________________
क्रोध सांगितली आहे, कि हा 'सज्जन पुरूष' आहे, अशी सज्जनता लोकांच्या नजरेत यावी त्याची समज नाही.
क्रोध-मान-माया-लोभ ही तर खुली कमजोरी आहे आणि खूप क्रोध आल्यावर आपले हात पाय कंपतांना नाही पाहिले तुम्ही?
प्रश्नकर्ता : शरीर पण नकार देते कि तुला क्रोध करण्यासारखे नाही आहे.
दादाश्री : हां शरीर पण नकार देते कि हा क्रोध आपल्याला शोभा नाही देत. अर्थात् क्रोध तर भारी कमजोरी म्हणतात. म्हणून क्रोध करणे आपल्यासाठी उचित नाही आहे.
प्रभाव पडतो, बिना कमजोरीने प्रश्नकर्ता : जर कोणी मनुष्य लहान मुलाला मारत आहे आणि आपण तेथून जात आहोत, तेव्हा त्यांना असे करण्यास मनाई करणे आणि नाही मानले तर शेवटी ओरडून किंवा रागवून रोकायला हवे कि नको?
दादाश्री : क्रोध केल्यावरही तो मारल्याशिवाय राहणार नाही. अरे, आपल्याला पण मारेल. मग त्याच्यावर क्रोध का करायचा? त्याला शांतपणे काही सांगा, व्यावहारिक बातचीत करा, बाकी त्याच्यावर क्रोध करणे ही तर वीकनेस (कमजोरी) आहे.
प्रश्नकर्ता : तर मुलाला मारू द्यायचे?
दादाश्री : नाही, तिथे जाऊन आपण सांगावे कि, अहो भाऊ, आपण असे का करता? या मुलाने आपले काय बिघडवले आहे? असे त्याला समजावून सांगू शकतो. आपण त्याच्यावर क्रोध करणे, ती तर आपली कमजोरी आहे. प्रथम आपल्यात कमजोरी नाही असली पाहिजे. ज्याच्यात कमजोरी नाही, त्याचा तर प्रभाव पडेलच, तो जरी सहज सामान्य रूपाने सांगेल न तरी पण सगळे मानतील.