________________
क्रोध
२५
आपल्याला सहन होणार कि नाही, ह्याचा विचार केला पाहिजे, आपण क्रोध करणार, त्याच्या आधी, जर आपल्यावर कोणी क्रोध केला तर आपल्याला सहन होणार का? चांगले वाटेल कि नाही? आपल्याला जितके चांगले वाटेल, तितकेच वर्तन दुसऱ्यांबरोबर करावे. तो तुला शिव्या देतो आणि तुला त्रास नाही होत, डिप्रेशन नाही येत, तर तुही तसे कर, नाहीतर ते बंद च कर. शिव्या तर देवूच नये. ही तर एक प्रकारे पशुता आहे. अन्डरडेवलप्ड पीपल, अन्कल्चर्ड (अल्पविकसित मनुष्य, असंस्कृत).
प्रतिक्रमण हाच सच्चा मोक्षमार्ग
पहिले तर दया ठेवा. शांति ठेवा. समता ठेवा, क्षमा ठेवा, असा उपदेश शिकवतात, तेव्हा ही लोकं काय म्हणतात, 'अरे, मला क्रोध येत राहतो आणि तुम्ही म्हणता कि क्षमा ठेवा, पण मी कशाप्रकारे क्षमा ठेवू ? ' म्हणून यांना उपदेश कशाप्रकारे दिला गेला पाहिजे कि, आपल्याला क्रोध आल्यावर अशाप्रकारे मनात पश्चाताप करा कि, माझी काय कमजोरी आहे कि, मला अशाप्रकारे क्रोध येतो. ही माझ्याकडून चुक झाली, असा पश्चाताप करा आणि वर कोणी गुरू असेल तर त्याची मदद घ्या आणि परत अशी कमजोरी पैदा नको होवू दे, असा निश्चय करा, आपण क्रोधाची रक्षा नका करू, उलट प्रतिक्रमण करा.
म्हणून दिवसातून किती अतिक्रमण होतात आणि कोणा कोणा बरोबर होतात हे नोंद करा आणि त्याच वेळी प्रतिक्रमण करा.
प्रतिक्रमण मध्ये तुम्हाला काय करायला हवे? तुम्हाला राग आला आणि समोरच्या माणसाला दुःख झाले, तर त्याच्या आत्म्याला आठवण करून त्याची क्षमा मागावी. अर्थात् जे झाले त्याची क्षमा मागा आणि परत तसे करणार नाही अशी प्रतिज्ञा करा. आणि आलोचना म्हणजे आमच्याकडे दोष जाहिर करा कि, माझी ही चुक झाली.