिहीत जाऊं त्या प्रत मदत आसावी वरकड फौजा या मार्गानी येऊ लागल्यास ठीक नाहीं सेलुकर याचे पाच सात माणसे देर जालली त्यांत दडून टाकीले होते व साहा घोडी मारले पडली इतकी मौज पाहिली या परीने तेथे कांही जखमी व दडीन आडले आसल्यास लिहावे तेथे जखमी माणसे व घोडे जखमी व दडीन आडले असतील ते जरूर लिहावे हे विनंती. No. 105 Shahaji Deshmukh of Sarguna writes to Maharawal Raisingh of Banada, regarding the presence of Seluskar with his detachment. He also depicts the troubles which he felt due to the presence of Seluskar with his army. He accuses him as unrealible and delares him as cheat and traitor." www.umaragyanbhandar.com

Loading...

Page Navigation
1 ... 142 143 144 145 146 147 148 149 150 151 152 153 154 155 156 157 158 159 160 161 162 163 164 165 166 167 168 169 170 171 172