________________
१८
क्रोध राहते. वैराच्या कारणाने हे सगळे भटकणे आहे. हा मनुष्य का भटकतो? तीर्थंकर भगवान नाही मिळाले होते का? तेव्हा म्हणतात, 'तीर्थंकर तर मिळाले होते. त्यांचे उपदेश पण ऐकले, पण काही कामी नाही आले.'
__ काय-काय अडचणी येतात, कुठे कुठे विरोध होतो, तर त्या विरोधांना मिटवून टाक ना. विरोध होतो, ही संकुचित दृष्टि आहे. म्हणून ज्ञानी पुरूष लोंग साइट (दीर्घ दृष्टि) देतात. लोंग साइटच्या आधाराने सगळे 'जसे आहे तसे' नजर येते.
मुलांवर राग येतो तेव्हा... प्रश्नकर्ता : घरात मुलांवर क्रोध येतो त्याचे काय करावे?
दादाश्री : नासमजीमुळे क्रोध येतो. त्याला आपण विचारा कि, तुला खूप मजा आली होती? तेव्हा तो म्हणेल कि मला आत खूप वाईट वाटले, आत खूप दुःख झाले होते. त्याला दुःख होतो आपल्याला ही दुःख होतो तर मग मुलावर चिडायची जरूरच कुठे आहे? आणि चिडल्यावर सुधारत असेल तर चिडा. परिणाम चांगला येत असेल तर चिडणे कामाचे, परिणाम चांगला नाही येत, तर चिडण्याला काय अर्थ? क्रोध केल्याने फायदा होत असेल तर करा आणि जर फायदा होत नाही, तर असेच चालवून घ्या.
प्रश्नकर्ता : जर आपण क्रोध नाही केला तर ते आपले ऐकणार नाही, खाणारही नाहीत. दादाश्री : क्रोध केल्यानंतर तरी कुठे ऐकातात?
वीतरागांची सूक्ष्म दृष्टि तर बघा तरीपण आपली लोकं काय म्हणतात कि, पिता आपल्या मुलांवर इतका क्रोधित झाला आहे, म्हणून हा बाप नालायक आहे. आणि निसर्गात याचा न्याय कसा होत असतो? पिताला पुण्य लाभतो. हां. कारण त्याने