________________
क्रोध
१६
त्याचा परिणाम आहे. आता तो जे जे दोष करेल, ते मनावर घ्यायचे नाहीत, तर मग त्याच्या प्रति जो क्रोध आहे तो बंद होऊन जाईल. पण थोडे पूर्व परिणाम आहेत, तेवढे आल्यानंतर दुसरे पुढे बंद होऊन जातील.
प्रश्नकर्ता : दुसऱ्यांचे दोष पाहतो म्हणून क्रोध येतो?
दादाश्री : हां. दोष पाहत आहोत, तेही आपण जाणूया कि, हे चुकीचे परिणाम आहेत. जेव्हा हे चुकीचे परिणाम दिसायचे बंद होतील, त्यानंतर क्रोध बंद होऊन जाईल. आम्ही दोष बघणे बंद केले, म्हणून सगळे बंद झाले.
क्रोधाच्या मूळात अहंकार
लोकं विचारतात कि, 'ह्या आमच्या क्रोधासाठी काय औषधोपचार करायचा?' मी सांगितले, 'आता आपण काय करता?' तेव्हा म्हणतात, 'क्रोध दाबत राहतो.' मी विचारले, 'ओळखून दाबता कि न ओळखता ? क्रोधाला ओळखायला तर हवे ना?' क्रोध आणि शांति दोन्ही जवळ जवळ बसतात. आता आपण क्रोधाला नाही ओळखले तर तो शांति ला दाबणार. तर शांति मरून जाईल. अर्थात् दाबण्यासारखी चीज नाही. तेव्हा त्याला समजते कि क्रोध अहंकार आहे. आता कुठल्या प्रकारच्या अहंकाराने क्रोध होतो याची सविस्तर चौकशी करायला हवी.
ह्या मुलाने ग्लास फोडला तर क्रोध आला, इथे आमचा कोणता अहंकार आहे? ह्या ग्लासाचे नुकसान होईल असा अहंकार आहे. नफानुकसानचा अहंकार आहे आपला. म्हणून नफा-नुकसानाच्या अहंकाराला, त्यावर विचार करून निर्मूळ करा. खोट्या अहंकारचा संग्रह केल्याने क्रोध येत राहणार. क्रोध आहे, लोभ आहे, हे तर मूळात अहंकारच आहे.
क्रोधाचे शमन, कुठल्या समजुतीने ?
क्रोध स्वत:च अहंकार आहे. आता याचा तपास करायला हवा कि,