________________
क्रोध अग्नी. त्याला स्वत:ला पत्ता नाही लागत कि, मी मातीत घालून टाकले. कारण बाहेरच्या गोष्टीमध्ये काही कमी नाही होत, पण आतमध्ये सगळे संपते. पुढच्या जन्मासाठीची सगळी तयारी झाली असेल, त्यात थोडा (पुण्य) खर्च होऊन जातो. पण मग जास्त खर्च झाल्यावर काय होणार? इथे मनुष्य होता तेव्हा अन्न खात होता, मग तिथे चारा खायला (जनावरांमध्ये) जायला लागेल. हे अन्न सोडून चारा खायला जावे लागेल. हे ठीक असेल?
जगात कोणीही मनुष्य क्रोधाला नाही जिंकू शकत. क्रोधाचे दोन रूपे आहेत, एक कढापाच्या रूपात (बाहेरून दिसणारे) आणि दुसरे, बेचैनी चे रूप (जे आत असते), जे लोक क्रोधाला जिंकतात ते कढापा रूपाला जिंकतात. इथे असे होते कि एकाला दाबले तर दुसरे वाढणार आणि म्हणणार मी क्रोधाला जिंकले, त्याच्या परिणामस्वरूप मान वाढेल. वास्तवात क्रोध पूर्णपणे नाही जिंकता येत. हे तर जे दिसते त्या क्रोधालाच जिंकले असे म्हणले जाईल.
तांता (तंत) त्याचे नांव क्रोध ज्या क्रोधात तांता आहे, तोच क्रोध म्हणतात. उदाहरणार्थ, पतिपत्नी रात्री खूप लढले, क्रोध जबरदस्त उफाळून आला. सारी रात्र दोघेही जागी राहिली. सकाळी बायकोने चहाचा प्याला जरा आपटूनच ठेवला, तर पति समजून जाईल कि अजून तांता (तंत, क्रोधाची पकड) आहे. त्याचेच नांव क्रोध. मग तो कितीही वेळेचा असूदे. अरे! काहींना तर आयुष्यभराचा असतो. बाप मुलाचे तोंड नाही पहात आणि मुलगा बापाचे तोंड नाही पहात. क्रोधाचा तांता तर बिघडलेल्या चेहऱ्यावरून कळतो.
तांता एक अशी वस्तु आहे कि पंधरा वर्षा पूर्वी कोणी माझा अपमान केले होते आणि तो मनुष्य पंधरा वर्षपर्यंत मला भेटला नव्हता. पण आज तो भेटलावर मला सगळे आठवते, हा तांता. तांता कोणाचा जात नाही. मोठे