________________
१२
क्रोध फक्त जाणल्याचा अहंकार घेऊन फिरता. उजेडात कधी ठोकर लागते का? आणि जर ठोकर लागते, तर मग जाणलेच नाही. हे तर अंधारालाच उजेड म्हणायचे, ही आपली भूल आहे. म्हणून सत्संगमध्ये बसून एकदा 'जाणा', मग क्रोध-मान-माया-लोभ सगळे निघून जातील.
प्रश्नकर्ता : पण क्रोध तर सगळ्यांनाच येतो ना? दादाश्री : या भाऊनां विचारा, हे तर नाही म्हणतात. प्रश्नकर्ता : सत्संगमध्ये आल्यानंतर क्रोध नाही येत.
दादाश्री : अस्सं? ह्यांनी कुठले औषध घेतले असेल? द्वेषाचे मूळ नष्ट होऊन जाईल, असे औषध प्यालात!
समजदारी ने प्रश्नकर्ता : माझा कोणी जवळचा, नातेवाईक आहे, त्याच्यावर मी क्रोधित झालो. तो त्याच्या दृष्टिने कदाचित बरोबर ही असेल, पण मी माझ्या दृष्टिने क्रोधित झालो, तर काय कारणाने क्रोधित होऊन जातो?
दादाश्री : आपण येत आहात आणि ह्या ईमारती वरून एक दगड डोक्यावर येऊन पडला आणि रक्त आले, तर त्या वेळी क्रोध कराल?
प्रश्नकर्ता : नाही, हे तर 'हेपन' (नैसर्गिक रीत्या) झाले.
दादाश्री : नाही, पण क्रोध का नाही करत तेथे? कारण स्वतः ने कोणाला पाहिले नाही, म्हणून क्रोध कसा येणार?
प्रश्नकर्ता : कोणीही जाणून-बुजुन मारलेले नाही.
दादाश्री : आणि, आता बाहेर गेल्यावर कोणी मुलाने दगड मारला आणि आपल्याला लागला आणि रक्त आले, तर आपण त्याच्यावर क्रोध करतो, कशासाठी? त्याने मला दगड मारला, म्हणून रक्त आले तर क्रोध