________________
२१
क्रोध बांधले जाते. कारण हे पाहिले जाते कि क्रोध करण्यामागे त्याचा हेतु काय आहे?
प्रश्नकर्ता : प्रशस्त क्रोध. दादाश्री : आणि तो अप्रशस्त क्रोध, त्याला वाईट म्हणतात.
म्हणून या क्रोधातही इतके भेद आहेत, दुसरे, पैस्यांसाठी मुलाला भलं-बूरं बोलला कि, तू धंद्यामध्ये बरोबर लक्ष नाही देत, हा क्रोध वेगळा आहे. मुलाला सुधारण्यासाठी, चोरी करत असेल, दुसरे काही उलट-सुलट काम करत असेल, त्यासाठी मुलाला आपण रागावलो, क्रोध केला त्याचे फळ भगवानने पुण्य सांगितले आहे. भगवान किती शहाणे आहेत.
क्रोध टाळू असे प्रश्नकर्ता : आपण क्रोध कोणावर करतो? खास करून ऑफिसमध्ये सेक्रेटरी वर क्रोध नाही करत आणि हॉस्पिटलमध्ये नर्स वर नाही करत, पण घरात बायकोवर आपण क्रोध करतो.
दादाश्री : म्हणून जेव्हा शंभर लोकं बसलेले असतात आणि ऐकत असतील, तेव्हा मी सगळ्यांना सांगतो कि ऑफिसमध्ये बॉस (मालक) धमकावत असेल किंवा ओरडत असेल, तर त्या सगळ्यांचा क्रोध लोकं घरी बायकोवर काढतात. म्हणून मला सांगावे लागते कि, अरे वेड्या, बिचाऱ्या बायकोबरोबर का लढतो. विनाकारण बायकोला ओरडता. बाहेर जे धमकावतात त्यांच्याशी लढा ना, इथे का लढता बिचारी बरोबर?
एक भाऊसाहेब होते, ते आमचे ओळखीचे होते. ते मला नेहमी म्हणत कि, 'साहेब एकदा माझ्या घरी या.' तो कडियाकाम करायचा. एक दिवस मी तिथून जात होतो, तेव्हा मला भेटला आणि म्हणाला, 'माझ्या घरी चला ना.' तेव्हा मी त्याच्या घरी गेलो. तिथे मी विचारले, 'अरे, दोन रूममध्ये तुला अनुकूल होते?' तेव्हा तो म्हणाला, 'मी तर पाहुणा म्हटला