Book Title: Krodh
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust
Catalog link: https://jainqq.org/explore/030120/1

JAIN EDUCATION INTERNATIONAL FOR PRIVATE AND PERSONAL USE ONLY
Page #1 -------------------------------------------------------------------------- ________________ दादा भगवान प्ररूपित Page #2 -------------------------------------------------------------------------- ________________ तल दादा भगवान कथित क्रोध मुळ गुजराती संकलन : डॉ. नीरूबेन अमीन अनुवाद : महात्मागण ( el Oli Page #3 -------------------------------------------------------------------------- ________________ प्रकाशक : श्री अजीत सी. पटेल महाविदेह फाउन्डेशन 5, ममतापार्क सोसायटी, नवगुजरात कॉलेज के पीछे, उस्मानपुरा, अहमदाबाद - ३८००१४, गुजरात. (०७९) २७५४०४०८ फोन प्रथम आवृत्ति : द्वितीय आवृत्ति : वृ : चतुर्थ आवृत्ति : All Rights reserved - Dr. Niruben Amin Trimandir, Simandhar City, Ahmedabad-Kalol Highway, Post - Adalaj, Dist.-Gandhinagar-382421, Gujarat, India. द्रव्य मूल्य : - भाव मूल्य : 'परम विनय' आणि मुद्रक १००० १००० ३००० ३००० फरवरी २००९ सितम्बर २०११ मार्च २०१२ अक्तुबर २०१३ 'मी काहीच जाणत नाही', हा भाव ! १० रुपये लेज़र कम्पोज : दादा भगवान फाउन्डेशन, अहमदाबाद. : महाविदेह फाउन्डेशन पार्श्वनाथ चैम्बर्स, नये रिजर्व बैन्क के पास, इन्कमटैक्स, अहमदाबाद- ३८० ०१४. फोन : (०७९) २७५४२९६४ Page #4 -------------------------------------------------------------------------- ________________ त्रिमत्र વર્તમાનતીર્થકર... શ્રીસીમંધરસ્વામી नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयरियाणं नमो उवज्झायाणं नमो लोए सव्वसाहूणं एसो पंच नमक्कारो, सव्व पावप्पणासणो मंगलाणं च सव्वेसिं, पढमं हवइ मंगलम् १ ॐ नमो भगवते वासुदेवाय २ ॐ नमः शिवाय ३ जय सच्चिदानंद Page #5 -------------------------------------------------------------------------- ________________ (दादा भगवान फाउन्डेशनची प्रकाशित पुस्तके) मराठी ९. टकराव १. भोगतो त्याची चुक ६. क्रोध २. एडजेस्ट एवरीव्हेर ७. चिंता ३. जे घडले तोच न्याय ८. प्रतिक्रमण ४. संघर्ष टाळा ९. भावना सुधारे जन्मोजन्म ५. मी कोण आहे? हिन्दी १. ज्ञानी पुरुष की पहचान २२. समझ से प्राप्त ब्रह्मचर्य २. सर्व दुःखों से मुक्ति २३. दान ३. कर्म का सिद्धांत २४. मानव धर्म ४. आत्मबोध २५. सेवा-परोपकार ५. मैं कौन हूँ? २६. मृत्यु समय, पहले और पश्चात ६. वर्तमान तीर्थंकर श्री सीमंधर स्वामी २७. निजदोष दर्शन से... निर्दोष भुगते उसी की भूल २८. पति-पत्नी का दिव्य व्यवहार ८. एडजस्ट एवरीव्हेयर २९. क्लेश रहित जीवन टकराव टालिए ३०. गुरु-शिष्य १०. हुआ सो न्याय ३१. अहिंसा ११. चिंता ३२. सत्य-असत्य के रहस्य १२. क्रोध ३३. चमत्कार १३. प्रतिक्रमण ३४. पाप-पुण्य १४. दादा भगवान कौन? ३५. वाणी, व्यवहार में... १५. पैसों का व्यवहार ३६. कर्म का विज्ञान १६. अंत:करण का स्वरूप ३७. आप्तवाणी - १ १७. जगत कर्ता कौन? ३८. आप्तवाणी - ३ १८. त्रिमंत्र ३९. आप्तवाणी - ४ १९. भावना से सुधरे जन्मोजन्म ४०. आप्तवाणी - ५ २०. प्रेम ४१. आप्तवाणी - ६ २१. माता-पिता और बच्चों का व्यवहार ४२. आप्तवाणी - ८ दादा भगवान फाउन्डेशन च्या द्वारे गुजराती आणि अंग्रजी भाषे मध्ये सुद्धा बरीच पुस्तके प्रकाशित झाली आहे। वेबसाइट www.dadabhagwan.org वर सुद्धा आपण ही सगळी पुस्तके प्राप्त करू शकता। प्रत्येक महिन्यात हिन्दी, गुजराती आणि अंग्रेजी भाषेत दादावाणी मेगेझीन प्रकाशित करीत आहे। Page #6 -------------------------------------------------------------------------- ________________ दादा भगवान कोण? जून १९५८ संध्याकाळची अंदाजे सहाची वेळ, सुरत स्टेशनावर अलोट गर्दी होती. प्लेटफार्म नंबर तीनच्या रेल्वेच्या बाकावर बसलेले श्री. अंबालाल मूळजीभाई पटेल रुपी देहमंदिरात नैसर्गिक स्वरूपात कित्येक जन्मापासून व्यक्त होण्यासाठी आतूर असलेले 'दादा भगवान' संपूर्णपणे प्रगट झाले आणि निसर्गाने सर्जन केले अध्यात्माचे अद्भूत आश्चर्य ! एक तासात विश्वदर्शन लाभले ! आपण कोण? भगवान कोण? जग कोण चालवत आहे? कर्म म्हणजे काय ? मुक्ति कशाला म्हणतात? इत्यादि जगातील सर्व आध्यात्मिक प्रश्नांचे संपूर्ण निराकरण केले ! आणि जगातील सर्व अध्यात्मिक प्रश्नांचा संपूर्ण उलगडा झाला. अशाप्रकारे निसर्गाने विश्वला प्रदान केले एक अद्वितीय, पूर्ण दर्शन आणि ह्याचे माध्यम बनले अंबालाल मूळजीभाई पटेल, जे होते गुजरातचे चरोतर जिल्ह्यातील भादरण गावचे पाटील, कंट्राक्टचा व्यवसाय करणारे आणि तरी ही पूर्ण वीतराग पुरुष. त्यांना ज्ञान प्राप्ति झाली त्याच प्रमाणे ते फक्त दोन तासात इतर मुमुक्षुनां सुद्धा आत्मज्ञान प्राप्ति करून देत होते, त्यांच्या सिद्ध झालेल्या अद्भूत ज्ञान प्रयोग द्वारा. त्याला अक्रम ( क्रमविरहीत) मार्ग म्हणतात. अक्रम म्हणजे क्रमाशिवायचा आणि क्रम म्हणजे पायरी पायरीने, क्रमाक्रमाने वर चढण्याचे ! अक्रम म्हणजे लिफ्ट मार्ग ! शॉर्ट कट !! ते स्वतः प्रत्येकाला 'दादा भगवान कोण?' ह्याबदलची फोड करून सांगताना म्हणायचे कि, 'हे दिसतात ते 'दादा भगवान' नाहीत । हे तर ए. एम. पटेल आहे. आम्ही ज्ञानी पुरुष आहोत आणि आत प्रगट झाले आहेत ते दादा भगवान आहेत। ते चौदलोकचे नाथ आहेत, ते तुमच्यात पण आहेत, सर्वांमध्ये आहेत! तुमच्यात अव्यक्त रुपात बसलेले आहेत आणि 'इथे' संपूर्णपणे व्यक्त झालेले आहेत! मी स्वतः परमेश्वर नाही । माझ्या आत प्रगट झालेले 'दादा भगवान' त्यांना मी पण नमस्कार करतो. ' व्यापारात धर्म असावा परंतु धर्मात व्यापार नसावा. ह्या सिद्धांताने ते संपूर्ण जीवन जगले. त्यांनी जीवनात कधीही कोणाकडून ही पैसे घेतले नाहीत, उलट स्वत:चा व्यवसायातून झालेल्या फायद्यातून भक्तांना यात्रा करवीत असत. Page #7 -------------------------------------------------------------------------- ________________ आत्मज्ञान प्राप्तिची प्रत्यक्ष लिंक मी तर, काही लोकांना माझ्या हातून सिद्धि प्राप्त करून देणार आहे. माझ्या नंतर कोणी तरी पाहिजे कि नाही! नंतर लोकांना मार्ग (दाखविणारा) हवा कि नाही? - दादाश्री परम पूज्य दादाश्रींना जे ज्ञान प्राप्त झाले, ते अद्भुत आत्मज्ञान, त्यांनी देश-विदेश परिभ्रमण करून, दुसऱ्या लोकांना सुद्धा दोन तासात प्राप्त करून दिले होते, त्याला ज्ञानविधि म्हणतात. दादाश्रींनी आपल्या जीवनकाळातच पूज्य डॉ. नीरूबहन अमीन (नीरूमा)ना आत्मज्ञान देण्याची ज्ञानसिद्धि प्रदान केली होती. दादाश्रींच्या देहविलय पश्चात् नीरूमा आता पर्यंत मुमुक्षुजनांना सत्संग आणि आत्मज्ञानाची प्राप्ति, निमित्तभावाने करत होत्या. त्याच बरोबर पूज्य दीपकभाईनां ही दादाश्रींनी सत्संग करण्याची सिद्धि प्रदान केली होती. पूज्य नीरूमांच्या उपस्थितीतच त्यांच्या आशीर्वादाने पूज्य दीपकभाई देश-विदेशात कितीतरी ठिकाणी जाऊन मुमुक्षूना आत्मज्ञान प्राप्ति करून देत होते, जे पूज्य नीरूमांच्या देहविलय पश्चात् आज पण चालू आहे. हे आत्मज्ञान प्राप्ति नंतर हजारो मुमुक्षु संसारात राहून, सर्व जबाबदाऱ्या सांभाळून सुद्धा मुक्त राहून आत्मरमणता चा अनुभव करत आहेत. पुस्तकात लिहिलेली वाणी मोक्षार्थीला मार्ग दाखविण्याच्या हेतुने अत्यंत उपयोगी सिद्ध झाली आहे. परंतु मोक्ष प्राप्ति हेतुसाठी आत्मज्ञान प्राप्त करणे जरूरी आहे. अक्रम मार्ग द्वारा आत्मज्ञानची प्राप्ति आज पण चालू आहे. त्यासाठी प्रत्यक्ष आत्मज्ञानीला भेट्रन आत्मज्ञानची प्राप्ति करेल तेव्हाच हे शक्य आहे. पेटलेला दिवाच दुसरा दिवा प्रज्वलित करू शकतो. Page #8 -------------------------------------------------------------------------- ________________ निवेदन आत्मज्ञानी श्री अंबालाल मूळजीभाई पटेल, ज्यांना सर्वजण 'दादा भगवान'च्या नांवानी ओळखतात. त्यांच्या श्रीमुखातून आत्मतत्त्व साठी जी वाणी निघाली, ती रेकोर्ड करून संकलन व संपादन करून ग्रंथाच्या रुपात प्रकाशित करण्यात आली आहे. ह्या पुस्तकात परम पूज्य दादा भगवानांच्या स्वमुखाने निघालेल्या सरस्वतीचा मराठी अनुवाद केला आहे. सुज्ञ वाचकाने अध्ययन केल्या वर त्याला आत्मसाक्षात्कारची भूमिका निश्चित होते, असे कित्येकांचे अनुभव आहे. ते 'दादा भगवान' तर त्यांच्या देहात असलेले परमात्माला म्हणत होते. शरीर हे परमात्मा होवू शकत नाही. कारण शरीर विनाशी आहे. परमात्मा तर अविनाशी आहे आणि जे प्रत्येक जीवमात्रच्या आत आहे. प्रस्तुत अनुवादमध्ये विशेष लक्ष ठेवलेले आहे कि प्रत्येक वाचकाला प्रत्यक्ष दादाजींची वाणीच, ऐकत आहोत असा अनुभव व्हावा. ज्ञानींच्या वाणीला मराठी भाषेत यथार्थ रुपाने अनुवादित करायचा प्रयत्न केला आहे. परंतु दादाश्रींच्या आत्मज्ञानचा खरा उद्देश ‘जसा आहे तसा' आपल्याला गुजराती भाषेत अवगत होणार. ज्याला ज्ञानाचा गहन अर्थ समजायचा असेल, ज्ञानाचा खरा मर्म जाणायचा असेल, त्यांनी ह्या हेतूने गुजराती भाषा शिकावी, असा आमचा अनुरोध आहे. अनुवाद संबंधी चूकांसाठी आपली क्षमा प्रार्थितो. Page #9 -------------------------------------------------------------------------- ________________ संपादकीय क्रोध हे कमजोरी आहे, लोक ह्याला बहादुरी समजतात. क्रोध करणाऱ्यारापेक्षा क्रोध न करणाऱ्याच्या प्रभाव तर विशेष पडतो ! सामान्यतः जेव्हा आपल्या मनासारखे नाही झाले, समोरचा आपले म्हणणे समजत नसेल, मान्य करत नसेल, डिफरन्स ऑफ व्यू पोइन्ट (मतभेद) असेल तेव्हा क्रोध येतो. काहीवेळा आपले म्हणणे खरे असेल आणि कोणी आपल्यास खोटे ठरवत असेल तेव्हा ही क्रोध येतो. अरे, पण आपल खरे हे आपल्या दृष्टिकोणाने ना ! समोरच्याचा दृष्टिकोणाने तोही स्वतःला खरे समजेल ना! कित्येकवेळा काही सुचतच नाही, पुढचा मार्ग दिसत नाही, काय करायच ते समजत नाही तेव्हा क्रोध येतो. अपमान होते तेव्हा क्रोध येतो, नुकसान झाले तर क्रोध येतो मानाच्या रक्षणासाठी क्रोध करतात, लोभेचा रक्षणासाठी क्रोध करतात. तेथे मान आणि लोभ कषाय ह्यांचापासून मुक्त होण्यासाठी जागृतित रहायचे जरूरी चे आहे. नोकरांच्या हाताने कपबश्या तूटल्या तेव्हा क्रोध करतात आणि जावयाचा हाताने तूटल्यातर? तेव्हा क्रोध कसा ताब्यात राहतो ! म्हणून बिलीफ (मान्यता) वर च आधारित आहे ना ! कोणी आपले नुकसान करतो किंवा अपमान करतो ते आपल्याच कर्माचे फळ आहेत, करणारा तर निमित्तच आहे अशी समज फिट झालेली असेल तर च क्रोध निघून जातो. जेथे जेथे आणि जेव्हा जेव्हा क्रोध येत आहे तेव्हा त्याची नोंद करावी आणि तेथे जागृत होण्याची जरूर आहे. आणि ज्याला आपल्या क्रोधामुळे दुःख झाले असेल त्याचे प्रतिक्रमण करावे आणि पुन्हा असे करणार नाही असा दृढ निश्चय करावे कारण आपण ज्याच्यावर क्रोध करतो त्याला दुःख होतो, म्हणून तो वैर बांधतो आणि पुढच्या जन्मी परत भेटतो (वैर वसूलीसाठी). आई-वडील स्वत:च्या मुलांवर आणि गुरू स्वत:चा शिष्य वर क्रोधित होतात त्याने ते पुण्य बांधतात कारण त्या मागे त्यांचा हेतु भल्यासाठी आहे त्यांना सुधारण्यासाठी आहे. हा जर स्वार्थासाठी असेल तर पाप बांधेल. वीतराग भगवानांची समज किती खोलवरची आहे, किती सूक्ष्म आहे ते तर पहा !!! प्रस्तुत ग्रंथात क्रोध कि जो पुष्कळ त्रास देणारा, दिसून येणारा कषाय (दोष) आहे त्याची सर्व समज विस्ताराने येथे संकलित करून प्रकाशित केली आहे जे सुज्ञ वाचकांना क्रोधापासून मुक्त होण्यासाठी खूपच मदतरूप होऊ शकेल ही च प्रार्थना. - डॉ. नीरूबेन अमीन ह्यांचे जय सच्चिदानंद Page #10 -------------------------------------------------------------------------- ________________ क्रोध कोण मानतो, 'मी चुकीचा?' प्रश्नकर्ता : आपण बरोबर असतांनाही आपल्याला चुकीचे ठरवले, तर आतमध्ये त्याच्यावर राग येतो. तर तो क्रोध लगेच येऊ नये, त्यासाठी काय करावे? दादाश्री : हां, पण आपण बरोबर असाल तेव्हा ना? वास्तवात आपण बरोबर असता का? आपण बरोबर आहोत असे आपल्याला वाटते? प्रश्नकर्ता : आम्हाला आमचा आत्मा सांगतो कि, आम्ही बरोबर आहोत. दादाश्री : हे म्हणजे स्वत:च जज, स्वत:च वकील आणि स्वत:च आरोपी, म्हणून आपण बरोबरच असणार ना? आपण मग चुकीचे असणारच नाही ना? समोरच्यांना पण असेच वाटते कि मी बरोबर आहे. आपल्याला समजले? या आहेत सगळ्या कमजोरी प्रश्नकर्ता : परंतु मला असे विचारायचे होते कि, अन्यायासाठी चीड असेल तर, ते तर चांगलेच आहे ना? कुठल्याही गोष्टीवर आपल्याला स्पष्टपणे अन्याय होताना नजरे पडला, तेव्हा जो प्रकोप होईल तो योग्य आहे? Page #11 -------------------------------------------------------------------------- ________________ क्रोध दादाश्री : असे आहे कि, हा सगळा क्रोध आणि चीड, ह्या सगळ्या कमजोरी (वीकनेस) आहेत. संसारात सर्वांकडे ह्या कमजोरी आहेत. कोणी तुला धमकावले, तर तू उग्र होशील ना? प्रश्नकर्ता : हो, होऊन जातो. दादाश्री : तर ती कमजोरी म्हणावी कि बहादुरी म्हणावी? प्रश्नकर्ता : पण काही प्रसंगी क्रोधित व्हायलाच हवे ना? दादाश्री : नाही, नाही. क्रोध तर स्वत:च एक कमजोरी आहे काही प्रसंगी क्रोधित व्हायला हवे. ही तर संसारी गोष्ट आहे. हे तर स्वत:चा क्रोध बंद करू शकत नाही म्हणून असे बोलता कि क्रोधित व्हायलाच हवे. मनपण नाही बिघडे, तो बलवान प्रश्नकर्ता : जेव्हा माझा जर कोणी अपमान केला आणि मी गप्प बसलो तर ती निर्बलता नाही का होणार? दादाश्री : नाही, ओहोहो ! अपमान सहन करणे, ही तर मोठीच बहादुरी म्हणावी ! आता आम्हाला(दादाजींना) कोणी शिव्या दिल्या, तर आम्हाला काहीच होणार नाही. त्याच्या प्रति मन पण बिघडणार नाही, हीच बहादुरी! आणि निर्बलता तर, ही सगळे किच-किच करतात ना, जीवमात्र लठूबाजी करत राहतात ना, ही सगळी निर्बलता म्हणतात. म्हणून अपमान शांतिने सहन करणे, ही महान बहादुरी आहे. आणि असा अपमान एकदाच पार करा, एक पाऊल ओलांडलात, तर शंभर पावले ओलांडण्याची शक्ति प्राप्त होते. आपल्याला समजले? समोरचा बलवान असेल तर त्याच्या समोर जीवमात्र निर्बल होऊनच जातो. हा तर त्याचा स्वाभाविक गुण आहे. पण जर निर्बल माणसाने आपल्याला छेडले, तर त्याला आपणा काहीही नाही करायचे, तर ती बहादुरी समजावी. Page #12 -------------------------------------------------------------------------- ________________ क्रोध ३ वास्तवात निर्बलाचे रक्षण करायला हवे आणि बलवानाचा सामना करायला हवा. पण ह्या कलियुगात असे मनुष्यच नाही राहिलेत. आता तर निर्बलालाच मार मार करतात आणि बलवानापासून पळतात. फार कमी लोकं अशी आहेत जी निर्बलाचे रक्षण करतात. आणि बलवानाचा प्रतिकार करतात. असे असेल तर तो क्षत्रियगुण म्हणावा लागेल. बाकी, सगळा संसार कमजोराला मारत राहतो. घरी जाऊन पुरूष बायकोवर बहादुरी दाखवतो, खुंटीला बांधलेल्या गाईला मारले तर ती कुठे जाणार? आणि सोडून मारलेत तर ? पळून जाईल, नाहीतर सामना करेल. जो मनुष्य स्वत:ची शक्ति असली तरी समोरच्याला नाही सतावत, आपल्या दुश्मनाला सुद्धा नाही सतावत, त्याचे नांव बहादुरी आहे. आता जर आपल्यावर कोणी क्रोध करत असेल आणि आपण त्याच्यावर क्रोध केला तर त्याला कायरता नाही म्हणायची? अर्थात् माझे काय म्हणणे आहे कि, हे क्रोध - मान-माया - लोभ (कषाय), ही सगळी निर्बलता आहेत. जो बलवान आहे, त्याला क्रोध करायची जरूरच कुठे आहे? पण हा क्रोधाचा जो रूबाब आहे, त्या रूबाबाने समोरच्याला वश करायला जातात, पण ज्याला क्रोध नाही येत, त्याच्या जवळ दुसरे काहीतरी असेलच, हे बरोबर ना? त्याच्या जवळ ‘शील' नांवाचे जे चारित्र्य आहे, त्याने जनावर सुद्धा वश होतात, वाघ, सिंह, दुश्मन पूर्ण लश्कर सगळेच वश होतात! क्रोधी तर अबला च प्रश्नकर्ता : पण दादाजी, जर कोणी मनुष्य कधी आपल्यावर तापला तर काय करायचे? दादाश्री : तापणारच ना, त्याच्या हाताची गोष्ट थोडीच आहे? त्याच्या आतील मशिनरीवर त्याचा अंकुश नाही ना ! हे तर जसे- तसे करून आतील मशिनरी चालत राहते. आपला ताब्यात असेल तर मशिनरी गरम होऊच देणार नाही ना. ही थोडीसी पण गरम होणे म्हणजे गाढव होऊन Page #13 -------------------------------------------------------------------------- ________________ क्रोध जाणे, मनुष्य असून गाढव होणे. पण असे कोणी करणारच नाही ना. जिथे आपला अंकुश नाही आहे, तिथे मग काय होऊ शकते? असे आहे, या संसारात कुठल्याही वेळेस उग्र व्हायचे काही कारणच नाही. कोणी म्हणेल कि, 'हा मुलगा माझे म्हणणे मानत नाही.' तरीसुद्धा हे उग्र व्हायचे कारण नाही. तिथे तुला थंड राहून काम करून घ्यायला पाहिजे. हे तर तु निर्बल आहेस, म्हणून गरम होतोस. आणि गरम होऊन जाणे ही तर भयंकर निर्बलता म्हणली जाते. अर्थात् अधिकाधिक निर्बलता असल्यामुळे गरम होतो ना ! कमजोराला राग जास्त येतो. म्हणून जो गरम होतो, त्याच्यावर दया आली पाहिजे कि ह्या बिचाऱ्याचा क्रोधावर बिलकुल कंट्रोल नाही. ज्याला स्वत:चा स्वभाव ही कंट्रोलमध्ये नाही, त्याच्यावर दया आली पाहिजे. गरम (क्रोधित) व्हायचे म्हणजे काय? प्रथम स्वतः जळायचे आणि नंतर समोरच्याला जाळायचे. ही आगकांडी लावणे म्हणजे, स्वतः भड भड जळायचे आणि मग समोरच्याला जाळून टाकणे. अर्थात् गरम होणे आपल्या हातात असते तर कोणी गरम झालेच नसते. जळणे कोणाला आवडेल? कोणी असे म्हणेल कि, 'संसारात कधी कधी क्रोध करणे जरूरी आहे.' तेव्हा मी सांगेन कि, 'नाही असे काही कारण नाही कि, जिथे क्रोध करणे जरूरी आहे.' क्रोध निर्बलता आहे, म्हणून होतो. भगवंताने क्रोधीला म्हणून च अबला म्हटले आहे. पुरूष कोणाला म्हणावयाचे? क्रोध-मान-माया-लोभ ही निर्बलता ज्याच्यात नाही, त्याना भगवानने 'पुरूष' म्हटले आहे. अर्थात् हे जे पुरूष नजरेत येतात, त्यांना 'अबला' म्हटले आहे, पण त्यांना शरम नाही येत ना? ते बरे आहे, नाहीतर 'अबला' म्हटल्यावर लाजले असते न! परंतु त्यांना काही समजच नाही. समज किती आहे? आंघोळीसाठी पाणी ठेवले तर आंघोळ करायची. खायचे, आंघोळ करायची, झोपायचे या सगळ्याची समज आहे, पण दुसरी काही समज नाही. मनुष्यत्वाची जी विशेष समज Page #14 -------------------------------------------------------------------------- ________________ क्रोध सांगितली आहे, कि हा 'सज्जन पुरूष' आहे, अशी सज्जनता लोकांच्या नजरेत यावी त्याची समज नाही. क्रोध-मान-माया-लोभ ही तर खुली कमजोरी आहे आणि खूप क्रोध आल्यावर आपले हात पाय कंपतांना नाही पाहिले तुम्ही? प्रश्नकर्ता : शरीर पण नकार देते कि तुला क्रोध करण्यासारखे नाही आहे. दादाश्री : हां शरीर पण नकार देते कि हा क्रोध आपल्याला शोभा नाही देत. अर्थात् क्रोध तर भारी कमजोरी म्हणतात. म्हणून क्रोध करणे आपल्यासाठी उचित नाही आहे. प्रभाव पडतो, बिना कमजोरीने प्रश्नकर्ता : जर कोणी मनुष्य लहान मुलाला मारत आहे आणि आपण तेथून जात आहोत, तेव्हा त्यांना असे करण्यास मनाई करणे आणि नाही मानले तर शेवटी ओरडून किंवा रागवून रोकायला हवे कि नको? दादाश्री : क्रोध केल्यावरही तो मारल्याशिवाय राहणार नाही. अरे, आपल्याला पण मारेल. मग त्याच्यावर क्रोध का करायचा? त्याला शांतपणे काही सांगा, व्यावहारिक बातचीत करा, बाकी त्याच्यावर क्रोध करणे ही तर वीकनेस (कमजोरी) आहे. प्रश्नकर्ता : तर मुलाला मारू द्यायचे? दादाश्री : नाही, तिथे जाऊन आपण सांगावे कि, अहो भाऊ, आपण असे का करता? या मुलाने आपले काय बिघडवले आहे? असे त्याला समजावून सांगू शकतो. आपण त्याच्यावर क्रोध करणे, ती तर आपली कमजोरी आहे. प्रथम आपल्यात कमजोरी नाही असली पाहिजे. ज्याच्यात कमजोरी नाही, त्याचा तर प्रभाव पडेलच, तो जरी सहज सामान्य रूपाने सांगेल न तरी पण सगळे मानतील. Page #15 -------------------------------------------------------------------------- ________________ क्रोध प्रश्नकर्ता : कदाचित नाही मानणार. दादाश्री : नाही मानन्याचे काय कारण आहे? आपली पर्सनालिटी (प्रभाव) नाही पडत. अर्थात्, कमजोरी नाही असली पाहिजे, चारित्र्यवान असले पाहिजे. 'मेन ऑफ पर्सनालिटी' असले पाहिजे. लाखो गुंडे त्याला पाहताच पळून जाणार! चिडचिड्या माणसांपासून कोणी पळून नाही जाणार उलट मारतील पण! संसार तर कमजोरालाच मारणार ना. अर्थात् मेन ऑफ पर्सनालिटी असले पाहिजे. पर्सनालिटी कधी येते ? विज्ञान जाणल्यावर पर्सनालिटी येते. ह्या संसारात जे विसरून जातात, ते (रिलेटिव) व्यवहारज्ञान आहे, आणि ज्याला कधीही विसरता येत नाही ते विज्ञान आहे. गरमीपेक्षा हिम भारी आपल्याला माहीत आहे, हिमवर्षा होते? हिम म्हणजे अति थंड. ह्या हिमाने झाडे जळतात, कापूस-गवत सगळे जळून जाते. ते थंडीत का जळून जातात? प्रश्नकर्ता : ओवरलिमिट' (अति)थंडीमुळे. दादाश्री : हां, अर्थात् जर आपण थंड होऊन राहिलात तर असे 'शील' उत्पन्न होईल. क्रोध बंद तिथे प्रताप प्रश्नकर्ता : पण दादाजी, जरूरती पेक्षा जास्त थंड होणे, ही पण एक कमजोरी आहे ना? दादाश्री : जरूरतीपेक्षा जास्त थंड व्हायची गरजच नाही. आपल्याला लिमिटमध्ये राहायचे आहे, त्याला 'नॉर्मालिटी' म्हणतात. बीलो नॉर्मल इज द फिवर, एबाव नॉर्मल इज द फीवर, नाईन्टी एट (९८) इझ द नॉर्मल. अर्थात् आपल्याला नॉर्मालिीटीच हवी. Page #16 -------------------------------------------------------------------------- ________________ क्रोध क्रोधीपेक्षा, क्रोध न करणाऱ्याला लोकं अधिक घाबरतात, काय कारण असेल ह्याचे? क्रोध बंद झाल्यावर प्रताप उत्पन्न होतो, असा निसर्गाचा नियम आहे. नाहीतर त्याचे रक्षण करणाराच नाही मिळणार ना. क्रोध तर रक्षक होता, अज्ञानतेत क्रोधाने रक्षण होत होते. चिडचिड्याचा नंबर शेवटी प्रश्नकर्ता : सात्विक चिड किंवा सात्विक क्रोध चांगला आहे कि नाही? दादाश्री : त्याला लोक काय म्हणतील? ही मुलं पण त्यांना म्हणतील कि 'हे तर चीडचीडेच आहेत' चीड हे मूर्खपणा आहे, फूलिशनेस आहे. चीड ला कमजोरी म्हणतात. मुलांना आपण विचारले कि, तुमचे पप्पा कसे आहेत? तर सांगतिल कि 'ते तर खुपच चीडचीडे आहेत.' बोला, आता आबरू वाढली कि कमी झाली? ही कमजोरी नको असायला पाहिजे, अर्थात् जिथे सात्विकता आहे, तिथे कमजोरी नाही होणार. घरातील लहान मुलांना विचारा कि, 'तुमच्या घरात पहिला नंबर कोणाचा?' तेव्हा मुलं शोध करतील कि माझी आई चिडत नाही. म्हणून सगळ्यात चांगली तीच आहे. पहिला नंबर तिचा, मग दुसरा, तिसरा, करत करत पापा चा नंबर शेवटी येतो !!! असे का? कारण ते चिडतात. चीडचीडे आहेत म्हणून. मी म्हणेन कि, 'पप्पा पैसे आणून तुमच्यासाठी खर्च करतात, तरीसुद्धा त्यांचा शेवटचा नंबर?' तेव्हा ते 'हो' सांगतात. बोला आता, मेहनत मजूरी करून, खायला द्या, पैसे आणून द्या तरीपण शेवटचा नंबर आपलाच येतो ना? क्रोधी म्हणजे आंधळेपण प्रश्नकर्ता : मनुष्याला क्रोध येण्याचा सामान्य रूपाने मुख्य कारण काय असू शकते? Page #17 -------------------------------------------------------------------------- ________________ क्रोध दादाश्री : दिसणे बंद होते म्हणून. मनुष्य भिंतीला कधी आपटणार? जेव्हा भिंत नजर नाही येणार, तेव्हा आपटणार ना? अशाप्रकारे दिसणे बंद होऊन जाते, म्हणून मनुष्य क्रोधित होऊन जातो. पुढचा रस्ता नाही मिळाला कि क्रोध येतो. सूझ नाही पडत तरी क्रोध क्रोध कधी येतो? तेव्हा म्हणेल, दर्शन(सूझ) अटकते, म्हणून ज्ञान अटकते. त्यामुळे क्रोध उत्पन्न होतो. मान पण असा आहे. दर्शन अटकते, म्हणून ज्ञान अटकते, म्हणून मान ऊभा होतो. प्रश्नकर्ता : उदाहरण देउन समजावले तर अधिक स्पष्ट होईल. दादाश्री : आपली लोक नाही म्हणत कि, 'का एवढे रागवलात' तेव्हा म्हणतात कि, 'मला सूझ पडत नाही म्हणून रागावलो.' हो जर सूझ पडली नाही, तर मनुष्य रागवतो. ज्याला सूझ पडेल तो रागवेल का? रागवायचे म्हणजे काय? हा राग पहिले इनाम कोणाला देणार? तर ज्याला राग आला त्याला आधी जाळणार, नंतर दुसऱ्याला जाळणार. क्रोधाग्नी जाळतो स्व-पर ला क्रोध म्हणजे स्वतः आपल्या घराला आग लावणे. स्वत:च्या घरात गवत भरलेले असेल आणि काडी लावणे, त्याचे नांव क्रोध. अर्थात् पहिले स्वतः जळणे आणि नंतर शेजाऱ्यांना जाळणे. गवताचे मोठ मोठे गढे एखाद्याच्या शेतात गंजी केलेले आहेत, पण त्यावर एकच काडी टाकली तर काय होईल? प्रश्नकर्ता : जळून जाईल. दादाश्री : असेच एक वेळ क्रोध केल्याने, दोन वर्षाची जी कमाई(साधना) केलेली असेल ती मातीत मिळून जाते. क्रोध म्हणजे प्रकट Page #18 -------------------------------------------------------------------------- ________________ क्रोध अग्नी. त्याला स्वत:ला पत्ता नाही लागत कि, मी मातीत घालून टाकले. कारण बाहेरच्या गोष्टीमध्ये काही कमी नाही होत, पण आतमध्ये सगळे संपते. पुढच्या जन्मासाठीची सगळी तयारी झाली असेल, त्यात थोडा (पुण्य) खर्च होऊन जातो. पण मग जास्त खर्च झाल्यावर काय होणार? इथे मनुष्य होता तेव्हा अन्न खात होता, मग तिथे चारा खायला (जनावरांमध्ये) जायला लागेल. हे अन्न सोडून चारा खायला जावे लागेल. हे ठीक असेल? जगात कोणीही मनुष्य क्रोधाला नाही जिंकू शकत. क्रोधाचे दोन रूपे आहेत, एक कढापाच्या रूपात (बाहेरून दिसणारे) आणि दुसरे, बेचैनी चे रूप (जे आत असते), जे लोक क्रोधाला जिंकतात ते कढापा रूपाला जिंकतात. इथे असे होते कि एकाला दाबले तर दुसरे वाढणार आणि म्हणणार मी क्रोधाला जिंकले, त्याच्या परिणामस्वरूप मान वाढेल. वास्तवात क्रोध पूर्णपणे नाही जिंकता येत. हे तर जे दिसते त्या क्रोधालाच जिंकले असे म्हणले जाईल. तांता (तंत) त्याचे नांव क्रोध ज्या क्रोधात तांता आहे, तोच क्रोध म्हणतात. उदाहरणार्थ, पतिपत्नी रात्री खूप लढले, क्रोध जबरदस्त उफाळून आला. सारी रात्र दोघेही जागी राहिली. सकाळी बायकोने चहाचा प्याला जरा आपटूनच ठेवला, तर पति समजून जाईल कि अजून तांता (तंत, क्रोधाची पकड) आहे. त्याचेच नांव क्रोध. मग तो कितीही वेळेचा असूदे. अरे! काहींना तर आयुष्यभराचा असतो. बाप मुलाचे तोंड नाही पहात आणि मुलगा बापाचे तोंड नाही पहात. क्रोधाचा तांता तर बिघडलेल्या चेहऱ्यावरून कळतो. तांता एक अशी वस्तु आहे कि पंधरा वर्षा पूर्वी कोणी माझा अपमान केले होते आणि तो मनुष्य पंधरा वर्षपर्यंत मला भेटला नव्हता. पण आज तो भेटलावर मला सगळे आठवते, हा तांता. तांता कोणाचा जात नाही. मोठे Page #19 -------------------------------------------------------------------------- ________________ क्रोध मोठे साधु महाराज पण तांतेवाले असतात. रात्री जर आपण काही खोड काढली, तर पंधरा पंधरा दिवस आपल्याशी बोलत नाहीत, असे असेल तर तो तांता. फरक, क्रोध आणि रागात प्रश्नकर्ता : दादाजी, राग(गुस्सा) आणि क्रोध यांत फरक काय आहे? दादाश्री : क्रोध त्याला म्हणतात कि, जो अहंकारासहित आहे. राग आणि अहंकार दोन्ही मिळाल्यावर क्रोध म्हणतात. आणि मुलाबरोबर बापाने राग केला, तो क्रोध नाही म्हणत. त्या क्रोधामध्ये अहंकार मिसळत नाही. म्हणून त्याला राग म्हणतात. ह्यावर भगवानने सांगितले कि, 'हा रागवला तरी त्याचे पुण्य जमा करा.' तेव्हा म्हणतात कि, 'राग केला तरी?' ह्यावर सांगितले कि, 'क्रोध केला तर पाप आहे, रागचे पाप नाही' क्रोधामध्ये अहंकार मिसळलेला असतो आणि आपल्याला राग आल्यावर, आतमध्ये आपल्याला वाईट वाटते ना. क्रोध-मान-माया-लोभ दोन प्रकारचे असतात. एक प्रकारे क्रोधाला वळवू शकेल असा-निवार्य. कोणावर क्रोध आला तर त्याला आतल्या आत बदलू शकू, आणि त्याला शांत करू शकू, असा मोडू शकणारा क्रोध. ह्या स्टेजपर्यंत पोहोचलो तर व्यवहार खूप सुंदर होतो. ___ दुसऱ्या प्रकारचा क्रोध जो वळवू (मोडू) नाही शकत असाअनिवार्य. खूप प्रयत्न केल्यावर ही फटाका फुटल्याशिवाय रहात नाही. तो नाही मोडणारा क्रोध. हा क्रोध स्वत:चे अहित करतो आणि समोरच्याचे सुद्धा अहित करतो. ____ भगवंताने कुठपर्यंतचा क्रोध चालवून घेतला आहे साधु आणि चारित्र्यवानांसाठी कि क्रोध जो पर्यंत समोरच्या माणसाला दुःखदायी नाही होत, तेवढ्या क्रोधाला भगवंताने चालवून घेतले आहे. माझा क्रोध मला Page #20 -------------------------------------------------------------------------- ________________ क्रोध एकट्याला दुःख देईल, पण दुसऱ्या कोणाला दुःखदायी नाही होणार, तितका क्रोध चालवून घेतला आहे. जाणणाऱ्यांना ओळखा प्रश्नकर्ता : आपण सगळे जाणतो कि, हा क्रोध आला, हे खराब आहे. तरी पण... दादाश्री : असे आहे ना, जो क्रोधी आहे तो जाणत नाही, लोभी आहे तो जाणत नाही, मानी आहे तो जाणत नाही. जाणणारा त्याच्यापेक्षा वेगळाच आहे. आणि ह्या सगळ्या लोकांच्या मनात येते कि, मी सगळी जाणतो तरीसुद्धा असे का होते? आता जाणतो, तो कोण? हे माहित नाही, 'कोण जाणते' हे माहित नाही, इतकेच शोधायचे आहे. 'जाणणाऱ्याला' शोधून काढले, तर सगळे जाईल असे आहे. अर्थात् जाणत नाही. जाणले त्यालाच म्हणतात कि मग (तो दोष) जातच राहणार, ऊभाच नाही राहणार. सम्यक् उपाय जाणा एक वेळा प्रश्नकर्ता : हे जाणल्यावर ही क्रोध येतो, त्याचे निवारण काय? दादाश्री : कोण जाणतो? जाणल्यानंतर क्रोध येणारच नाही. क्रोध होतो म्हणून जाणतच नाहीत, फक्त अहंकार करतात कि 'मी जाणतो.' प्रश्नकर्ता : क्रोध येऊन गेल्यावर मनात येते कि आपल्याला क्रोध नाही केला पाहिजे. दादाश्री : नाही. पण जाणल्यानंतर क्रोध नाही येत. आम्ही येथे दोन बाटल्या ठेवल्यात. तिथे कोणी समजावले कि एका बाटलीत दवा आहे आणि दुसऱ्या बाटलीत पोईझन (विष) आहे. दोन्ही सारखी दिसतात, पण त्यात भूलचुक झाली तर समजू कि हा जाणतच नाही. भूलचुक नाही झाली तर, म्हणू कि जाणतो, पण भूलचुक होते म्हणून हे निश्चत झाले कि तो जाणत नव्हता. तसाच क्रोध होत असतो, तेव्हा काही जाणत नाही, आणि Page #21 -------------------------------------------------------------------------- ________________ १२ क्रोध फक्त जाणल्याचा अहंकार घेऊन फिरता. उजेडात कधी ठोकर लागते का? आणि जर ठोकर लागते, तर मग जाणलेच नाही. हे तर अंधारालाच उजेड म्हणायचे, ही आपली भूल आहे. म्हणून सत्संगमध्ये बसून एकदा 'जाणा', मग क्रोध-मान-माया-लोभ सगळे निघून जातील. प्रश्नकर्ता : पण क्रोध तर सगळ्यांनाच येतो ना? दादाश्री : या भाऊनां विचारा, हे तर नाही म्हणतात. प्रश्नकर्ता : सत्संगमध्ये आल्यानंतर क्रोध नाही येत. दादाश्री : अस्सं? ह्यांनी कुठले औषध घेतले असेल? द्वेषाचे मूळ नष्ट होऊन जाईल, असे औषध प्यालात! समजदारी ने प्रश्नकर्ता : माझा कोणी जवळचा, नातेवाईक आहे, त्याच्यावर मी क्रोधित झालो. तो त्याच्या दृष्टिने कदाचित बरोबर ही असेल, पण मी माझ्या दृष्टिने क्रोधित झालो, तर काय कारणाने क्रोधित होऊन जातो? दादाश्री : आपण येत आहात आणि ह्या ईमारती वरून एक दगड डोक्यावर येऊन पडला आणि रक्त आले, तर त्या वेळी क्रोध कराल? प्रश्नकर्ता : नाही, हे तर 'हेपन' (नैसर्गिक रीत्या) झाले. दादाश्री : नाही, पण क्रोध का नाही करत तेथे? कारण स्वतः ने कोणाला पाहिले नाही, म्हणून क्रोध कसा येणार? प्रश्नकर्ता : कोणीही जाणून-बुजुन मारलेले नाही. दादाश्री : आणि, आता बाहेर गेल्यावर कोणी मुलाने दगड मारला आणि आपल्याला लागला आणि रक्त आले, तर आपण त्याच्यावर क्रोध करतो, कशासाठी? त्याने मला दगड मारला, म्हणून रक्त आले तर क्रोध Page #22 -------------------------------------------------------------------------- ________________ क्रोध १३ करू कि तू का मारलेस? आणि पहाडावरून गडगडत दगड येऊन लागला आणि डोक्यातून रक्त निघाले, तेव्हा पहाल पण क्रोध नाही करणार ! हे तर आपल्या मनाला असे वाटते कि तोच करत आहे. कोणी मनुष्य जाणून- बुजुन मारूच शकत नाही. अर्थात् पहाडावरून दगड पडणे आणि हा मनुष्यांनी दगड मारणे, हे दोन्ही समानच आहेत. पण भ्रांतिने असे दिसते कि हा करतो. ह्या जगात कुठल्याही मनुष्याला संडासला जाण्याची शक्ति नाही. आपल्याला कळले कि कोणी जाणून-बुजून नाही मारले, तेव्हा तिथे क्रोध नाही करत. मग सांगतो, 'मला क्रोध येतो. माझा स्वभाव क्रोधी आहे.' अरे, स्वभावाने क्रोध नाही येत. तो पोलिसांच्यासमोर का नाही येत? पोलिसांनी धमकावले, त्या वेळी पोलिसांवर क्रोध का नाही येत? त्याला पत्नीचा राग येतो, मुलांवर क्रोध येतो, शेजाऱ्यांवर, अन्डरहेंड (सहाय्यक) वर क्रोध येतो आणि 'बॉस' वर का नाही येत? क्रोध असाच, स्वभावाने मनुष्याला नाही येत. ही तर त्याला स्वत:ची मनमानी करायची आहे. प्रश्नकर्ता : कशाप्रकारे त्याला कंट्रोल करायचे? दादाश्री : समजूतीने. हे जे आपल्या समोर येते, हे तर निमित्त आहे आणि आपल्याच कर्माचे फल देत आहे. हे निमित्त बनले आहे. आता असे समजले, तर क्रोध कंट्रोलमध्ये येईल. जेव्हा दगड पहाडावरून पडला, असे बघता, तेव्हा आपण कंट्रोल करू शकता. तर ह्यात ही समज ठेवण्याची जरूरत आहे कि भाऊ, हे सगळे पहाडा समानच आहे. रस्त्यात कोणी गाडीवाला चुकीच्या मार्गाने आपल्या समोर आला आहे तरी पण तिथे भांडत नाही ना? क्रोध नाही करत ना? आपण त्याला टक्कर देऊन तोडून द्यायचे, असे करतो का? नाही. तर तिथे का नाही करत? तिथे शहाणे होऊन जाता कि मी मरून जाईन. अरे भाऊ ! त्याहून Page #23 -------------------------------------------------------------------------- ________________ १४ क्रोध जास्त तर क्रोध केल्यामुळे मरून जाल, पण हे चित्र नजर नाही येत आणि ते चित्र खुल्यापणी दिसतो, इतकाच फरक आहे! तिथे रोड वर सामना नाही करत? क्रोध नाही करत, समोरच्याची चुक झाली तरी? प्रश्नकर्ता : नाही. दादाश्री : असेच जीवनातही समजून घेण्याची जरूरत आहे. परिणाम तर, कारणं बदलल्यावर ही बदलणार एक भाऊ मला म्हणतो कि, 'अनंत अवतारापासून हा क्रोध काढत आलो आहोत, पण तो जात का नाही?' ह्यावर मी सांगितले कि, 'तुम्ही क्रोध काढून टाकण्याचे उपाय नाही जाणत?' त्याने सांगितले कि, 'क्रोध काढायचे उपाय शास्त्रात लिहिलेले आहेत, ते सगळे करतो, तरी हा क्रोध नाही जात.' तेव्हा मी सांगितले कि, 'सम्यक् उपाय असला पाहिजे.' तेव्हा म्हणतात कि, 'सम्यक् उपाय तर खूप वाचले, पण ते काही कामात येत नाहीत.' मग मी सांगितले कि, 'क्रोध बंद करण्यासाठी उपाय शोधणे मूर्खता आहे, कारण क्रोध परिणाम आहे. जसे आपण परीक्षा दिली आहे आणि रिझल्ट आला. आता मी रिझल्टला नष्ट करण्याचा उपाय करतो, त्याप्रमाणे गोष्ट झाली ही तर. हा परिणाम आला, तो कशाचा परिणाम आहे त्यात आपल्याला बदल करण्याची आवश्यकता आहे.' आपली लोकं काय म्हणतात कि, 'क्रोधाला दाबा, क्रोधाला काढून टाका.' अरे, असे का करतो? काही कारण नसताना डोकं खराब करतो. तरी ही क्रोध तर निघून जात नाही. पण तेव्हा ते म्हणतील कि, 'नाही साहेब, थोडा-फार दाबला तर गेला आहे.' अरे, तो आत आहे, तोपर्यंत तो दाबला गेला नाही म्हणत. तेव्हा त्या भाऊने विचारले कि, 'तेव्हा आपल्याकडे दुसरा काही उपाय आहे?' मी सांगितले, 'हो, उपाय आहे, तुम्ही करणार?' तर म्हणे हो. तेव्हा मी सांगितले कि, 'एकदा तसे नोंद करा कि या संसारात खास करून कोणावर क्रोध येतो?' जिथे जिथे क्रोध Page #24 -------------------------------------------------------------------------- ________________ क्रोध १५ येतो, त्याची नोंद कर आणि जिथे क्रोध नाही येत तेही जाणून घे. एकदा लिस्ट करून घे कि, ह्या मनुष्यावर क्रोध नाही येत. काही लोकांनी उलटे केले, तरी त्यांच्यावर क्रोध नाही येत, आणि काही बिचारे सरळ करतात, तरीपण त्यांच्यावर क्रोध येतो. त्यासाठी काही कारण तर असेल ना? प्रश्नकर्ता : त्यासाठी मनात ग्रंथि बांधली गेली असेल? दादाश्री : हां, ग्रंथि बांधली गेली आहे. ती ग्रंथि सोडवण्यासाठी आता काय करावे? परीक्षा तर दिली. जितक्या वेळेला, ज्याच्या बरोबर क्रोध व्हायचा आहे, तितक्या वेळेला त्याच्या बरोबर क्रोध येणार, आणि त्या बरोबर ग्रंथि ही बांधली जाणार, पण आता आपल्याला काय करायला हवे? ज्याच्या वर क्रोध येतो, त्याच्यासाठी मन खराब नाही होऊ दिले पाहिजे. मन सुधारा कि भाऊ, आपल्या प्रारब्धानुसार हा मनुष्य असे करतो. तो जे काही करतो ते आपल्या कर्माचा उदय आहे, म्हणून असा करतो. अशाप्रकारे आपण मनाला सुधारू. मनाला सुधारत रहा जेव्हा समोरच्यासाठी मन सुधारेल, तेव्हा मग त्याच्यासाठी क्रोध होणे बंद होईल. काही काळापर्यंत मागचा इफेक्ट आहे, तेवढा इफेक्ट देऊन मग बंद होऊन जाईल. ही जरा सूक्ष्म गोष्ट आहे, आणि ती लोकं शोधू शकली नाहीत. प्रत्येक गोष्टीचा एक उपाय होतोच ना? उपायाशिवाय संसार होतच नाही ना. संसार तर परिणामाचाच नाश करू पाहतो. अर्थात् क्रोध-मान-मायालोभ याचा उपाय हा आहे कि, परिणामाला काही नाही करायचे, त्याच्या कारणांना उडवून द्या, तर ते सगळे निघून जातील. म्हणून स्वतः विचारक व्हायला पाहिजे. नाहीतर अजागृत राहून कशाप्रकारे उपाय करणार? प्रश्नकर्ता : कारणांना कशाप्रकारे उडवायचे, हे जरा परत समजवा. दादाश्री : या भाऊ वर मला क्रोध येतो, तर मग निष्कर्ष काढू कि मला याच्यावर जो क्रोध येतो, तर मी पूर्वी त्याचे दोष बघितले होते, Page #25 -------------------------------------------------------------------------- ________________ क्रोध १६ त्याचा परिणाम आहे. आता तो जे जे दोष करेल, ते मनावर घ्यायचे नाहीत, तर मग त्याच्या प्रति जो क्रोध आहे तो बंद होऊन जाईल. पण थोडे पूर्व परिणाम आहेत, तेवढे आल्यानंतर दुसरे पुढे बंद होऊन जातील. प्रश्नकर्ता : दुसऱ्यांचे दोष पाहतो म्हणून क्रोध येतो? दादाश्री : हां. दोष पाहत आहोत, तेही आपण जाणूया कि, हे चुकीचे परिणाम आहेत. जेव्हा हे चुकीचे परिणाम दिसायचे बंद होतील, त्यानंतर क्रोध बंद होऊन जाईल. आम्ही दोष बघणे बंद केले, म्हणून सगळे बंद झाले. क्रोधाच्या मूळात अहंकार लोकं विचारतात कि, 'ह्या आमच्या क्रोधासाठी काय औषधोपचार करायचा?' मी सांगितले, 'आता आपण काय करता?' तेव्हा म्हणतात, 'क्रोध दाबत राहतो.' मी विचारले, 'ओळखून दाबता कि न ओळखता ? क्रोधाला ओळखायला तर हवे ना?' क्रोध आणि शांति दोन्ही जवळ जवळ बसतात. आता आपण क्रोधाला नाही ओळखले तर तो शांति ला दाबणार. तर शांति मरून जाईल. अर्थात् दाबण्यासारखी चीज नाही. तेव्हा त्याला समजते कि क्रोध अहंकार आहे. आता कुठल्या प्रकारच्या अहंकाराने क्रोध होतो याची सविस्तर चौकशी करायला हवी. ह्या मुलाने ग्लास फोडला तर क्रोध आला, इथे आमचा कोणता अहंकार आहे? ह्या ग्लासाचे नुकसान होईल असा अहंकार आहे. नफानुकसानचा अहंकार आहे आपला. म्हणून नफा-नुकसानाच्या अहंकाराला, त्यावर विचार करून निर्मूळ करा. खोट्या अहंकारचा संग्रह केल्याने क्रोध येत राहणार. क्रोध आहे, लोभ आहे, हे तर मूळात अहंकारच आहे. क्रोधाचे शमन, कुठल्या समजुतीने ? क्रोध स्वत:च अहंकार आहे. आता याचा तपास करायला हवा कि, Page #26 -------------------------------------------------------------------------- ________________ क्रोध कशाप्रकारे तो अहंकार आहे. तपासणी केल्याने त्याला पकडू शकू कि, क्रोध हा अहंकार आहे. हा क्रोध उत्पन्न का झाला? तेव्हा म्हणे कि, 'ह्या बहिणीने कप-बशी फोडली, म्हणून राग आला.' आता कप-बशी फोडली, त्यात आपल्याला काय हरकत आहे? तेव्हा म्हणतात कि, 'आमच्या घराचे नुकसान झाले' आणि नुकसान झाले म्हणून परत वरून रागावणे? हा अहंकार करणे, रागावणे, हे सगळे बारीकपणे विचार तर करा, विचार केल्यावर सगळा अहंकार धुवून जाईल असे आहे. आता हा कप तुटला हे निवार्य आहे कि अनिवार्य आहे? अनिवार्य संयोग असतात कि नाही? शेठ नोकराला ओरडतो कि, 'कप-बशी का फोडली? तुझे हात तुटले होते का? तू असा आहेस, तसा आहेस.' आता हे जर अनिवार्य आहे, तर त्याला रागवायला हवे का? जावयाच्या हातून कप-बशी फुटली, तर तिथे एक शब्द ही नाही बोलत. कारण तो सुपिरियर ठरतो, तिथे चुप्पी. आणि इन्फिरियर आला तिथे धुत्कारले. हा सगळा इगोइझम (अहंकार) आहे. सुपिरियर ठरतो, तिथे चुप्पी नाही साधत? 'दादाजीं'च्या हातून जर काही तुटले तर मनात काही येणार नाही आणि त्या नोकराच्या हातून तुटले तर? या संसाराने कधी न्याय पाहिलाच नाही. न समजल्या कारणाने हे सगळे आहे. जर बुद्धिपूर्वक समज असती तरी खूप झाले असते. बुद्धि जर विकसित असली, समजदारीवाली असती, तर झगडा होईल असे होणारच नाही. आता भांडण केल्यावर काही कप-बशी परत येणार आहे का? फक्त संतोष मिळतो, इतकेच ना. आणि मनात क्लेश होतो तो वेगळाच. म्हणून ह्या व्यापारात एक तर ती कप-बशी गेली हे नुकसान, दुसरे क्लेश झाला हे नुकसान आणि नोकरा बरोबर वैर झाले हे नुकसान!!! नोकर वैर बांधेल कि, 'मी गरीब आहे' म्हणून मला असे म्हणतात. पण हे वैर काही सोडणार नाही आणि भगवानने पण सांगितले आहे कि कोणा बरोबर वैर नका ठेवू. होऊ शकेल तर प्रेम बांधा, पण वैर बांधू नका. कारण प्रेम बांधले तर, ते प्रेम स्वत:हून वैर उखडून टाकेल. प्रेम तर वैराला खोदून काढेल असा आहे, वैराने वैर तर वाढतच राहते. निरंतर वाढतच Page #27 -------------------------------------------------------------------------- ________________ १८ क्रोध राहते. वैराच्या कारणाने हे सगळे भटकणे आहे. हा मनुष्य का भटकतो? तीर्थंकर भगवान नाही मिळाले होते का? तेव्हा म्हणतात, 'तीर्थंकर तर मिळाले होते. त्यांचे उपदेश पण ऐकले, पण काही कामी नाही आले.' __ काय-काय अडचणी येतात, कुठे कुठे विरोध होतो, तर त्या विरोधांना मिटवून टाक ना. विरोध होतो, ही संकुचित दृष्टि आहे. म्हणून ज्ञानी पुरूष लोंग साइट (दीर्घ दृष्टि) देतात. लोंग साइटच्या आधाराने सगळे 'जसे आहे तसे' नजर येते. मुलांवर राग येतो तेव्हा... प्रश्नकर्ता : घरात मुलांवर क्रोध येतो त्याचे काय करावे? दादाश्री : नासमजीमुळे क्रोध येतो. त्याला आपण विचारा कि, तुला खूप मजा आली होती? तेव्हा तो म्हणेल कि मला आत खूप वाईट वाटले, आत खूप दुःख झाले होते. त्याला दुःख होतो आपल्याला ही दुःख होतो तर मग मुलावर चिडायची जरूरच कुठे आहे? आणि चिडल्यावर सुधारत असेल तर चिडा. परिणाम चांगला येत असेल तर चिडणे कामाचे, परिणाम चांगला नाही येत, तर चिडण्याला काय अर्थ? क्रोध केल्याने फायदा होत असेल तर करा आणि जर फायदा होत नाही, तर असेच चालवून घ्या. प्रश्नकर्ता : जर आपण क्रोध नाही केला तर ते आपले ऐकणार नाही, खाणारही नाहीत. दादाश्री : क्रोध केल्यानंतर तरी कुठे ऐकातात? वीतरागांची सूक्ष्म दृष्टि तर बघा तरीपण आपली लोकं काय म्हणतात कि, पिता आपल्या मुलांवर इतका क्रोधित झाला आहे, म्हणून हा बाप नालायक आहे. आणि निसर्गात याचा न्याय कसा होत असतो? पिताला पुण्य लाभतो. हां. कारण त्याने Page #28 -------------------------------------------------------------------------- ________________ क्रोध मुलांच्या हितासाठी स्वतःशी संघर्ष केला. मुलाच्या सुखासाठी स्वतःशी संघर्ष केला, म्हणून पुण्य बांधले. बाकी सगळ्या प्रकारचा क्रोध पापच बांधतो. हा एकच प्रकार आहे कि, जो मुलाच्या किंवा शिष्याच्या भल्यासाठी क्रोध करतात. ते आपले बाजूला ठेवून त्यांच्या सुखासाठी करतात, म्हणून पुण्य बांधतात. तरीपण लोकं तर त्याला अपयशच देत असतात. पण ईश्वराच्या घरी खरा न्याय आहे कि नाही? आपल्या मुलावर, मुलीवर जे क्रोध करतात ना, त्यात हिंसकभाव नाही होत. बाकी सगळ्यात हिंसकभाव असतो. तरीपण यात तांता तर असतोच, कारण त्यांना मुलीला पाहिल्या बरोबर च आत क्लेश सुरू होतो. जर क्रोधामध्ये हिंसकभाव आणि तांता, ह्या दोन नसतील, तर मोक्ष मिळतो. आणि जर हिंसकभाव नाही, फक्त तांता आहे, तर पुण्य बांधतात. कसे सूक्ष्मतेने भगवानने शोधून काढले आहे. क्रोध केला तरीपण बांधतात पुण्य भगवानने सांगितले आहे कि दुसऱ्याच्या भल्यासाठी क्रोध केला, परमार्थ हेतु क्रोध केला तर त्याचे फल पुण्य मिळते. आता ह्या क्रमिक मार्गात तर शिष्य घाबरत राहतात कि, 'आता काही सांगतिल, आता काही सांगतिल' आणि ते (गुरू) पण पूर्ण दिवस सकाळपासून अकडून बसून राहतात. तर थेट दहाव्या गुणस्थानापर्यंत तसाच वेष, त्यांनी डोळे लाल केले तर आत आग झरते. किती साऱ्या वेदना होत असतील. तेव्हा कसे पोहोचणार? म्हणून मोक्ष मिळवणे काय असेच लाडू खायचा खेळ आहे? हे तर कधीतरी असे अक्रम विज्ञान प्राप्त होते. क्रोध म्हणजे एक प्रकारचे सिग्नल संसारातील लोक काय म्हणतात कि, या भाऊने मुलावर क्रोध केला, म्हणून तो गुन्हेगार आहे आणि त्याने पाप बांधले. भगवान असे नाही म्हणत, भगवान म्हणतात कि, 'मुलावर क्रोध नाही केला, म्हणून त्याचा Page #29 -------------------------------------------------------------------------- ________________ क्रोध २० 'क्रोध बाप गुन्हेगार आहे. म्हणून त्याला शंभर रूपये दंड होतो.' तर मग, करणे ठीक आहे?' तेव्हा म्हणतात, 'नाही, पण आता त्याची जरूरत होती. जर येथे क्रोध नाही केला असता, तर मुलगा वाईट रस्त्याला गेला असता'. अर्थात् क्रोध एक प्रकारचे लाल सिग्नल आहे, दुसरे काही नाही. जर डोळे नसते दाखवले, आणि क्रोध नाही केला असता, तर मुलगा उलट्या रस्त्याने गेला असता. येथे भगवान तर, बापाने मुलावर क्रोध केला, तरीपण शंभर रूपये ईनाम देतात. क्रोध तर लाल झेंडा आहे. हेच पब्लिकला माहित नाही आणि किती प्रमाणात लाल झेंडा ऊभा करायचा, किती वेळेसाठी ऊभा करायचा, हे समजण्याची जरूरी आहे. आता रेलगाडी जात आहे आणि अडीच तास लाल झेंडा घेऊन विनाकारण ऊभे राहिलात, तर काय होईल? अर्थात् लाल सिग्नलची जरूरी आहे, पण किती टाईम ठेवावा, हे समजण्याची जरूरी आहे. थंड राहणे हे हिरवे सिग्नल आहे. रौद्रध्यानचे रूपांतर धर्मध्यानमध्ये मुलावर क्रोध केला, पण आपला आतमध्ये भाव काय आहे कि, असे नाही व्हायला पाहिजे, असेच ना! तुमचा भाव काय आहे? प्रश्नकर्ता : हो, असे नाही व्हायला पाहिजे ? दादाश्री : म्हणून हे रौद्रध्यान होते, ते धर्मध्यानात रूपांतरीत झाले. क्रोध आला तरीपण परिणामात आले धर्मध्यान. प्रश्नकर्ता : असे नाही व्हायला पाहिजे, हा भाव राहिला म्हणून? दादाश्री : हिंसकभाव नाही त्याच्यापाठी. हिंसकभावा शिवाय क्रोध होतच नाही, पण क्रोधाची काही एक स्थिती आहे कि, जर स्वत:चा मुलगा, स्वत:चा मित्र, स्वत:ची बायको ह्यांचा वर क्रोध केल्याने पुण्य Page #30 -------------------------------------------------------------------------- ________________ २१ क्रोध बांधले जाते. कारण हे पाहिले जाते कि क्रोध करण्यामागे त्याचा हेतु काय आहे? प्रश्नकर्ता : प्रशस्त क्रोध. दादाश्री : आणि तो अप्रशस्त क्रोध, त्याला वाईट म्हणतात. म्हणून या क्रोधातही इतके भेद आहेत, दुसरे, पैस्यांसाठी मुलाला भलं-बूरं बोलला कि, तू धंद्यामध्ये बरोबर लक्ष नाही देत, हा क्रोध वेगळा आहे. मुलाला सुधारण्यासाठी, चोरी करत असेल, दुसरे काही उलट-सुलट काम करत असेल, त्यासाठी मुलाला आपण रागावलो, क्रोध केला त्याचे फळ भगवानने पुण्य सांगितले आहे. भगवान किती शहाणे आहेत. क्रोध टाळू असे प्रश्नकर्ता : आपण क्रोध कोणावर करतो? खास करून ऑफिसमध्ये सेक्रेटरी वर क्रोध नाही करत आणि हॉस्पिटलमध्ये नर्स वर नाही करत, पण घरात बायकोवर आपण क्रोध करतो. दादाश्री : म्हणून जेव्हा शंभर लोकं बसलेले असतात आणि ऐकत असतील, तेव्हा मी सगळ्यांना सांगतो कि ऑफिसमध्ये बॉस (मालक) धमकावत असेल किंवा ओरडत असेल, तर त्या सगळ्यांचा क्रोध लोकं घरी बायकोवर काढतात. म्हणून मला सांगावे लागते कि, अरे वेड्या, बिचाऱ्या बायकोबरोबर का लढतो. विनाकारण बायकोला ओरडता. बाहेर जे धमकावतात त्यांच्याशी लढा ना, इथे का लढता बिचारी बरोबर? एक भाऊसाहेब होते, ते आमचे ओळखीचे होते. ते मला नेहमी म्हणत कि, 'साहेब एकदा माझ्या घरी या.' तो कडियाकाम करायचा. एक दिवस मी तिथून जात होतो, तेव्हा मला भेटला आणि म्हणाला, 'माझ्या घरी चला ना.' तेव्हा मी त्याच्या घरी गेलो. तिथे मी विचारले, 'अरे, दोन रूममध्ये तुला अनुकूल होते?' तेव्हा तो म्हणाला, 'मी तर पाहुणा म्हटला Page #31 -------------------------------------------------------------------------- ________________ २२ क्रोध जातो ना ! ' ही तर आमच्या जमान्याच्या, चांगल्या वेळेची गोष्ट करतो. आता तर एका रूममध्ये राहवे लागते, पण चांगल्या जमान्यातही बिचाऱ्याचे दोनच रूम होते. मग मी विचारले, 'काय बायको तुला हैरान नाही करत?' तेव्हा म्हणाला, 'बायकोला क्रोध आला तरी मी क्रोध नाही करत.' मी विचारले, 'असे का?' तेव्हा म्हणाला, 'जर ती क्रोध करेल आणि मी ही क्रोध केला, तर या दोन रूममध्ये, मी कुठे झोपू आणि ती कुठे झोपणार?' ती तिकडे तोंड करून झोपणार आणि मी इकडे तोंड करून झोपणार, अशा हालतमध्ये तर मला सकाळी चहा सुद्धा चांगली नाही मिळणार. तीच मला सुख देणारी आहे. तिच्यामुळेच मी सुखी आहे. मी विचारले, 'बायकोने कधी क्रोध केला तर?' तेव्हा म्हणतो, 'तिला समजावतो, 'यार जाऊ दे ना, माझी हालत मी जाणतो' असे तसे करून तिची समजूत काढतो. पण तिला खुश ठेवतो. बाहेर मारपीट करून येतो पण घरात तिला मारपीट नाही करत. आणि आपली लोकं बाहेर मार खाऊन येतात आणि घरात मारपीट करतात. हे तर संपूर्ण दिवस क्रोध करतात. गाई म्हशी तरी बऱ्या, क्रोध नाही करत. जीवनात काही शांति तर हवी ना. निर्बलता नाही असली पाहिजे. हा तर वारंवार क्रोधित होतो. आपण गाडीतून आलात ना? तेव्हा गाडीने संपूर्ण रस्त्यात क्रोध केला तर काय होईल? प्रश्नकर्ता : तर इथे येऊच नाही शकणार. दादाश्री : तेव्हा आपण क्रोध करता तर, तीची गाडी कशी चालत असणार? तू तर क्रोध नाही करत? प्रश्नकर्ता : कधी कधी होऊन जाते. दादाश्री : आणि जर दोघांनाही होत असेल, तर बाकी काय राहिले? प्रश्नकर्ता : पति-पत्नीमध्ये थोडा फार क्रोध तर असायला च पाहिजे ना? Page #32 -------------------------------------------------------------------------- ________________ क्रोध २३ दादाश्री : नाही, असा काही कायदा नाही. पति-पत्नीमध्ये तर खूप शांति राहायला हवी. जर दुःख होईल तर त्यांना पति-पत्नी नाही म्हणता येणार. फ्रेन्डशिप(मैत्री)मध्ये दुःख नाही होत, तर ही तर सगळ्यात मोठी फ्रेन्डशिप म्हणता येईल. इथे क्रोध नाही यायला पाहिजे. हे तर लोकांनी जबरदस्तीने हृदयात बसवले आहे. स्वतःला क्रोध होते म्हणून म्हणतात कि कायदा असाच आहे, पति - पत्नीमध्ये तर बिलकुल दुःख नसावे. भले ही दुसऱ्या जागी असूदे. मनमानी ने पडणार मार प्रश्नकर्ता : घरात किंवा बाहेर मित्रांमध्ये सगळ्या ठिकाणी प्रत्येकाची मतं भिन्न असतात आणि त्यात आपली धारणा ( मर्जी) अनुसार झाल्यावर, आपल्याला क्रोध का येतो? तेव्हा काय केले पाहिजे? दादाश्री : सगळी लोकं आपल्या मर्जी प्रमाणे करायला गेली, तर काय होणार? असा विचारच का येतो? लगेचच विचार आला पाहिजे कि, जर सगळी आपल्या मर्जी प्रमाणे करू लागली, तर इथे सर्व भांडी तोडणार समोरासमोर, आणि खायलाही नाही राहणार. म्हणून मर्जी प्रमाणे कधी करायचे नाही. आपण मर्जी प्रमाणे नाहीच केले तर चुकीचे नाही ठरणार. ज्याला करायचे असेल तो करेल, मर्जी प्रमाणे. प्रश्नकर्ता : आपण कितीही शांत राहिलो पण पतिने क्रोध केला तर आम्हाला काय केले पाहिजे? दादाश्री : तो क्रोध करेल, आणि त्याच्या बरोबर भांडण करायचे असेल, तर आपल्यालाही क्रोध केला पाहिजे, अन्यथा नाही. जर फिल्म बंद करायची असेल तर शांत होऊन जा. फिल्म बंद करायची नसेल, तर रात्रभर चालू दे, कोण नको म्हणते? पसंद आहे का अशी फिल्म ? प्रश्नकर्ता : नाही, अशी फिल्म पसंद नाही. Page #33 -------------------------------------------------------------------------- ________________ २४ क्रोध दादाश्री : क्रोध करून काय करायचे आहे? तो मनुष्य क्रोध स्वत:हून नाही करत, ही तर 'मिकेनिकल एडजस्टमेन्ट' (डिस्चार्ज होणारी मनुष्य प्रकृति) क्रोध करते. म्हणून मग स्वत:ला मनात पश्चाताप होतो कि, हो क्रोध नसता केला तर चांगले झाले असते. प्रश्नकर्ता : त्याला थंड करण्यासाठी उपाय काय? दादाश्री : हे जर मशीन गरम झाली असेल आणि थंड करायची असेल तर थोडा वेळ बंद केल्याने आपणच थंड होऊन जाईल आणि जर हात लावला किंवा त्याला छेडले तर आपण जळून जावू. प्रश्नकर्ता : मला तर माझ्या पति वर क्रोध येतो, वाद होते, बाचाबाची होते सगळंच होते तर मी काय करू? दादाश्री : क्रोध तू करते कि तो? क्रोध कोण करते? प्रश्नकर्ता : मी सुद्धा करते मग. दादाश्री : तर आपल्याला स्वत:च आत विचारायला पाहिजे कि, 'तू असी का करतेस? आपण केलेले ते तर आपल्याला भोगावेच लागते ना.' पण प्रतिक्रमण केल्यावर सगळे दोष संपून जातात. नाहीतर आपणच दिलेले ठोसे आपल्याला मग भोगावे लागतात. पण प्रतिक्रमण केल्यावर जरा थंड पडतात. __ ही तर एक प्रकारे पशुता प्रश्नकर्ता : आपल्याला क्रोध आला आणि शिवी निघाली तर कशाप्रकारे सुधारायचे? दादाश्री : असे आहे कि हा जो क्रोध करतो आणि शिव्या देतो, हे स्वत:वर कंट्रोल नाही, म्हणून हे असे सर्व होते. कंट्रोल करण्यासाठी पहिले थोडे समजले पाहिजे. जर आपल्यावर कोणी क्रोध केला, तर Page #34 -------------------------------------------------------------------------- ________________ क्रोध २५ आपल्याला सहन होणार कि नाही, ह्याचा विचार केला पाहिजे, आपण क्रोध करणार, त्याच्या आधी, जर आपल्यावर कोणी क्रोध केला तर आपल्याला सहन होणार का? चांगले वाटेल कि नाही? आपल्याला जितके चांगले वाटेल, तितकेच वर्तन दुसऱ्यांबरोबर करावे. तो तुला शिव्या देतो आणि तुला त्रास नाही होत, डिप्रेशन नाही येत, तर तुही तसे कर, नाहीतर ते बंद च कर. शिव्या तर देवूच नये. ही तर एक प्रकारे पशुता आहे. अन्डरडेवलप्ड पीपल, अन्कल्चर्ड (अल्पविकसित मनुष्य, असंस्कृत). प्रतिक्रमण हाच सच्चा मोक्षमार्ग पहिले तर दया ठेवा. शांति ठेवा. समता ठेवा, क्षमा ठेवा, असा उपदेश शिकवतात, तेव्हा ही लोकं काय म्हणतात, 'अरे, मला क्रोध येत राहतो आणि तुम्ही म्हणता कि क्षमा ठेवा, पण मी कशाप्रकारे क्षमा ठेवू ? ' म्हणून यांना उपदेश कशाप्रकारे दिला गेला पाहिजे कि, आपल्याला क्रोध आल्यावर अशाप्रकारे मनात पश्चाताप करा कि, माझी काय कमजोरी आहे कि, मला अशाप्रकारे क्रोध येतो. ही माझ्याकडून चुक झाली, असा पश्चाताप करा आणि वर कोणी गुरू असेल तर त्याची मदद घ्या आणि परत अशी कमजोरी पैदा नको होवू दे, असा निश्चय करा, आपण क्रोधाची रक्षा नका करू, उलट प्रतिक्रमण करा. म्हणून दिवसातून किती अतिक्रमण होतात आणि कोणा कोणा बरोबर होतात हे नोंद करा आणि त्याच वेळी प्रतिक्रमण करा. प्रतिक्रमण मध्ये तुम्हाला काय करायला हवे? तुम्हाला राग आला आणि समोरच्या माणसाला दुःख झाले, तर त्याच्या आत्म्याला आठवण करून त्याची क्षमा मागावी. अर्थात् जे झाले त्याची क्षमा मागा आणि परत तसे करणार नाही अशी प्रतिज्ञा करा. आणि आलोचना म्हणजे आमच्याकडे दोष जाहिर करा कि, माझी ही चुक झाली. Page #35 -------------------------------------------------------------------------- ________________ २६ क्रोध मनातही माफी मागा प्रश्नकर्ता : दादाजी, पश्चाताप किंवा प्रतिकमण करतानां कित्येकदा असे होते कि, एखादी चुक झाली, तेव्हा आत दुःख होते कि, हे चुकीचे झाले, पण समोरच्याची माफी मागण्याची हिंमत नाही होत. __दादाश्री : अशी माफी मागायचीच नाही. नाहीतर ते त्याचा दुरूपयोग करणार. 'हां. आता आले ना ठिकाणावर?' असे आहे हे, नोबल जात नाही. हा माफी मागण्यालायक मनुष्य नाही. म्हणून त्याच्या शुद्धात्म्याला आठवण करून मनात माफी मागा. हजारांत कोणी दहा लोकं अशी निघतील कि माफी मागायच्या आधीच झुकतील. रोकडा परिणाम, हार्दिक प्रतिक्रमणाचे प्रश्नकर्ता : कोणावर भारी क्रोध आला, मग बोलून चूप झाले, नंतर हे जे बोललो त्यासाठी परत परत जीवाची जळ जळ होत राहते, तर त्यात एकापेक्षा अधिक प्रतिक्रमण करावी लागतील? दादाश्री : त्यात दोन-तीन वेळा खऱ्या हृदयाने प्रतिक्रमण करा आणि असे एकदम पद्धतसर झाले तर पूर्ण झाले. 'हे दादा भगवान, मला जबरदस्त क्रोध आला, समोरच्याला खूपच दुःख झाला, त्याची माफी मागतो, आपल्याकडे खूप माफी मागतो.' गुन्हा पण निर्जीव प्रश्नकर्ता : अतिक्रमणाने उत्तेजना होत असते, ती प्रतिक्रमणाने शांत होऊन जाते? दादाश्री : हा, शांत होऊन जाते, चिकनी फाईल (गाढ हिशोब) असली, तर पाच पाच हजार प्रतिक्रमण करावे लागतात, तेव्हा शांत होतो. राग बाहेर नाही आला आणि व्याकुलता आली तरी, आपण त्यासाठी प्रतिक्रमण नाही केले, तर तेवढा दाग राहून जाणार. प्रतिक्रमण केल्यावर Page #36 -------------------------------------------------------------------------- ________________ क्रोध २७ साफ होऊन जातो. अतिक्रमण केले म्हणून प्रतिक्रमण केल्याने साफ होऊन जातो. अतिक्रमण केले म्हणून प्रतिक्रमण करा. प्रश्नकर्ता : कोणा वर क्रोध केल्यानंतर लक्षात आले आणि त्याच क्षणी आपण त्यांची क्षमा मागितली, तर त्याला काय म्हणावे ? दादाश्री : आता ज्ञान घेतल्यानंतर क्रोध आला आणि मग माफी मागितली, तर काही हरकत नाही, मुक्त झालात. आणि अशी रूबरूमाफी नाही मागू शकलात असे असेल तर मनात माफी मागा, तर झाले. प्रश्नकर्ता : रूबरू सगळ्यांच्या मध्ये ? दादाश्री : असे रूबरू कोणी नाही मांगत तर हरकत नाही आणि अशीच आतून माफी मागितली तरी चालेल. कारण हा गुना जिवंत नाही, हा डिस्चार्ज आहे. ‘डिस्चार्ज’ गुन्हा म्हणजे हा जिवंत गुन्हा नाही. म्हणून इतके वाईट फळ नाही देत. प्रतिष्ठामुळे कषाय ऊभे हा सगळा व्यवहार आपण नाही चालवत, क्रोध - मान-माया-लोभ हे सगळे कषाय चालवते. कषायांचे राज्य आहे. 'स्वतः कोण आहोत' याचे भान आल्यावर कषाय जाणार. क्रोध आल्यावर पश्चाताप होणे, पण भगवानने सांगितलेले प्रतिक्रमण नाही येत तर काय होईल? प्रतिक्रमण आले तर सुटका होऊन जाते. अर्थात् ही क्रोध-मान-माया - लोभ ची सृष्टि कुठपर्यंत ऊभी आहे? 'मी चन्दुलाल (वाचकांनी चन्दुलालच्या जागी आपले नांव समजावे) आहे आणि असाच आहे' असा निश्चय आहे, तोपर्यंत ऊभी राहणार. जो पर्यंत आपण प्रतिष्ठा केलेली आहे कि 'मी चन्दुलाल आहे' लोकांनी आमची प्रतिष्ठा केली आणि आपण पण मानले कि 'मी चन्दुलाल आहे' तोपर्यंत हे क्रोध-मान-माया - लोभ आत राहतात. Page #37 -------------------------------------------------------------------------- ________________ क्रोध स्वत:ची प्रतिष्ठा केव्हा समाप्त होणार कि 'मी शुद्धात्मा आहे' हे भान होईल तेव्हा. अर्थात् स्वत:च्या निज स्वरूपात आलात तर प्रतिष्ठा तुटून जाणार. तेव्हा क्रोध-मान-माया-लोभ जाणार नाहीतर नाही जाणार, मारत राहिले तरी नाही जाणार आणि उलट वाढत राहणार. एकाला मारले तर दुसरे वाढणार आणि दुसऱ्याला मारले तर तिसरा वाढणार. क्रोध दुबळा तिथे मान तगडा एक महाराज म्हणतात, मी क्रोधाला दाबून निर्मूल करून टाकले. मी सांगितले, 'त्याचे परिणाम स्वरूप हे 'मान' नांवाचा रेडा अधिक तगडा झाला.' मान तगडा होत राहतो, कारण मायाची मुले ही मरणार असे नाही. त्यांचा उपाय केला तर जातील असे आहेत, नाहीतर जाणाऱ्यातील नाहीत. ती मायाची संतान आहेत. तो मान नांवाचा रेडा इतका तगडा झाला. जितके 'मी क्रोधाला दाबले मी क्रोधाला दाबले' म्हणतो, तर मग तो (मान) तगडा झाला. याच्या तुलनेत चारही समान होते, हे ठीक होते. क्रोध आणि माया रक्षक आहेत क्रोध आणि माया. हे तर रक्षक आहेत. हे तर लोभ आणि मानाचे रक्षक आहेत. लोभाचा खरा रक्षक माया आणि मानाचा खरा रक्षक क्रोध. तरीपण मानासाठी थोडीसी माया करतात, कपट करतात. कपट करून ही मान प्राप्त करतात, असे करतात का लोक? आणि क्रोध करून लोभ करतात. लोभी, क्रोधी नाही होत आणि जर क्रोध केला तर समजा कि त्याला लोभामध्ये काहीतरी बाधा आली आहे, म्हणून तो क्रोध करत आहे. उलट लोभीला शिव्या दिल्या तरी तो सांगेल 'भले ही कोणी आरडाओरडा केला पण आपल्याला तर रूपया मिळाला ना.' लोभी असे असतात. कारण कपट सगळ्यांचे रक्षण करेलच ना. कपट म्हणजे माया, आणि क्रोध, हे सगळे रक्षक आहेत. आपल्या मानवर बाधा आली, तर मनुष्य क्रोध करतो. आपला मान Page #38 -------------------------------------------------------------------------- ________________ क्रोध २९ भंग झाला, तिथे क्रोध होतो. क्रोध भोळा आहे. भोळा पहिला नष्ट होतो. क्रोध तर दारूगोळा आहे, आणि दारूगोळा असणार, तिथे लश्कर लढणारच. क्रोध गेला तर लश्कर का लढणार? मग तर ऐरे गैरे सगळे पळून जातील. कोणी ऊभा नाही राहणार. - क्रोधाचे स्वरूप क्रोध उग्र परमाणु आहे. फटाक्याच्या आत बारूद भरलेला आहे आणि फुटला तेव्हा ज्वाला भडकते. आतील बारूद संपल्यावर आपणच फटाका शांत होऊन जाते. तसेच क्रोधाचे आहे. क्रोध उग्र परमाणु आहे, आणि ते जेव्हा ‘व्यवस्थित शक्ति' चा नियमाने फुटतात, तेव्हा चारी बाजूने पेटतात. फक्त उग्र राहतो त्याला आम्ही क्रोध नाही म्हणत, ज्या क्रोधामध्ये तांता राहतो, तोच क्रोध म्हणतात. क्रोध केव्हा म्हणतात कि आत जलन होते. जलन होते आणि ज्वाला भडकत राहते, दुसऱ्यांवरही त्याचा परिणाम होत असतो हे क्रोधाचे एक रूप (कढापा), आणि दूसऱ्या रूपात स्वतः एकटाच आतल्या आत जळत राहतो त्याला बैचेनी (अजंपा) म्हणतात. पण तांता तर दोन्ही रूपात असणार. तर उग्रता ही वस्तु वेगळी च आहे. कुढने, सहन करणे, हा पण क्रोध क्रोधाची वाणी नाही निघाली तर समोरच्याला नाही लागत. तोंडाने बोललात, त्यालाच क्रोध म्हणतात असे नाही, आत कुढत राहणे हा पण क्रोध आहे. अर्थात् सहन करणे हा तर डबल क्रोध आहे. सहन करणे म्हणजे दाबत राहणे, तो तर एक दिवस स्प्रिंग उडाली का कळेल. सहन का करायचे? याचा तर ज्ञानाने मार्ग शोधून काढला पाहिजे. क्रोधात मोठी हिंसा बुद्धि इमोशनल असते, ज्ञान मोशन (गती) मध्ये राहते. जशी ट्रेन मोशनमध्ये चालते, जर ती इमोशनल झाली तर ? Page #39 -------------------------------------------------------------------------- ________________ 30 प्रश्नकर्ता : एक्सिडन्ट होईल. दादाश्री : वेडीवाकडी होत चालली तर एक्सिडन्ट होईल. अश्याचप्रकारे मनुष्य जेव्हा इमोशनल होतो, तेव्हा कितीतरी जीव आत मरतात. क्रोध आल्यावर कितीतरी छोटे छोटे जीव (शरीरात) मरून जातात आणि वरून स्वतः दावा करतो कि, 'मी तर अहिंसा धर्माचे पालन करतो, जीव हिंसा तर करतच नाही' अरे, पण क्रोधाने तर नुसते जीवच मरतात, इमोशनल झाल्यामुळे. क्रोध जिंकता येईल असे... द्रव्य अर्थात् बाहेरील व्यवहार, तो नाही पलटत, पण भाव पलटले तरी खूप झाले. कोणी म्हणेल कि क्रोध बंद करायचा आहे, तर आजच क्रोध बंद नाही होणार, क्रोध बंद करायचा, तर ते कशाप्रकारे होईल? क्रोधाला ओळखायला हवे, कि क्रोध काय आहे? का उत्पन्न होतो? त्याचा जन्म कशाच्या आधारे होतो? त्याची आई कोण? त्याचे वडील कोण? सगळे शोधल्यानंतर क्रोधाला ओळखू शकाल. सुटलेलेच सोडवतील आपल्याला सगळे काढायचे आहे? काय काय काढायचे आहे, सांगा, लिस्ट (यादी) बनवून मला द्या. ते सगळे काढून टाकू. आपण क्रोध-मान-माया-लोभाने बांधलेले आहात? प्रश्नकर्ता : एकदम. दादाश्री : अर्थात् बांधलेला मनुष्य स्वत:हून कसा सुटू शकतो? असे चारी बाजूंनी हात-पाय कसून बांधलेले असतील, तर तो स्वतः कसा मुक्त होऊ शकतो? Page #40 -------------------------------------------------------------------------- ________________ क्रोध प्रश्नकर्ता : त्याला कुणाची तरी मदत घ्यावी लागेल. दादाश्री : बांधलेल्याची हेल्प ( मदत ) घ्यायला हवी? प्रश्नकर्ता : स्वतंत्र असेल त्याचीच हेल्प घेतली पाहिजे. ३१ दादाश्री : मी कोणाला विचारतो कि भाऊ, कोणी आहे इथे सुटलेला? मुक्त आहे? तर आम्हाला इथे हेल्प करा. अर्थात् जो मुक्त झाला तो मुक्त करतो, बाकी दुसरा कोणी नाही करू शकणार. क्रोध-मान-माया-लोभ यांचा खुराक काही लोक जागृत असतात, ते म्हणतात कि हा जो क्रोध येतो तो आम्हाला पसंद नाही, तरीपण करावा लागतो. आणि काहीतर क्रोध करतात आणि म्हणतात, ‘क्रोध नाही केला तर आमची गाडी चालणार नाही, आमची गाडी बंद होऊन जाईल.' असे पण म्हणतात. क्रोध-मान-माया-लोभ निरंतर स्वत:चाच चोरून खातात, पण लोकांना नाही समजत. या चारहिंना जर तीन वर्ष उपाशी ठेवले तर ते पळून जातील. पण ज्या खुराकाने ते जगतात तो खुराक काय आहे? जर हे नाही जाणले, तर ते कशाप्रकारे उपाशी मरणार? त्याची समज नसल्यामुळेच खुराक मिळतो. ते जगतात कशाप्रकारे ? आणि ते ही अनादि कालापासून जगत आहेत ! म्हणून त्यांचा खुराक (जेवण) बंद करा, असा विचार तर कोणालाही नाही येत आणि सगळे त्याचा पाठी लागून काढायला लागलेत. ते चारी असेच जाणाऱ्यातील नाहीत. ते तर आत्मा बाहेर निघाल्यावर आतील सगळे झाडून पुसून मग निघतील. त्याला हिंसक मार नाही पाहिजे, त्याला तर अहिंसक मार पाहिजे. 'तो तर क्रोध होतो तेव्हा, आचार्य शिष्याला कधी धमकवतात? तेव्हा कोणी म्हणेल, 'महाराज याला का धमकवता?' तेव्हा महाराज म्हणातात, धमकवण्या योग्यच आहे' झाले, संपले ! असे म्हणतात तेच क्रोधाची खुराक. केलेल्या क्रोधाचे रक्षण करणे, हाच त्याचा खुराक. Page #41 -------------------------------------------------------------------------- ________________ ३२ जाहलमाला Honey क्रोध ह्या क्रोध-मान-माया-लोभाला तीन वर्ष जर खुराक नाही मिळाला तर मग स्वत:हून च पळून जातात, आम्हाला सांगावे लागत नाही. कारण प्रत्येक गोष्ट आपल्या आपल्या खुराकावर जिवंत आहे आणि संसारातील लोकं काय करतात? प्रतिदिन या क्रोध-मान-माया-लोभाला खुराक देत राहतात. प्रतिदिन भोजन देतात आणि मग ते (दोष) तगडे होऊन फिरत राहतात. मुलांना मारतात, खूप क्रोध आल्याने मारतात, मग बायको म्हणते, 'बिचाऱ्या मुलाला का इतके मारले?' तेव्हा म्हणतात, 'तू नाही समजणार, मारण्या योग्यच आहे' यावर क्रोध समजून जातो कि, 'अरे वाह, मला खुराक दिला. चुक आहे असे नाही समजत आणि मारण्या लायक आहे असा अभिप्राय दिला आहे. म्हणून हा मला खुराक खायला देतो आहे.' याला खुराकच म्हणतो. 'क्रोध वाईट आहे' असे समजले तर त्याला खुराक नाही म्हणत. क्रोधाची तरफदारी केली, त्याची बाजू घेतली, तर त्याला खुराक मिळाला. खुराकामुळेच तो जगत आहे. लोकं त्याचा पक्ष घेतात ना ! क्रोध-मान-माया-लोभ कुठल्याही गोष्टीचे आम्ही (दादाजीने) रक्षण नाही केले. क्रोध आला तर कोणी म्हणेल कि, 'हे क्रोध का करतात?' तेव्हा मी म्हणेन कि, 'ही क्रोध खूप चुकीची गोष्ट आहे, माझ्या निर्बलतेमुळे झाले.' अर्थात् आम्ही रक्षण नाही केले. पण लोकं रक्षण करतात. हे साधु तपकीर सुंगतात आणि आम्ही म्हणतो, 'साहिब, आपल्या सारखे तपकीर वापरता का?' तेव्हा जर ते म्हणाले, 'तपकीरची हरकत नाही' तर तो (दोष) वाढतो. हे चारही, क्रोध-मान-माया-लोभ आहे, यातील एकावर प्रेम जास्त असेल, दुसऱ्यावर त्यापेक्षा कमी असेल, अशाप्रकारे ज्याची तरफदारी जास्त, त्याची प्रियता अधिक. Page #42 -------------------------------------------------------------------------- ________________ क्रोध स्थूल कर्म : सूक्ष्म कर्म स्थूल कर्म म्हणजे काय, हे समजावतो, तुला एकदम क्रोध आला, तू क्रोध करू इच्छित नव्हता तरीपण आला, असे होते कि नाही? प्रश्नकर्ता : होते. दादाश्री : हा क्रोध आला तर त्याचे फल इथेच लगेच मिळते. लोक म्हणतात कि, 'जाउदे ना त्याला, तो आहेच खूप क्रोधी.' कोणी त्याला समोरून थप्पडही मारेल. म्हणजे अपयश किंवा असल्या कुठल्या प्रकारे इथला फळ मिळेल. अर्थात् क्रोधित होणे स्थूल कर्म आहे. आणि क्रोधित होणे त्याच्या मागे आज तुझा भाव काय आहे 'क्रोध केलाच पाहिजे.' तर तो पुढच्या अवताराचा परत क्रोधाचा हिशोब आहे. तुझा आजचा भाव आहे कि, क्रोध नाही केला पाहिजे, तुझ्या मनात निश्चय आहे कि, क्रोध करायचा च नाही, तरी होतो. तर पुढच्या अवतारासाठी तुझे बंधन नाही राहणार. या स्थूल कर्मात तुला क्रोध आला तर तुला या अवतारात मार खावा लागले. तरी तुला पुढच्या अवताराचे बंधन नाही राहणार, कारण सूक्ष्म कर्मात तुझा निश्चय आहे कि क्रोध करायचाच नाही. आणि आज एक मनुष्य कोणावर क्रोध नाही करत, तरी मनात म्हणतो कि, 'या लोकांवर क्रोध केला तरच ते सरळ होणार असे आहेत.' मग पुढच्या अवतारात तो परत क्रोधवाला होईल. अर्थात् बाहेर जो क्रोध होतो ते स्थूल कर्म आहे. त्यावेळी आत जो भाव असतो ते सूक्ष्म कर्म आहे. हे समजले तर स्थूल कर्माचे बिलकुल बंधन नाही. म्हणून हे 'सायन्स' (विज्ञान) मी नव्या प्रकारे सांगितले. आतापर्यंत 'स्थूल कर्मात बंधन आहे' असा जगाला ठाम शिकविले आहे आणि त्याच्याने लोकं भडकत राहतात. भेदज्ञानाने सुटेल कषाये प्रश्नकर्ता : चार कषायांना जिंकण्यासाठी एखादी प्राथमिक भूमिका Page #43 -------------------------------------------------------------------------- ________________ ३४ क्रोध तयार करणे जरूरी आहे? जर जरूरी आहे तर त्यासाठी काय करायला हवे? दादाश्री : असे आहे ना, जर क्रोध-मान-माया-लोभ, हे चार (कषाय) निघून गेले तर तो भगवान झाला. भगवंताने काय सांगितले आहे कि, तुझा क्रोध असा आहे कि, तुझ्या सख्या मामावर क्रोध करतो तर त्याचे मन तुझ्यापासून वेगळे होते, आयुष्यभरासाठी वेगळे होऊन जाते. तर तुझा क्रोध चुकीचा आहे. तो क्रोध जे मनाला वेगळा करतो वर्ष दोन वर्षासाठी. जो मनाला ब्रेकडाऊन करतो, त्याला अंतिम कक्षाचा यूजलेस (निकम्मा) क्रोध म्हटले आहे, त्याला अनंतानुबंधी क्रोध म्हटले आहे. आणि लोभ पण असा, परत मान, ते सगळे असे कठीण होतात कि ते संपल्यानंतर मनुष्य योग्य ठिकाणावर येतो आणि गुणस्थान प्राप्त करतो. नाहीतर गुणस्थानात ही नाही येत. क्रोध-मान-मायालोभ, हे चार अनंतानुबंधी कषाय गेले तरी खूप झाले. आता हे कधी जाणार? 'जिन'कडून ऐकले, तर ते जाणार. 'जिन' म्हणजे आत्मज्ञानी. तो कुठल्याही धर्माचा आत्मज्ञानी असूदे. वेदान्तचा असूदे, जैनचा असूदे, पण आत्मज्ञानी असला पाहिजे. त्याच्याकडून ऐकले तर श्रावक होणार. आणि श्रावक झाल्यावर त्याचे अनंतानुबंधी कषाय जातात. मग आपोआपच क्षयोपशम होत राहतो. __ आता दुसरा उपाय हा आहे कि, आम्ही त्याला भेदज्ञान करून देतो. तेव्हा सारे कषाय निघून जातात, संपून जातात. हे या काळाचे आश्चर्य आहे. म्हणून याला 'अक्रम विज्ञान' म्हटले आहे ना. जय सच्चिदानंद Page #44 -------------------------------------------------------------------------- ________________ नऊ कलमे १. हे दादा भगवान! मला कोणत्याही देहधारी जीवात्माचा किंचित्मात्र पण अहम् नाही दुभावणार, नाही दुभावले जाणार की दुभावण्या प्रति अनुमोदन नाही केले जाणार अशी परम शक्ति द्या. मला कोणत्याही देहधारी जीवात्माचा किंचित्मात्र पण अहम् नाही दुभावणार, अशी स्याद्वाद वाणी, स्यावाद वर्तन आणि स्याद्वाद मनन करण्याची परम शक्ति द्या. २. हे दादा भगवान ! मला कोणत्याही धर्माचे किंचित्मात्र पण प्रमाण नाही दुभावणार, नाही दुभावले जाणार अथवा दुभावण्या प्रति अनुमोदन नाही केले जाणार अशी परम शक्ति द्या. मला कोणत्याही धर्माचे किंचित्मात्र पण प्रमाण नाही दुभावणार, अशी स्यावाद वाणी, स्याद्वाद वर्तन आणि स्याद्वाद मनन करण्याची परम शक्ति द्या. ३. हे दादा भगवान! मला कोणत्याही देहधारी उपदेशक, साधु, साध्वी की आचार्य यांचा अवर्णवाद, अपराध, अविनय न करण्याची परम शक्ति द्या. ४. हे दादा भगवान ! मला कोणत्याही देहधारी जीवात्मा प्रति किंचित्मात्र पण अभाव, तिरस्कार कधीही नाही केला जाणार, नाही करविले जाणार की कर्ताचे प्रति अनुमोदन नाही केले जाणार अशी परम शक्ति द्या. ५. हे दादा भगवान! मला कोणत्याही देहधारी जीवात्माशी कधीपण कठोरभाषा, तंतीली(टोचणारी) भाषा न बोलण्याची, न बोलावयाची की बोलण्या प्रति अनुमोदन नाही करण्याची अशी परम शक्ति द्या. कोणी कठोरभाषा, तंतीलीभाषा बोलले तर मला मृदु-ऋजु भाषा बोलण्याची परम शक्ति द्या. ६. हे दादा भगवान! मला कोणत्याही देहधारी जीवात्मा प्रति स्त्री-पुरुष किंवा नपुंसक, कोणता ही लिंगधारी असो, तर त्या संबंधी किंचित्मात्र पण विषयविकार संबंधी दोषं, इच्छां, चेष्टां किंवा विचार संबंधी दोषं न करण्याची, न करविण्याची की कर्ता प्रति अनुमोदन न करण्याची अशी परम शक्ति द्या. मला निरंतर निर्विकार राहण्याची परम शक्ति द्या. ७. हे दादा भगवान ! मला कोणत्याही रसमध्ये लुब्धपणा न करण्याची अशी शक्ति द्या. समरसी आहार घेण्याची परम शक्ति द्या. ८. हे दादा भगवान ! मला कोणत्याही देहधारी जीवात्माचा प्रत्यक्ष अथवा परोक्ष, जीवंत अथवा मृत्यु पावलेल्या, कोणाचाही किंचित्मात्र पण अवर्णवाद, अपराध, अविनय नाही करणार, नाही करविले जाणार की कर्ता प्रति अनुमोदन नाही केले जाणार अशी परम शक्ति द्या. ९. हे दादा भगवान! मला जगत कल्याण करण्याचे निमित्त बनण्याची परम शक्ति द्या, शक्ति द्या, शक्ति द्या. एवढेच तुम्ही 'दादा' जवळ मागायचे. ही दररोज मिकेनिकली(यंत्रवत्) वाचण्याची वस्तु नाही, अंतरात ठेवण्याची वस्तु आहे. ही दररोज उपयोगपूर्वक भावण्याची वस्तु आहे. एवढ्या पाठांत तमाम शास्त्रांचा सार येऊन जातो. Page #45 -------------------------------------------------------------------------- ________________ प्राप्तिस्थान दादा भगवान परिवार अडालज : त्रिमंदिर संकुल, सीमंधर सिटी, अहमदाबाद- कलोल हाईवे, पोस्ट : अडालज, जि.-गांधीनगर, गुजरात - 382421. फोन : (079) 39830100, E-mail : info@dadabhagwan.org अहमदाबाद: दादा दर्शन, ५, ममतापार्क सोसाइटी, नवगुजरात कॉलेज के पीछे उस्मानपुरा, अहमदाबाद-380014. फोन : (079) 27540408 राजकोट : त्रिमंदिर, अहमदाबाद-राजकोट हाईवे, तरघड़िया चोकड़ी (सर्कल), पोस्ट : मालियासण, जि.-राजकोट. फोन : 9274111393 भुज : त्रिमंदिर, हिल गार्डन के पीछे, एयरपोर्ट रोड. फोन : (02832) 290123 गोधरा : त्रिमंदिर, भामैया गाँव, एफसीआई गोडाउन के सामने, गोधरा (जि.-पंचमहाल). फोन : (02672) 262300 वडोदरा : दादा मंदिर, १७, मामा की पोल-मुहल्ला, रावपुरा पुलिस स्टेशन के सामने, सलाटवाड़ा, वडोदरा. फोन : 9924343335 मुंबई :9323528901 दिल्ली : 9810098564 कोलकता : 033-32933885 :9380159957 जयपुर : 9351408285 भोपाल :9425024405 इन्दौर : 9893545351 जबलपुर : 9425160428 रायपुर : 9329523737 भिलाई :9827481336 पटना : 9431015601 अमरावती : 9422915064 : 9590979099 हैदराबाद : 9989877786 पूना :9422660497 जलंधर : 9814063043 U.S.A.: Dada Bhagwan Vignan Institute : 100, SW Redbud Lane, Topeka, Kansas 66606 Tel. : +1877-505-DADA (3232), Email : info@us.dadabhagwan.org U.K. : +44 330 111 DADA (3232) UAE : +971 557316937 Kenya : +254 722 722 063 Singapore : +65 81129229 Australia: +61 421127947 New Zealand: +64 21 0376434 Website : www.dadabhagwan.org बेंगलूर Page #46 -------------------------------------------------------------------------- ________________ क्रोध पेक्षा शील चा ताप विशेष हे क्रोध-मान-माया-लोभ ह्याच सगळ्या निर्बलता आहेत. जो बलवान आहे त्याला क्रोध करण्याची गरजच कुठे भासते? पण हा तर क्रोधाने समोरच्याला वश करायला जातो, पण ज्याच्याकडे क्रोध नाही त्याच्याकडे दुसरे काहीतरी असेलच ना? त्याच्याजवळ शील नांवाचे जे चारित्र्य आहे, त्यामुळे तर जनावरे देखील वश होवून जातात. वाघ, सिंह, शत्रु, संपूर्ण लश्कर, सर्वच वश होवून जातात! - दादाश्री ISANCTS-81-911-470 9788189-933470 Printed in India dadabhagwan.org