________________
क्रोध
२७
साफ होऊन जातो. अतिक्रमण केले म्हणून प्रतिक्रमण केल्याने साफ होऊन जातो. अतिक्रमण केले म्हणून प्रतिक्रमण करा.
प्रश्नकर्ता : कोणा वर क्रोध केल्यानंतर लक्षात आले आणि त्याच क्षणी आपण त्यांची क्षमा मागितली, तर त्याला काय म्हणावे ?
दादाश्री : आता ज्ञान घेतल्यानंतर क्रोध आला आणि मग माफी मागितली, तर काही हरकत नाही, मुक्त झालात. आणि अशी रूबरूमाफी नाही मागू शकलात असे असेल तर मनात माफी मागा, तर झाले.
प्रश्नकर्ता : रूबरू सगळ्यांच्या मध्ये ?
दादाश्री : असे रूबरू कोणी नाही मांगत तर हरकत नाही आणि अशीच आतून माफी मागितली तरी चालेल. कारण हा गुना जिवंत नाही, हा डिस्चार्ज आहे. ‘डिस्चार्ज’ गुन्हा म्हणजे हा जिवंत गुन्हा नाही. म्हणून इतके वाईट फळ नाही देत.
प्रतिष्ठामुळे कषाय ऊभे
हा सगळा व्यवहार आपण नाही चालवत, क्रोध - मान-माया-लोभ हे सगळे कषाय चालवते. कषायांचे राज्य आहे. 'स्वतः कोण आहोत' याचे भान आल्यावर कषाय जाणार. क्रोध आल्यावर पश्चाताप होणे, पण भगवानने सांगितलेले प्रतिक्रमण नाही येत तर काय होईल? प्रतिक्रमण आले तर सुटका होऊन जाते.
अर्थात् ही क्रोध-मान-माया - लोभ ची सृष्टि कुठपर्यंत ऊभी आहे? 'मी चन्दुलाल (वाचकांनी चन्दुलालच्या जागी आपले नांव समजावे) आहे आणि असाच आहे' असा निश्चय आहे, तोपर्यंत ऊभी राहणार. जो पर्यंत आपण प्रतिष्ठा केलेली आहे कि 'मी चन्दुलाल आहे' लोकांनी आमची प्रतिष्ठा केली आणि आपण पण मानले कि 'मी चन्दुलाल आहे' तोपर्यंत हे क्रोध-मान-माया - लोभ आत राहतात.