________________
क्रोध
३
वास्तवात निर्बलाचे रक्षण करायला हवे आणि बलवानाचा सामना करायला हवा. पण ह्या कलियुगात असे मनुष्यच नाही राहिलेत. आता तर निर्बलालाच मार मार करतात आणि बलवानापासून पळतात. फार कमी लोकं अशी आहेत जी निर्बलाचे रक्षण करतात. आणि बलवानाचा प्रतिकार करतात. असे असेल तर तो क्षत्रियगुण म्हणावा लागेल. बाकी, सगळा संसार कमजोराला मारत राहतो. घरी जाऊन पुरूष बायकोवर बहादुरी दाखवतो, खुंटीला बांधलेल्या गाईला मारले तर ती कुठे जाणार? आणि सोडून मारलेत तर ? पळून जाईल, नाहीतर सामना करेल.
जो मनुष्य स्वत:ची शक्ति असली तरी समोरच्याला नाही सतावत, आपल्या दुश्मनाला सुद्धा नाही सतावत, त्याचे नांव बहादुरी आहे. आता जर आपल्यावर कोणी क्रोध करत असेल आणि आपण त्याच्यावर क्रोध केला तर त्याला कायरता नाही म्हणायची? अर्थात् माझे काय म्हणणे आहे कि, हे क्रोध - मान-माया - लोभ (कषाय), ही सगळी निर्बलता आहेत. जो बलवान आहे, त्याला क्रोध करायची जरूरच कुठे आहे? पण हा क्रोधाचा जो रूबाब आहे, त्या रूबाबाने समोरच्याला वश करायला जातात, पण ज्याला क्रोध नाही येत, त्याच्या जवळ दुसरे काहीतरी असेलच, हे बरोबर ना? त्याच्या जवळ ‘शील' नांवाचे जे चारित्र्य आहे, त्याने जनावर सुद्धा वश होतात, वाघ, सिंह, दुश्मन पूर्ण लश्कर सगळेच वश होतात!
क्रोधी तर अबला च
प्रश्नकर्ता : पण दादाजी, जर कोणी मनुष्य कधी आपल्यावर तापला तर काय करायचे?
दादाश्री : तापणारच ना, त्याच्या हाताची गोष्ट थोडीच आहे? त्याच्या आतील मशिनरीवर त्याचा अंकुश नाही ना ! हे तर जसे- तसे करून आतील मशिनरी चालत राहते. आपला ताब्यात असेल तर मशिनरी गरम होऊच देणार नाही ना. ही थोडीसी पण गरम होणे म्हणजे गाढव होऊन