________________
क्रोध
मोठे साधु महाराज पण तांतेवाले असतात. रात्री जर आपण काही खोड काढली, तर पंधरा पंधरा दिवस आपल्याशी बोलत नाहीत, असे असेल तर तो तांता.
फरक, क्रोध आणि रागात प्रश्नकर्ता : दादाजी, राग(गुस्सा) आणि क्रोध यांत फरक काय आहे?
दादाश्री : क्रोध त्याला म्हणतात कि, जो अहंकारासहित आहे. राग आणि अहंकार दोन्ही मिळाल्यावर क्रोध म्हणतात. आणि मुलाबरोबर बापाने राग केला, तो क्रोध नाही म्हणत. त्या क्रोधामध्ये अहंकार मिसळत नाही. म्हणून त्याला राग म्हणतात. ह्यावर भगवानने सांगितले कि, 'हा रागवला तरी त्याचे पुण्य जमा करा.' तेव्हा म्हणतात कि, 'राग केला तरी?' ह्यावर सांगितले कि, 'क्रोध केला तर पाप आहे, रागचे पाप नाही' क्रोधामध्ये अहंकार मिसळलेला असतो आणि आपल्याला राग आल्यावर, आतमध्ये आपल्याला वाईट वाटते ना.
क्रोध-मान-माया-लोभ दोन प्रकारचे असतात.
एक प्रकारे क्रोधाला वळवू शकेल असा-निवार्य. कोणावर क्रोध आला तर त्याला आतल्या आत बदलू शकू, आणि त्याला शांत करू शकू, असा मोडू शकणारा क्रोध. ह्या स्टेजपर्यंत पोहोचलो तर व्यवहार खूप सुंदर होतो.
___ दुसऱ्या प्रकारचा क्रोध जो वळवू (मोडू) नाही शकत असाअनिवार्य. खूप प्रयत्न केल्यावर ही फटाका फुटल्याशिवाय रहात नाही. तो नाही मोडणारा क्रोध. हा क्रोध स्वत:चे अहित करतो आणि समोरच्याचे सुद्धा अहित करतो. ____ भगवंताने कुठपर्यंतचा क्रोध चालवून घेतला आहे साधु आणि चारित्र्यवानांसाठी कि क्रोध जो पर्यंत समोरच्या माणसाला दुःखदायी नाही होत, तेवढ्या क्रोधाला भगवंताने चालवून घेतले आहे. माझा क्रोध मला