________________
क्रोध जाणे, मनुष्य असून गाढव होणे. पण असे कोणी करणारच नाही ना. जिथे आपला अंकुश नाही आहे, तिथे मग काय होऊ शकते?
असे आहे, या संसारात कुठल्याही वेळेस उग्र व्हायचे काही कारणच नाही. कोणी म्हणेल कि, 'हा मुलगा माझे म्हणणे मानत नाही.' तरीसुद्धा हे उग्र व्हायचे कारण नाही. तिथे तुला थंड राहून काम करून घ्यायला पाहिजे. हे तर तु निर्बल आहेस, म्हणून गरम होतोस. आणि गरम होऊन जाणे ही तर भयंकर निर्बलता म्हणली जाते. अर्थात् अधिकाधिक निर्बलता असल्यामुळे गरम होतो ना ! कमजोराला राग जास्त येतो. म्हणून जो गरम होतो, त्याच्यावर दया आली पाहिजे कि ह्या बिचाऱ्याचा क्रोधावर बिलकुल कंट्रोल नाही. ज्याला स्वत:चा स्वभाव ही कंट्रोलमध्ये नाही, त्याच्यावर दया आली पाहिजे.
गरम (क्रोधित) व्हायचे म्हणजे काय? प्रथम स्वतः जळायचे आणि नंतर समोरच्याला जाळायचे. ही आगकांडी लावणे म्हणजे, स्वतः भड भड जळायचे आणि मग समोरच्याला जाळून टाकणे. अर्थात् गरम होणे आपल्या हातात असते तर कोणी गरम झालेच नसते. जळणे कोणाला आवडेल? कोणी असे म्हणेल कि, 'संसारात कधी कधी क्रोध करणे जरूरी आहे.' तेव्हा मी सांगेन कि, 'नाही असे काही कारण नाही कि, जिथे क्रोध करणे जरूरी आहे.' क्रोध निर्बलता आहे, म्हणून होतो. भगवंताने क्रोधीला म्हणून च अबला म्हटले आहे. पुरूष कोणाला म्हणावयाचे? क्रोध-मान-माया-लोभ ही निर्बलता ज्याच्यात नाही, त्याना भगवानने 'पुरूष' म्हटले आहे. अर्थात् हे जे पुरूष नजरेत येतात, त्यांना 'अबला' म्हटले आहे, पण त्यांना शरम नाही येत ना? ते बरे आहे, नाहीतर 'अबला' म्हटल्यावर लाजले असते न! परंतु त्यांना काही समजच नाही. समज किती आहे? आंघोळीसाठी पाणी ठेवले तर आंघोळ करायची. खायचे, आंघोळ करायची, झोपायचे या सगळ्याची समज आहे, पण दुसरी काही समज नाही. मनुष्यत्वाची जी विशेष समज