________________
क्रोध
१५ येतो, त्याची नोंद कर आणि जिथे क्रोध नाही येत तेही जाणून घे. एकदा लिस्ट करून घे कि, ह्या मनुष्यावर क्रोध नाही येत. काही लोकांनी उलटे केले, तरी त्यांच्यावर क्रोध नाही येत, आणि काही बिचारे सरळ करतात, तरीपण त्यांच्यावर क्रोध येतो. त्यासाठी काही कारण तर असेल ना?
प्रश्नकर्ता : त्यासाठी मनात ग्रंथि बांधली गेली असेल?
दादाश्री : हां, ग्रंथि बांधली गेली आहे. ती ग्रंथि सोडवण्यासाठी आता काय करावे? परीक्षा तर दिली. जितक्या वेळेला, ज्याच्या बरोबर क्रोध व्हायचा आहे, तितक्या वेळेला त्याच्या बरोबर क्रोध येणार, आणि त्या बरोबर ग्रंथि ही बांधली जाणार, पण आता आपल्याला काय करायला हवे? ज्याच्या वर क्रोध येतो, त्याच्यासाठी मन खराब नाही होऊ दिले पाहिजे. मन सुधारा कि भाऊ, आपल्या प्रारब्धानुसार हा मनुष्य असे करतो. तो जे काही करतो ते आपल्या कर्माचा उदय आहे, म्हणून असा करतो. अशाप्रकारे आपण मनाला सुधारू. मनाला सुधारत रहा जेव्हा समोरच्यासाठी मन सुधारेल, तेव्हा मग त्याच्यासाठी क्रोध होणे बंद होईल. काही काळापर्यंत मागचा इफेक्ट आहे, तेवढा इफेक्ट देऊन मग बंद होऊन जाईल.
ही जरा सूक्ष्म गोष्ट आहे, आणि ती लोकं शोधू शकली नाहीत. प्रत्येक गोष्टीचा एक उपाय होतोच ना? उपायाशिवाय संसार होतच नाही ना. संसार तर परिणामाचाच नाश करू पाहतो. अर्थात् क्रोध-मान-मायालोभ याचा उपाय हा आहे कि, परिणामाला काही नाही करायचे, त्याच्या कारणांना उडवून द्या, तर ते सगळे निघून जातील. म्हणून स्वतः विचारक व्हायला पाहिजे. नाहीतर अजागृत राहून कशाप्रकारे उपाय करणार?
प्रश्नकर्ता : कारणांना कशाप्रकारे उडवायचे, हे जरा परत समजवा.
दादाश्री : या भाऊ वर मला क्रोध येतो, तर मग निष्कर्ष काढू कि मला याच्यावर जो क्रोध येतो, तर मी पूर्वी त्याचे दोष बघितले होते,