Book Title: Krodh
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 26
________________ क्रोध कशाप्रकारे तो अहंकार आहे. तपासणी केल्याने त्याला पकडू शकू कि, क्रोध हा अहंकार आहे. हा क्रोध उत्पन्न का झाला? तेव्हा म्हणे कि, 'ह्या बहिणीने कप-बशी फोडली, म्हणून राग आला.' आता कप-बशी फोडली, त्यात आपल्याला काय हरकत आहे? तेव्हा म्हणतात कि, 'आमच्या घराचे नुकसान झाले' आणि नुकसान झाले म्हणून परत वरून रागावणे? हा अहंकार करणे, रागावणे, हे सगळे बारीकपणे विचार तर करा, विचार केल्यावर सगळा अहंकार धुवून जाईल असे आहे. आता हा कप तुटला हे निवार्य आहे कि अनिवार्य आहे? अनिवार्य संयोग असतात कि नाही? शेठ नोकराला ओरडतो कि, 'कप-बशी का फोडली? तुझे हात तुटले होते का? तू असा आहेस, तसा आहेस.' आता हे जर अनिवार्य आहे, तर त्याला रागवायला हवे का? जावयाच्या हातून कप-बशी फुटली, तर तिथे एक शब्द ही नाही बोलत. कारण तो सुपिरियर ठरतो, तिथे चुप्पी. आणि इन्फिरियर आला तिथे धुत्कारले. हा सगळा इगोइझम (अहंकार) आहे. सुपिरियर ठरतो, तिथे चुप्पी नाही साधत? 'दादाजीं'च्या हातून जर काही तुटले तर मनात काही येणार नाही आणि त्या नोकराच्या हातून तुटले तर? या संसाराने कधी न्याय पाहिलाच नाही. न समजल्या कारणाने हे सगळे आहे. जर बुद्धिपूर्वक समज असती तरी खूप झाले असते. बुद्धि जर विकसित असली, समजदारीवाली असती, तर झगडा होईल असे होणारच नाही. आता भांडण केल्यावर काही कप-बशी परत येणार आहे का? फक्त संतोष मिळतो, इतकेच ना. आणि मनात क्लेश होतो तो वेगळाच. म्हणून ह्या व्यापारात एक तर ती कप-बशी गेली हे नुकसान, दुसरे क्लेश झाला हे नुकसान आणि नोकरा बरोबर वैर झाले हे नुकसान!!! नोकर वैर बांधेल कि, 'मी गरीब आहे' म्हणून मला असे म्हणतात. पण हे वैर काही सोडणार नाही आणि भगवानने पण सांगितले आहे कि कोणा बरोबर वैर नका ठेवू. होऊ शकेल तर प्रेम बांधा, पण वैर बांधू नका. कारण प्रेम बांधले तर, ते प्रेम स्वत:हून वैर उखडून टाकेल. प्रेम तर वैराला खोदून काढेल असा आहे, वैराने वैर तर वाढतच राहते. निरंतर वाढतच

Loading...

Page Navigation
1 ... 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46