________________
संपादकीय
क्रोध हे कमजोरी आहे, लोक ह्याला बहादुरी समजतात. क्रोध करणाऱ्यारापेक्षा क्रोध न करणाऱ्याच्या प्रभाव तर विशेष पडतो !
सामान्यतः जेव्हा आपल्या मनासारखे नाही झाले, समोरचा आपले म्हणणे समजत नसेल, मान्य करत नसेल, डिफरन्स ऑफ व्यू पोइन्ट (मतभेद) असेल तेव्हा क्रोध येतो. काहीवेळा आपले म्हणणे खरे असेल आणि कोणी आपल्यास खोटे ठरवत असेल तेव्हा ही क्रोध येतो. अरे, पण आपल खरे हे आपल्या दृष्टिकोणाने ना ! समोरच्याचा दृष्टिकोणाने तोही स्वतःला खरे समजेल ना! कित्येकवेळा काही सुचतच नाही, पुढचा मार्ग दिसत नाही, काय करायच ते समजत नाही तेव्हा क्रोध येतो.
अपमान होते तेव्हा क्रोध येतो, नुकसान झाले तर क्रोध येतो मानाच्या रक्षणासाठी क्रोध करतात, लोभेचा रक्षणासाठी क्रोध करतात. तेथे मान आणि लोभ कषाय ह्यांचापासून मुक्त होण्यासाठी जागृतित रहायचे जरूरी चे आहे. नोकरांच्या हाताने कपबश्या तूटल्या तेव्हा क्रोध करतात आणि जावयाचा हाताने तूटल्यातर? तेव्हा क्रोध कसा ताब्यात राहतो ! म्हणून बिलीफ (मान्यता) वर च आधारित आहे ना ! कोणी आपले नुकसान करतो किंवा अपमान करतो ते आपल्याच कर्माचे फळ आहेत, करणारा तर निमित्तच आहे अशी समज फिट झालेली असेल तर च क्रोध निघून जातो.
जेथे जेथे आणि जेव्हा जेव्हा क्रोध येत आहे तेव्हा त्याची नोंद करावी आणि तेथे जागृत होण्याची जरूर आहे. आणि ज्याला आपल्या क्रोधामुळे दुःख झाले असेल त्याचे प्रतिक्रमण करावे आणि पुन्हा असे करणार नाही असा दृढ निश्चय करावे कारण आपण ज्याच्यावर क्रोध करतो त्याला दुःख होतो, म्हणून तो वैर बांधतो आणि पुढच्या जन्मी परत भेटतो (वैर वसूलीसाठी).
आई-वडील स्वत:च्या मुलांवर आणि गुरू स्वत:चा शिष्य वर क्रोधित होतात त्याने ते पुण्य बांधतात कारण त्या मागे त्यांचा हेतु भल्यासाठी आहे त्यांना सुधारण्यासाठी आहे. हा जर स्वार्थासाठी असेल तर पाप बांधेल. वीतराग भगवानांची समज किती खोलवरची आहे, किती सूक्ष्म आहे ते तर पहा !!!
प्रस्तुत ग्रंथात क्रोध कि जो पुष्कळ त्रास देणारा, दिसून येणारा कषाय (दोष) आहे त्याची सर्व समज विस्ताराने येथे संकलित करून प्रकाशित केली आहे जे सुज्ञ वाचकांना क्रोधापासून मुक्त होण्यासाठी खूपच मदतरूप होऊ शकेल ही च प्रार्थना. - डॉ. नीरूबेन अमीन ह्यांचे जय सच्चिदानंद