________________
क्रोध
क्रोधीपेक्षा, क्रोध न करणाऱ्याला लोकं अधिक घाबरतात, काय कारण असेल ह्याचे? क्रोध बंद झाल्यावर प्रताप उत्पन्न होतो, असा निसर्गाचा नियम आहे. नाहीतर त्याचे रक्षण करणाराच नाही मिळणार ना. क्रोध तर रक्षक होता, अज्ञानतेत क्रोधाने रक्षण होत होते.
चिडचिड्याचा नंबर शेवटी प्रश्नकर्ता : सात्विक चिड किंवा सात्विक क्रोध चांगला आहे कि नाही?
दादाश्री : त्याला लोक काय म्हणतील? ही मुलं पण त्यांना म्हणतील कि 'हे तर चीडचीडेच आहेत' चीड हे मूर्खपणा आहे, फूलिशनेस आहे. चीड ला कमजोरी म्हणतात. मुलांना आपण विचारले कि, तुमचे पप्पा कसे आहेत? तर सांगतिल कि 'ते तर खुपच चीडचीडे आहेत.' बोला, आता आबरू वाढली कि कमी झाली? ही कमजोरी नको असायला पाहिजे, अर्थात् जिथे सात्विकता आहे, तिथे कमजोरी नाही होणार.
घरातील लहान मुलांना विचारा कि, 'तुमच्या घरात पहिला नंबर कोणाचा?' तेव्हा मुलं शोध करतील कि माझी आई चिडत नाही. म्हणून सगळ्यात चांगली तीच आहे. पहिला नंबर तिचा, मग दुसरा, तिसरा, करत करत पापा चा नंबर शेवटी येतो !!! असे का? कारण ते चिडतात. चीडचीडे आहेत म्हणून. मी म्हणेन कि, 'पप्पा पैसे आणून तुमच्यासाठी खर्च करतात, तरीसुद्धा त्यांचा शेवटचा नंबर?' तेव्हा ते 'हो' सांगतात. बोला आता, मेहनत मजूरी करून, खायला द्या, पैसे आणून द्या तरीपण शेवटचा नंबर आपलाच येतो ना?
क्रोधी म्हणजे आंधळेपण प्रश्नकर्ता : मनुष्याला क्रोध येण्याचा सामान्य रूपाने मुख्य कारण काय असू शकते?