________________
३४
क्रोध तयार करणे जरूरी आहे? जर जरूरी आहे तर त्यासाठी काय करायला हवे?
दादाश्री : असे आहे ना, जर क्रोध-मान-माया-लोभ, हे चार (कषाय) निघून गेले तर तो भगवान झाला.
भगवंताने काय सांगितले आहे कि, तुझा क्रोध असा आहे कि, तुझ्या सख्या मामावर क्रोध करतो तर त्याचे मन तुझ्यापासून वेगळे होते, आयुष्यभरासाठी वेगळे होऊन जाते. तर तुझा क्रोध चुकीचा आहे. तो क्रोध जे मनाला वेगळा करतो वर्ष दोन वर्षासाठी. जो मनाला ब्रेकडाऊन करतो, त्याला अंतिम कक्षाचा यूजलेस (निकम्मा) क्रोध म्हटले आहे, त्याला अनंतानुबंधी क्रोध म्हटले आहे. आणि लोभ पण असा, परत मान, ते सगळे असे कठीण होतात कि ते संपल्यानंतर मनुष्य योग्य ठिकाणावर येतो आणि गुणस्थान प्राप्त करतो. नाहीतर गुणस्थानात ही नाही येत. क्रोध-मान-मायालोभ, हे चार अनंतानुबंधी कषाय गेले तरी खूप झाले.
आता हे कधी जाणार? 'जिन'कडून ऐकले, तर ते जाणार. 'जिन' म्हणजे आत्मज्ञानी. तो कुठल्याही धर्माचा आत्मज्ञानी असूदे. वेदान्तचा असूदे, जैनचा असूदे, पण आत्मज्ञानी असला पाहिजे. त्याच्याकडून ऐकले तर श्रावक होणार. आणि श्रावक झाल्यावर त्याचे अनंतानुबंधी कषाय जातात. मग आपोआपच क्षयोपशम होत राहतो.
__ आता दुसरा उपाय हा आहे कि, आम्ही त्याला भेदज्ञान करून देतो. तेव्हा सारे कषाय निघून जातात, संपून जातात. हे या काळाचे आश्चर्य आहे. म्हणून याला 'अक्रम विज्ञान' म्हटले आहे ना.
जय सच्चिदानंद