________________
क्रोध मुलांच्या हितासाठी स्वतःशी संघर्ष केला. मुलाच्या सुखासाठी स्वतःशी संघर्ष केला, म्हणून पुण्य बांधले. बाकी सगळ्या प्रकारचा क्रोध पापच बांधतो. हा एकच प्रकार आहे कि, जो मुलाच्या किंवा शिष्याच्या भल्यासाठी क्रोध करतात. ते आपले बाजूला ठेवून त्यांच्या सुखासाठी करतात, म्हणून पुण्य बांधतात. तरीपण लोकं तर त्याला अपयशच देत असतात. पण ईश्वराच्या घरी खरा न्याय आहे कि नाही? आपल्या मुलावर, मुलीवर जे क्रोध करतात ना, त्यात हिंसकभाव नाही होत. बाकी सगळ्यात हिंसकभाव असतो. तरीपण यात तांता तर असतोच, कारण त्यांना मुलीला पाहिल्या बरोबर च आत क्लेश सुरू होतो.
जर क्रोधामध्ये हिंसकभाव आणि तांता, ह्या दोन नसतील, तर मोक्ष मिळतो. आणि जर हिंसकभाव नाही, फक्त तांता आहे, तर पुण्य बांधतात. कसे सूक्ष्मतेने भगवानने शोधून काढले आहे.
क्रोध केला तरीपण बांधतात पुण्य भगवानने सांगितले आहे कि दुसऱ्याच्या भल्यासाठी क्रोध केला, परमार्थ हेतु क्रोध केला तर त्याचे फल पुण्य मिळते.
आता ह्या क्रमिक मार्गात तर शिष्य घाबरत राहतात कि, 'आता काही सांगतिल, आता काही सांगतिल' आणि ते (गुरू) पण पूर्ण दिवस सकाळपासून अकडून बसून राहतात. तर थेट दहाव्या गुणस्थानापर्यंत तसाच वेष, त्यांनी डोळे लाल केले तर आत आग झरते. किती साऱ्या वेदना होत असतील. तेव्हा कसे पोहोचणार? म्हणून मोक्ष मिळवणे काय असेच लाडू खायचा खेळ आहे? हे तर कधीतरी असे अक्रम विज्ञान प्राप्त होते.
क्रोध म्हणजे एक प्रकारचे सिग्नल संसारातील लोक काय म्हणतात कि, या भाऊने मुलावर क्रोध केला, म्हणून तो गुन्हेगार आहे आणि त्याने पाप बांधले. भगवान असे नाही म्हणत, भगवान म्हणतात कि, 'मुलावर क्रोध नाही केला, म्हणून त्याचा