________________
क्रोध
प्रश्नकर्ता : त्याला कुणाची तरी मदत घ्यावी लागेल. दादाश्री : बांधलेल्याची हेल्प ( मदत ) घ्यायला हवी? प्रश्नकर्ता : स्वतंत्र असेल त्याचीच हेल्प घेतली पाहिजे.
३१
दादाश्री : मी कोणाला विचारतो कि भाऊ, कोणी आहे इथे सुटलेला? मुक्त आहे? तर आम्हाला इथे हेल्प करा. अर्थात् जो मुक्त झाला तो मुक्त करतो, बाकी दुसरा कोणी नाही करू शकणार.
क्रोध-मान-माया-लोभ यांचा खुराक
काही लोक जागृत असतात, ते म्हणतात कि हा जो क्रोध येतो तो आम्हाला पसंद नाही, तरीपण करावा लागतो. आणि काहीतर क्रोध करतात आणि म्हणतात, ‘क्रोध नाही केला तर आमची गाडी चालणार नाही, आमची गाडी बंद होऊन जाईल.' असे पण म्हणतात.
क्रोध-मान-माया-लोभ निरंतर स्वत:चाच चोरून खातात, पण लोकांना नाही समजत. या चारहिंना जर तीन वर्ष उपाशी ठेवले तर ते पळून जातील. पण ज्या खुराकाने ते जगतात तो खुराक काय आहे? जर हे नाही जाणले, तर ते कशाप्रकारे उपाशी मरणार? त्याची समज नसल्यामुळेच खुराक मिळतो. ते जगतात कशाप्रकारे ? आणि ते ही अनादि कालापासून जगत आहेत ! म्हणून त्यांचा खुराक (जेवण) बंद करा, असा विचार तर कोणालाही नाही येत आणि सगळे त्याचा पाठी लागून काढायला लागलेत. ते चारी असेच जाणाऱ्यातील नाहीत. ते तर आत्मा बाहेर निघाल्यावर आतील सगळे झाडून पुसून मग निघतील. त्याला हिंसक मार नाही पाहिजे, त्याला तर अहिंसक मार पाहिजे.
'तो तर
क्रोध होतो तेव्हा, आचार्य शिष्याला कधी धमकवतात? तेव्हा कोणी म्हणेल, 'महाराज याला का धमकवता?' तेव्हा महाराज म्हणातात, धमकवण्या योग्यच आहे' झाले, संपले ! असे म्हणतात तेच क्रोधाची खुराक. केलेल्या क्रोधाचे रक्षण करणे, हाच त्याचा खुराक.