________________
२६
क्रोध
मनातही माफी मागा
प्रश्नकर्ता : दादाजी, पश्चाताप किंवा प्रतिकमण करतानां कित्येकदा असे होते कि, एखादी चुक झाली, तेव्हा आत दुःख होते कि, हे चुकीचे झाले, पण समोरच्याची माफी मागण्याची हिंमत नाही होत.
__दादाश्री : अशी माफी मागायचीच नाही. नाहीतर ते त्याचा दुरूपयोग करणार. 'हां. आता आले ना ठिकाणावर?' असे आहे हे, नोबल जात नाही. हा माफी मागण्यालायक मनुष्य नाही. म्हणून त्याच्या शुद्धात्म्याला आठवण करून मनात माफी मागा. हजारांत कोणी दहा लोकं अशी निघतील कि माफी मागायच्या आधीच झुकतील.
रोकडा परिणाम, हार्दिक प्रतिक्रमणाचे प्रश्नकर्ता : कोणावर भारी क्रोध आला, मग बोलून चूप झाले, नंतर हे जे बोललो त्यासाठी परत परत जीवाची जळ जळ होत राहते, तर त्यात एकापेक्षा अधिक प्रतिक्रमण करावी लागतील?
दादाश्री : त्यात दोन-तीन वेळा खऱ्या हृदयाने प्रतिक्रमण करा आणि असे एकदम पद्धतसर झाले तर पूर्ण झाले. 'हे दादा भगवान, मला जबरदस्त क्रोध आला, समोरच्याला खूपच दुःख झाला, त्याची माफी मागतो, आपल्याकडे खूप माफी मागतो.'
गुन्हा पण निर्जीव प्रश्नकर्ता : अतिक्रमणाने उत्तेजना होत असते, ती प्रतिक्रमणाने शांत होऊन जाते?
दादाश्री : हा, शांत होऊन जाते, चिकनी फाईल (गाढ हिशोब) असली, तर पाच पाच हजार प्रतिक्रमण करावे लागतात, तेव्हा शांत होतो. राग बाहेर नाही आला आणि व्याकुलता आली तरी, आपण त्यासाठी प्रतिक्रमण नाही केले, तर तेवढा दाग राहून जाणार. प्रतिक्रमण केल्यावर