________________
१४
क्रोध जास्त तर क्रोध केल्यामुळे मरून जाल, पण हे चित्र नजर नाही येत आणि ते चित्र खुल्यापणी दिसतो, इतकाच फरक आहे! तिथे रोड वर सामना नाही करत? क्रोध नाही करत, समोरच्याची चुक झाली तरी?
प्रश्नकर्ता : नाही. दादाश्री : असेच जीवनातही समजून घेण्याची जरूरत आहे.
परिणाम तर, कारणं बदलल्यावर ही बदलणार
एक भाऊ मला म्हणतो कि, 'अनंत अवतारापासून हा क्रोध काढत आलो आहोत, पण तो जात का नाही?' ह्यावर मी सांगितले कि, 'तुम्ही क्रोध काढून टाकण्याचे उपाय नाही जाणत?' त्याने सांगितले कि, 'क्रोध काढायचे उपाय शास्त्रात लिहिलेले आहेत, ते सगळे करतो, तरी हा क्रोध नाही जात.' तेव्हा मी सांगितले कि, 'सम्यक् उपाय असला पाहिजे.' तेव्हा म्हणतात कि, 'सम्यक् उपाय तर खूप वाचले, पण ते काही कामात येत नाहीत.' मग मी सांगितले कि, 'क्रोध बंद करण्यासाठी उपाय शोधणे मूर्खता आहे, कारण क्रोध परिणाम आहे. जसे आपण परीक्षा दिली आहे आणि रिझल्ट आला. आता मी रिझल्टला नष्ट करण्याचा उपाय करतो, त्याप्रमाणे गोष्ट झाली ही तर. हा परिणाम आला, तो कशाचा परिणाम आहे त्यात आपल्याला बदल करण्याची आवश्यकता आहे.'
आपली लोकं काय म्हणतात कि, 'क्रोधाला दाबा, क्रोधाला काढून टाका.' अरे, असे का करतो? काही कारण नसताना डोकं खराब करतो. तरी ही क्रोध तर निघून जात नाही. पण तेव्हा ते म्हणतील कि, 'नाही साहेब, थोडा-फार दाबला तर गेला आहे.' अरे, तो आत आहे, तोपर्यंत तो दाबला गेला नाही म्हणत. तेव्हा त्या भाऊने विचारले कि, 'तेव्हा आपल्याकडे दुसरा काही उपाय आहे?' मी सांगितले, 'हो, उपाय आहे, तुम्ही करणार?' तर म्हणे हो. तेव्हा मी सांगितले कि, 'एकदा तसे नोंद करा कि या संसारात खास करून कोणावर क्रोध येतो?' जिथे जिथे क्रोध