________________
क्रोध
स्वत:ची प्रतिष्ठा केव्हा समाप्त होणार कि 'मी शुद्धात्मा आहे' हे भान होईल तेव्हा. अर्थात् स्वत:च्या निज स्वरूपात आलात तर प्रतिष्ठा तुटून जाणार. तेव्हा क्रोध-मान-माया-लोभ जाणार नाहीतर नाही जाणार, मारत राहिले तरी नाही जाणार आणि उलट वाढत राहणार. एकाला मारले तर दुसरे वाढणार आणि दुसऱ्याला मारले तर तिसरा वाढणार.
क्रोध दुबळा तिथे मान तगडा एक महाराज म्हणतात, मी क्रोधाला दाबून निर्मूल करून टाकले. मी सांगितले, 'त्याचे परिणाम स्वरूप हे 'मान' नांवाचा रेडा अधिक तगडा झाला.' मान तगडा होत राहतो, कारण मायाची मुले ही मरणार असे नाही. त्यांचा उपाय केला तर जातील असे आहेत, नाहीतर जाणाऱ्यातील नाहीत. ती मायाची संतान आहेत. तो मान नांवाचा रेडा इतका तगडा झाला. जितके 'मी क्रोधाला दाबले मी क्रोधाला दाबले' म्हणतो, तर मग तो (मान) तगडा झाला. याच्या तुलनेत चारही समान होते, हे ठीक होते.
क्रोध आणि माया रक्षक आहेत क्रोध आणि माया. हे तर रक्षक आहेत. हे तर लोभ आणि मानाचे रक्षक आहेत. लोभाचा खरा रक्षक माया आणि मानाचा खरा रक्षक क्रोध. तरीपण मानासाठी थोडीसी माया करतात, कपट करतात. कपट करून ही मान प्राप्त करतात, असे करतात का लोक?
आणि क्रोध करून लोभ करतात. लोभी, क्रोधी नाही होत आणि जर क्रोध केला तर समजा कि त्याला लोभामध्ये काहीतरी बाधा आली आहे, म्हणून तो क्रोध करत आहे. उलट लोभीला शिव्या दिल्या तरी तो सांगेल 'भले ही कोणी आरडाओरडा केला पण आपल्याला तर रूपया मिळाला ना.' लोभी असे असतात. कारण कपट सगळ्यांचे रक्षण करेलच ना. कपट म्हणजे माया, आणि क्रोध, हे सगळे रक्षक आहेत.
आपल्या मानवर बाधा आली, तर मनुष्य क्रोध करतो. आपला मान