________________
क्रोध
स्थूल कर्म : सूक्ष्म कर्म स्थूल कर्म म्हणजे काय, हे समजावतो, तुला एकदम क्रोध आला, तू क्रोध करू इच्छित नव्हता तरीपण आला, असे होते कि नाही?
प्रश्नकर्ता : होते.
दादाश्री : हा क्रोध आला तर त्याचे फल इथेच लगेच मिळते. लोक म्हणतात कि, 'जाउदे ना त्याला, तो आहेच खूप क्रोधी.' कोणी त्याला समोरून थप्पडही मारेल. म्हणजे अपयश किंवा असल्या कुठल्या प्रकारे इथला फळ मिळेल. अर्थात् क्रोधित होणे स्थूल कर्म आहे. आणि क्रोधित होणे त्याच्या मागे आज तुझा भाव काय आहे 'क्रोध केलाच पाहिजे.' तर तो पुढच्या अवताराचा परत क्रोधाचा हिशोब आहे. तुझा आजचा भाव आहे कि, क्रोध नाही केला पाहिजे, तुझ्या मनात निश्चय आहे कि, क्रोध करायचा च नाही, तरी होतो. तर पुढच्या अवतारासाठी तुझे बंधन नाही राहणार. या स्थूल कर्मात तुला क्रोध आला तर तुला या अवतारात मार खावा लागले. तरी तुला पुढच्या अवताराचे बंधन नाही राहणार, कारण सूक्ष्म कर्मात तुझा निश्चय आहे कि क्रोध करायचाच नाही. आणि आज एक मनुष्य कोणावर क्रोध नाही करत, तरी मनात म्हणतो कि, 'या लोकांवर क्रोध केला तरच ते सरळ होणार असे आहेत.' मग पुढच्या अवतारात तो परत क्रोधवाला होईल. अर्थात् बाहेर जो क्रोध होतो ते स्थूल कर्म आहे. त्यावेळी आत जो भाव असतो ते सूक्ष्म कर्म आहे. हे समजले तर स्थूल कर्माचे बिलकुल बंधन नाही. म्हणून हे 'सायन्स' (विज्ञान) मी नव्या प्रकारे सांगितले. आतापर्यंत 'स्थूल कर्मात बंधन आहे' असा जगाला ठाम शिकविले आहे आणि त्याच्याने लोकं भडकत राहतात.
भेदज्ञानाने सुटेल कषाये प्रश्नकर्ता : चार कषायांना जिंकण्यासाठी एखादी प्राथमिक भूमिका