________________
30
प्रश्नकर्ता : एक्सिडन्ट होईल.
दादाश्री : वेडीवाकडी होत चालली तर एक्सिडन्ट होईल. अश्याचप्रकारे मनुष्य जेव्हा इमोशनल होतो, तेव्हा कितीतरी जीव आत मरतात. क्रोध आल्यावर कितीतरी छोटे छोटे जीव (शरीरात) मरून जातात आणि वरून स्वतः दावा करतो कि, 'मी तर अहिंसा धर्माचे पालन करतो, जीव हिंसा तर करतच नाही' अरे, पण क्रोधाने तर नुसते जीवच मरतात, इमोशनल झाल्यामुळे.
क्रोध जिंकता येईल असे... द्रव्य अर्थात् बाहेरील व्यवहार, तो नाही पलटत, पण भाव पलटले तरी खूप झाले.
कोणी म्हणेल कि क्रोध बंद करायचा आहे, तर आजच क्रोध बंद नाही होणार, क्रोध बंद करायचा, तर ते कशाप्रकारे होईल? क्रोधाला ओळखायला हवे, कि क्रोध काय आहे? का उत्पन्न होतो? त्याचा जन्म कशाच्या आधारे होतो? त्याची आई कोण? त्याचे वडील कोण? सगळे शोधल्यानंतर क्रोधाला ओळखू शकाल.
सुटलेलेच सोडवतील आपल्याला सगळे काढायचे आहे? काय काय काढायचे आहे, सांगा, लिस्ट (यादी) बनवून मला द्या. ते सगळे काढून टाकू. आपण क्रोध-मान-माया-लोभाने बांधलेले आहात?
प्रश्नकर्ता : एकदम.
दादाश्री : अर्थात् बांधलेला मनुष्य स्वत:हून कसा सुटू शकतो? असे चारी बाजूंनी हात-पाय कसून बांधलेले असतील, तर तो स्वतः कसा मुक्त होऊ शकतो?