________________
क्रोध
२३
दादाश्री : नाही, असा काही कायदा नाही. पति-पत्नीमध्ये तर खूप शांति राहायला हवी. जर दुःख होईल तर त्यांना पति-पत्नी नाही म्हणता येणार. फ्रेन्डशिप(मैत्री)मध्ये दुःख नाही होत, तर ही तर सगळ्यात मोठी फ्रेन्डशिप म्हणता येईल. इथे क्रोध नाही यायला पाहिजे. हे तर लोकांनी जबरदस्तीने हृदयात बसवले आहे. स्वतःला क्रोध होते म्हणून म्हणतात कि कायदा असाच आहे, पति - पत्नीमध्ये तर बिलकुल दुःख नसावे. भले ही दुसऱ्या जागी असूदे.
मनमानी ने पडणार मार
प्रश्नकर्ता : घरात किंवा बाहेर मित्रांमध्ये सगळ्या ठिकाणी प्रत्येकाची मतं भिन्न असतात आणि त्यात आपली धारणा ( मर्जी) अनुसार झाल्यावर, आपल्याला क्रोध का येतो? तेव्हा काय केले पाहिजे?
दादाश्री : सगळी लोकं आपल्या मर्जी प्रमाणे करायला गेली, तर काय होणार? असा विचारच का येतो? लगेचच विचार आला पाहिजे कि, जर सगळी आपल्या मर्जी प्रमाणे करू लागली, तर इथे सर्व भांडी तोडणार समोरासमोर, आणि खायलाही नाही राहणार. म्हणून मर्जी प्रमाणे कधी करायचे नाही. आपण मर्जी प्रमाणे नाहीच केले तर चुकीचे नाही ठरणार. ज्याला करायचे असेल तो करेल, मर्जी प्रमाणे.
प्रश्नकर्ता : आपण कितीही शांत राहिलो पण पतिने क्रोध केला तर आम्हाला काय केले पाहिजे?
दादाश्री : तो क्रोध करेल, आणि त्याच्या बरोबर भांडण करायचे असेल, तर आपल्यालाही क्रोध केला पाहिजे, अन्यथा नाही. जर फिल्म बंद करायची असेल तर शांत होऊन जा. फिल्म बंद करायची नसेल, तर रात्रभर चालू दे, कोण नको म्हणते? पसंद आहे का अशी फिल्म ?
प्रश्नकर्ता : नाही, अशी फिल्म पसंद नाही.