________________
क्रोध दादाश्री : दिसणे बंद होते म्हणून. मनुष्य भिंतीला कधी आपटणार? जेव्हा भिंत नजर नाही येणार, तेव्हा आपटणार ना? अशाप्रकारे दिसणे बंद होऊन जाते, म्हणून मनुष्य क्रोधित होऊन जातो. पुढचा रस्ता नाही मिळाला कि क्रोध येतो.
सूझ नाही पडत तरी क्रोध क्रोध कधी येतो? तेव्हा म्हणेल, दर्शन(सूझ) अटकते, म्हणून ज्ञान अटकते. त्यामुळे क्रोध उत्पन्न होतो. मान पण असा आहे. दर्शन अटकते, म्हणून ज्ञान अटकते, म्हणून मान ऊभा होतो.
प्रश्नकर्ता : उदाहरण देउन समजावले तर अधिक स्पष्ट होईल.
दादाश्री : आपली लोक नाही म्हणत कि, 'का एवढे रागवलात' तेव्हा म्हणतात कि, 'मला सूझ पडत नाही म्हणून रागावलो.' हो जर सूझ पडली नाही, तर मनुष्य रागवतो. ज्याला सूझ पडेल तो रागवेल का? रागवायचे म्हणजे काय? हा राग पहिले इनाम कोणाला देणार? तर ज्याला राग आला त्याला आधी जाळणार, नंतर दुसऱ्याला जाळणार.
क्रोधाग्नी जाळतो स्व-पर ला क्रोध म्हणजे स्वतः आपल्या घराला आग लावणे. स्वत:च्या घरात गवत भरलेले असेल आणि काडी लावणे, त्याचे नांव क्रोध. अर्थात् पहिले स्वतः जळणे आणि नंतर शेजाऱ्यांना जाळणे.
गवताचे मोठ मोठे गढे एखाद्याच्या शेतात गंजी केलेले आहेत, पण त्यावर एकच काडी टाकली तर काय होईल?
प्रश्नकर्ता : जळून जाईल.
दादाश्री : असेच एक वेळ क्रोध केल्याने, दोन वर्षाची जी कमाई(साधना) केलेली असेल ती मातीत मिळून जाते. क्रोध म्हणजे प्रकट