________________
क्रोध
२९
भंग झाला, तिथे क्रोध होतो. क्रोध भोळा आहे. भोळा पहिला नष्ट होतो. क्रोध तर दारूगोळा आहे, आणि दारूगोळा असणार, तिथे लश्कर लढणारच. क्रोध गेला तर लश्कर का लढणार? मग तर ऐरे गैरे सगळे पळून जातील. कोणी ऊभा नाही राहणार.
-
क्रोधाचे स्वरूप
क्रोध उग्र परमाणु आहे. फटाक्याच्या आत बारूद भरलेला आहे आणि फुटला तेव्हा ज्वाला भडकते. आतील बारूद संपल्यावर आपणच फटाका शांत होऊन जाते. तसेच क्रोधाचे आहे. क्रोध उग्र परमाणु आहे, आणि ते जेव्हा ‘व्यवस्थित शक्ति' चा नियमाने फुटतात, तेव्हा चारी बाजूने पेटतात. फक्त उग्र राहतो त्याला आम्ही क्रोध नाही म्हणत, ज्या क्रोधामध्ये तांता राहतो, तोच क्रोध म्हणतात. क्रोध केव्हा म्हणतात कि आत जलन होते. जलन होते आणि ज्वाला भडकत राहते, दुसऱ्यांवरही त्याचा परिणाम होत असतो हे क्रोधाचे एक रूप (कढापा), आणि दूसऱ्या रूपात स्वतः एकटाच आतल्या आत जळत राहतो त्याला बैचेनी (अजंपा) म्हणतात. पण तांता तर दोन्ही रूपात असणार. तर उग्रता ही वस्तु वेगळी च आहे.
कुढने, सहन करणे, हा पण क्रोध
क्रोधाची वाणी नाही निघाली तर समोरच्याला नाही लागत. तोंडाने बोललात, त्यालाच क्रोध म्हणतात असे नाही, आत कुढत राहणे हा पण क्रोध आहे. अर्थात् सहन करणे हा तर डबल क्रोध आहे. सहन करणे म्हणजे दाबत राहणे, तो तर एक दिवस स्प्रिंग उडाली का कळेल. सहन का करायचे? याचा तर ज्ञानाने मार्ग शोधून काढला पाहिजे.
क्रोधात मोठी हिंसा
बुद्धि इमोशनल असते, ज्ञान मोशन (गती) मध्ये राहते. जशी ट्रेन मोशनमध्ये चालते, जर ती इमोशनल झाली तर ?