Book Title: Marathi - Latche marathi Aetihasik Lekh Part 02
Author(s): Vidyanand Swami Srivastava
Publisher: Aietihasik Gaurava Granthmala
View full book text
________________
[लाटचे मराठी
हिसाचा ऐवज सालावाद प्रमाणे साल मजकूर सन समान तीमेनचा येणे त्या बंदल पेशजी राजश्री बाबूराव गोपाल यांजकडे जस्पीचे काम सांगित होते त्या प्रमाणे मशानिने कडे करार असे तरी साल मजकूरचे चौथाईचा ऐवज मशारनिले कंद वसूल देणे त।। छ । जीलकाद सन समान तीसेन बहुत काय लिहीण लोभ किजे हे विनंती. . . . . .
No. 87.
Subedar Anand Rao Bhikaji writes, on 5th Jilkad 1198 Arba. to Rai Singh the Raja of Bansda :
"The Government due, according to the prevalent annual Accessment, for the current year, is entrusted to Baboo Rao Gopal. you are therefore, directed to pay the amount to him."
No. 88.
पान १
नंबर ५०
गणपतीचरणीतत्पर .हरी चिंतामणनिरंतर
राजश्री रायसींग राजे संस्थान वासदे गोसावी यांसः
अखंडीत लक्ष्मी आलंकृत राजमान्य श्नो।। हरी चिंतामण आसीर्वाद विनंती उपरी येथील कुशल जाणुन स्वकीये कुशल लिहीत जावे विशेष संस्थान मजकूर येथील मौजे चापलधरा वगैरे चार गांव यांची जत्पी राजश्री गोविंदराव गायकवाड सेना खासखेल समसेर बहादर याणी केली त्यास त्या गांवच्या सोड चिठया व तुमचे नांवे पत्र व भगवंत गव गायकवाड यांन कडे जत्पीचे काम काज त्याजला पत्र एकूण तीन पत्रे सेना खास खेल यांची घेऊन अजम भीका मेहेरजी खेरगांवकर याज कडे पाठविली आहेत ते गांवची दखल घेतील तुम्ही च्यार गांव पोहींचल्याचे कबजा देण च्यार गांवचे वसुलाची रूजूवात झाली पाहिजे याज करितां गांवचे काम काज भीका मेहेरजी यांज कडे सांगितले. असे तरी हे दीकत कवजा देणे. त।। छ ३ जमादीलावल सु। तोस सीतेन मया व आलफ बहुत काय लिहीणे हे विनती. ..
मोर्तव ।। सुदः
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com