________________
३२
जाहलमाला Honey
क्रोध ह्या क्रोध-मान-माया-लोभाला तीन वर्ष जर खुराक नाही मिळाला तर मग स्वत:हून च पळून जातात, आम्हाला सांगावे लागत नाही. कारण प्रत्येक गोष्ट आपल्या आपल्या खुराकावर जिवंत आहे आणि संसारातील लोकं काय करतात? प्रतिदिन या क्रोध-मान-माया-लोभाला खुराक देत राहतात. प्रतिदिन भोजन देतात आणि मग ते (दोष) तगडे होऊन फिरत राहतात.
मुलांना मारतात, खूप क्रोध आल्याने मारतात, मग बायको म्हणते, 'बिचाऱ्या मुलाला का इतके मारले?' तेव्हा म्हणतात, 'तू नाही समजणार, मारण्या योग्यच आहे' यावर क्रोध समजून जातो कि, 'अरे वाह, मला खुराक दिला. चुक आहे असे नाही समजत आणि मारण्या लायक आहे असा अभिप्राय दिला आहे. म्हणून हा मला खुराक खायला देतो आहे.' याला खुराकच म्हणतो. 'क्रोध वाईट आहे' असे समजले तर त्याला खुराक नाही म्हणत. क्रोधाची तरफदारी केली, त्याची बाजू घेतली, तर त्याला खुराक मिळाला. खुराकामुळेच तो जगत आहे. लोकं त्याचा पक्ष घेतात ना !
क्रोध-मान-माया-लोभ कुठल्याही गोष्टीचे आम्ही (दादाजीने) रक्षण नाही केले. क्रोध आला तर कोणी म्हणेल कि, 'हे क्रोध का करतात?' तेव्हा मी म्हणेन कि, 'ही क्रोध खूप चुकीची गोष्ट आहे, माझ्या निर्बलतेमुळे झाले.' अर्थात् आम्ही रक्षण नाही केले. पण लोकं रक्षण करतात.
हे साधु तपकीर सुंगतात आणि आम्ही म्हणतो, 'साहिब, आपल्या सारखे तपकीर वापरता का?' तेव्हा जर ते म्हणाले, 'तपकीरची हरकत नाही' तर तो (दोष) वाढतो.
हे चारही, क्रोध-मान-माया-लोभ आहे, यातील एकावर प्रेम जास्त असेल, दुसऱ्यावर त्यापेक्षा कमी असेल, अशाप्रकारे ज्याची तरफदारी जास्त, त्याची प्रियता अधिक.