________________
क्रोध एकट्याला दुःख देईल, पण दुसऱ्या कोणाला दुःखदायी नाही होणार, तितका क्रोध चालवून घेतला आहे.
जाणणाऱ्यांना ओळखा प्रश्नकर्ता : आपण सगळे जाणतो कि, हा क्रोध आला, हे खराब आहे. तरी पण...
दादाश्री : असे आहे ना, जो क्रोधी आहे तो जाणत नाही, लोभी आहे तो जाणत नाही, मानी आहे तो जाणत नाही. जाणणारा त्याच्यापेक्षा वेगळाच आहे. आणि ह्या सगळ्या लोकांच्या मनात येते कि, मी सगळी जाणतो तरीसुद्धा असे का होते? आता जाणतो, तो कोण? हे माहित नाही, 'कोण जाणते' हे माहित नाही, इतकेच शोधायचे आहे. 'जाणणाऱ्याला' शोधून काढले, तर सगळे जाईल असे आहे. अर्थात् जाणत नाही. जाणले त्यालाच म्हणतात कि मग (तो दोष) जातच राहणार, ऊभाच नाही राहणार.
सम्यक् उपाय जाणा एक वेळा प्रश्नकर्ता : हे जाणल्यावर ही क्रोध येतो, त्याचे निवारण काय?
दादाश्री : कोण जाणतो? जाणल्यानंतर क्रोध येणारच नाही. क्रोध होतो म्हणून जाणतच नाहीत, फक्त अहंकार करतात कि 'मी जाणतो.'
प्रश्नकर्ता : क्रोध येऊन गेल्यावर मनात येते कि आपल्याला क्रोध नाही केला पाहिजे.
दादाश्री : नाही. पण जाणल्यानंतर क्रोध नाही येत. आम्ही येथे दोन बाटल्या ठेवल्यात. तिथे कोणी समजावले कि एका बाटलीत दवा आहे आणि दुसऱ्या बाटलीत पोईझन (विष) आहे. दोन्ही सारखी दिसतात, पण त्यात भूलचुक झाली तर समजू कि हा जाणतच नाही. भूलचुक नाही झाली तर, म्हणू कि जाणतो, पण भूलचुक होते म्हणून हे निश्चत झाले कि तो जाणत नव्हता. तसाच क्रोध होत असतो, तेव्हा काही जाणत नाही, आणि