________________
२२
क्रोध
जातो ना ! ' ही तर आमच्या जमान्याच्या, चांगल्या वेळेची गोष्ट करतो. आता तर एका रूममध्ये राहवे लागते, पण चांगल्या जमान्यातही बिचाऱ्याचे दोनच रूम होते. मग मी विचारले, 'काय बायको तुला हैरान नाही करत?' तेव्हा म्हणाला, 'बायकोला क्रोध आला तरी मी क्रोध नाही करत.' मी विचारले, 'असे का?' तेव्हा म्हणाला, 'जर ती क्रोध करेल आणि मी ही क्रोध केला, तर या दोन रूममध्ये, मी कुठे झोपू आणि ती कुठे झोपणार?' ती तिकडे तोंड करून झोपणार आणि मी इकडे तोंड करून झोपणार, अशा हालतमध्ये तर मला सकाळी चहा सुद्धा चांगली नाही मिळणार. तीच मला सुख देणारी आहे. तिच्यामुळेच मी सुखी आहे. मी विचारले, 'बायकोने कधी क्रोध केला तर?' तेव्हा म्हणतो, 'तिला समजावतो, 'यार जाऊ दे ना, माझी हालत मी जाणतो' असे तसे करून तिची समजूत काढतो. पण तिला खुश ठेवतो. बाहेर मारपीट करून येतो पण घरात तिला मारपीट नाही करत. आणि आपली लोकं बाहेर मार खाऊन येतात आणि घरात मारपीट करतात.
हे तर संपूर्ण दिवस क्रोध करतात. गाई म्हशी तरी बऱ्या, क्रोध नाही करत. जीवनात काही शांति तर हवी ना. निर्बलता नाही असली पाहिजे. हा तर वारंवार क्रोधित होतो. आपण गाडीतून आलात ना? तेव्हा गाडीने संपूर्ण रस्त्यात क्रोध केला तर काय होईल?
प्रश्नकर्ता : तर इथे येऊच नाही शकणार.
दादाश्री : तेव्हा आपण क्रोध करता तर, तीची गाडी कशी चालत असणार? तू तर क्रोध नाही करत?
प्रश्नकर्ता : कधी कधी होऊन जाते.
दादाश्री : आणि जर दोघांनाही होत असेल, तर बाकी काय राहिले?
प्रश्नकर्ता : पति-पत्नीमध्ये थोडा फार क्रोध तर असायला च पाहिजे ना?