________________
क्रोध
२०
'क्रोध
बाप गुन्हेगार आहे. म्हणून त्याला शंभर रूपये दंड होतो.' तर मग, करणे ठीक आहे?' तेव्हा म्हणतात, 'नाही, पण आता त्याची जरूरत होती. जर येथे क्रोध नाही केला असता, तर मुलगा वाईट रस्त्याला गेला असता'.
अर्थात् क्रोध एक प्रकारचे लाल सिग्नल आहे, दुसरे काही नाही. जर डोळे नसते दाखवले, आणि क्रोध नाही केला असता, तर मुलगा उलट्या रस्त्याने गेला असता. येथे भगवान तर, बापाने मुलावर क्रोध केला, तरीपण शंभर रूपये ईनाम देतात.
क्रोध तर लाल झेंडा आहे. हेच पब्लिकला माहित नाही आणि किती प्रमाणात लाल झेंडा ऊभा करायचा, किती वेळेसाठी ऊभा करायचा, हे समजण्याची जरूरी आहे. आता रेलगाडी जात आहे आणि अडीच तास लाल झेंडा घेऊन विनाकारण ऊभे राहिलात, तर काय होईल? अर्थात् लाल सिग्नलची जरूरी आहे, पण किती टाईम ठेवावा, हे समजण्याची जरूरी आहे. थंड राहणे हे हिरवे सिग्नल आहे.
रौद्रध्यानचे रूपांतर धर्मध्यानमध्ये
मुलावर क्रोध केला, पण आपला आतमध्ये भाव काय आहे कि, असे नाही व्हायला पाहिजे, असेच ना! तुमचा भाव काय आहे? प्रश्नकर्ता : हो, असे नाही व्हायला पाहिजे ?
दादाश्री : म्हणून हे रौद्रध्यान होते, ते धर्मध्यानात रूपांतरीत झाले. क्रोध आला तरीपण परिणामात आले धर्मध्यान.
प्रश्नकर्ता : असे नाही व्हायला पाहिजे, हा भाव राहिला म्हणून?
दादाश्री : हिंसकभाव नाही त्याच्यापाठी. हिंसकभावा शिवाय क्रोध होतच नाही, पण क्रोधाची काही एक स्थिती आहे कि, जर स्वत:चा मुलगा, स्वत:चा मित्र, स्वत:ची बायको ह्यांचा वर क्रोध केल्याने पुण्य