________________
क्रोध
कोण मानतो, 'मी चुकीचा?'
प्रश्नकर्ता : आपण बरोबर असतांनाही आपल्याला चुकीचे ठरवले, तर आतमध्ये त्याच्यावर राग येतो. तर तो क्रोध लगेच येऊ नये, त्यासाठी काय करावे?
दादाश्री : हां, पण आपण बरोबर असाल तेव्हा ना? वास्तवात आपण बरोबर असता का? आपण बरोबर आहोत असे आपल्याला वाटते? प्रश्नकर्ता : आम्हाला आमचा आत्मा सांगतो कि, आम्ही बरोबर
आहोत.
दादाश्री : हे म्हणजे स्वत:च जज, स्वत:च वकील आणि स्वत:च आरोपी, म्हणून आपण बरोबरच असणार ना? आपण मग चुकीचे असणारच नाही ना? समोरच्यांना पण असेच वाटते कि मी बरोबर आहे. आपल्याला समजले?
या आहेत सगळ्या कमजोरी
प्रश्नकर्ता : परंतु मला असे विचारायचे होते कि, अन्यायासाठी चीड असेल तर, ते तर चांगलेच आहे ना? कुठल्याही गोष्टीवर आपल्याला स्पष्टपणे अन्याय होताना नजरे पडला, तेव्हा जो प्रकोप होईल तो योग्य आहे?