________________
क्रोध दादाश्री : असे आहे कि, हा सगळा क्रोध आणि चीड, ह्या सगळ्या कमजोरी (वीकनेस) आहेत. संसारात सर्वांकडे ह्या कमजोरी आहेत. कोणी तुला धमकावले, तर तू उग्र होशील ना?
प्रश्नकर्ता : हो, होऊन जातो. दादाश्री : तर ती कमजोरी म्हणावी कि बहादुरी म्हणावी? प्रश्नकर्ता : पण काही प्रसंगी क्रोधित व्हायलाच हवे ना?
दादाश्री : नाही, नाही. क्रोध तर स्वत:च एक कमजोरी आहे काही प्रसंगी क्रोधित व्हायला हवे. ही तर संसारी गोष्ट आहे. हे तर स्वत:चा क्रोध बंद करू शकत नाही म्हणून असे बोलता कि क्रोधित व्हायलाच
हवे.
मनपण नाही बिघडे, तो बलवान प्रश्नकर्ता : जेव्हा माझा जर कोणी अपमान केला आणि मी गप्प बसलो तर ती निर्बलता नाही का होणार?
दादाश्री : नाही, ओहोहो ! अपमान सहन करणे, ही तर मोठीच बहादुरी म्हणावी ! आता आम्हाला(दादाजींना) कोणी शिव्या दिल्या, तर आम्हाला काहीच होणार नाही. त्याच्या प्रति मन पण बिघडणार नाही, हीच बहादुरी! आणि निर्बलता तर, ही सगळे किच-किच करतात ना, जीवमात्र लठूबाजी करत राहतात ना, ही सगळी निर्बलता म्हणतात. म्हणून अपमान शांतिने सहन करणे, ही महान बहादुरी आहे. आणि असा अपमान एकदाच पार करा, एक पाऊल ओलांडलात, तर शंभर पावले ओलांडण्याची शक्ति प्राप्त होते. आपल्याला समजले? समोरचा बलवान असेल तर त्याच्या समोर जीवमात्र निर्बल होऊनच जातो. हा तर त्याचा स्वाभाविक गुण आहे. पण जर निर्बल माणसाने आपल्याला छेडले, तर त्याला आपणा काहीही नाही करायचे, तर ती बहादुरी समजावी.