________________
२४
क्रोध दादाश्री : क्रोध करून काय करायचे आहे? तो मनुष्य क्रोध स्वत:हून नाही करत, ही तर 'मिकेनिकल एडजस्टमेन्ट' (डिस्चार्ज होणारी मनुष्य प्रकृति) क्रोध करते. म्हणून मग स्वत:ला मनात पश्चाताप होतो कि, हो क्रोध नसता केला तर चांगले झाले असते.
प्रश्नकर्ता : त्याला थंड करण्यासाठी उपाय काय?
दादाश्री : हे जर मशीन गरम झाली असेल आणि थंड करायची असेल तर थोडा वेळ बंद केल्याने आपणच थंड होऊन जाईल आणि जर हात लावला किंवा त्याला छेडले तर आपण जळून जावू.
प्रश्नकर्ता : मला तर माझ्या पति वर क्रोध येतो, वाद होते, बाचाबाची होते सगळंच होते तर मी काय करू?
दादाश्री : क्रोध तू करते कि तो? क्रोध कोण करते? प्रश्नकर्ता : मी सुद्धा करते मग.
दादाश्री : तर आपल्याला स्वत:च आत विचारायला पाहिजे कि, 'तू असी का करतेस? आपण केलेले ते तर आपल्याला भोगावेच लागते ना.' पण प्रतिक्रमण केल्यावर सगळे दोष संपून जातात. नाहीतर आपणच दिलेले ठोसे आपल्याला मग भोगावे लागतात. पण प्रतिक्रमण केल्यावर जरा थंड पडतात.
__ ही तर एक प्रकारे पशुता प्रश्नकर्ता : आपल्याला क्रोध आला आणि शिवी निघाली तर कशाप्रकारे सुधारायचे?
दादाश्री : असे आहे कि हा जो क्रोध करतो आणि शिव्या देतो, हे स्वत:वर कंट्रोल नाही, म्हणून हे असे सर्व होते. कंट्रोल करण्यासाठी पहिले थोडे समजले पाहिजे. जर आपल्यावर कोणी क्रोध केला, तर